पवारांना जेव्हा नैराश्य येते अपयश मिळते
जो भी कहूगा सच कहूगा सच के सीवा कुछ नही कहूगा, हे माझे शपथेवर येथे सांगितलेले वाक्य तुम्ही कायम ध्यानात ठेवा लक्षात ठेवा. संपूर्ण राज्याच्या राजकारणातले नेमके सत्य तेवढे मला कायम तुमच्यासमोर मांडायचे असते भलेही त्यात अगदी जवळचे रागावले तरी किंवा माझ्यापासून दूर गेलेत तरी. एक घडलेला सत्य किस्सा येथे सांगतो. माझ्या गावात एक डॉक्टर होते ते विधुर होते त्यांना चार मुले होती. पत्नी गेली तेव्हा मुले फारच लहान होती म्हणून त्यांनी त्यांच्याकडे सयंपाक करणाऱ्या एका विधवेशी पुढे लग्न केले त्या बाईला देखील आधीच्या नवऱ्यापासून दोन मुले होती पुढे या विधवेशी लग्न केल्यानंतर त्यांना त्या विधवेपासून एक मुलगी झाली, मुलांची आपापसात भांडणे मारामारी झाली कि जेव्हा डॉक्टर घरी यायचे, बाई त्यांच्याकडे तक्रार करायच्या कि माझ्या मुलांनी आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलीला मारले. किंबहुना याच पद्धतीचा, हमारे तुम्हारे नावाचा सिनेमा देखील येऊन गेला आहे. अलीकडे अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादी सहित शिंदे सेना आणि भाजपा सरकारमध्ये सामील झाल्याने मला हा किस्सा आठवला कारण या तिघातल्या नेत्यांच्या आपापसातल्या तक्रारी यापुढे डॉक्टरच्या तिघाडा कुटुंबासारख्या आपापसात नक्की केल्या जातील, तक्रारींचा निपटारा निवाडा करण्याचे मोठे कसब अर्थात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दाखवावे लागणार
आहे…
www.vikrantjoshi.com
आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे जयंत राजाराम पाटील यांचे सख्खे भाचे, ते देखील मामाला अजिबात अंधारात न ठेवता म्हणजे मामा न बनविता जयंत पाटलांना तशी स्पष्ट कल्पना देऊन अजितदादांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले सामील झाले किंबहुना दिलीप वळसे पाटलांसारखे असे अनेक नेते आहेत कि ज्यांना अजिबात ईडीची भीती नव्हती किंवा अनेकांना त्यातल्या आमदार नामदार होण्याची करण्याची शास्वती नसतांना तसा कोणताही शब्द अजितदादा यांनी दिलेला नसताना अगदी मनापासून त्या साऱ्यांनी शरद पवार यांना स्पष्ट सांगून अजित पवार यांच्या संगे त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये निघून जाणे पसंत केले आहे. इकडे निवृत्तीची भाषा करायची एकदा नव्हे अनेकदा पक्षांतर्गत यापुढे आपण भाजपा आणि मोदी यांना साथ द्यायची आहे असे अगदी उघड बोलायचे आणि लगेचच काही दिवसात आपली भूमिका बदलवून वरून मोदी आणि राज्यातल्या राष्ट्रातल्या भाजपाअडचणीत आणण्या चाली खेळायच्या, लबाडी फसवा फसवी स्वतः करयची आणि लबाडी उजेडात आली कि अजित पवारांना बदनाम करून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुद्दाम अजित पवारांची बदनामी करायची अजितदादांच्या विश्वासाहर्तेचे खच्चीकरण करायचे, शरदरावांच्या या तोच तो पणाच्या स्वभावाला वृत्तीला स्वतः अजितदादा आणि पक्षातले समस्त दिग्गज नेते मनापासून कंटाळले होते म्हणून यावेळी अजित दादा आणि मंडळींनी टोकाचा निर्णय घेऊन काकांना एकटे पाडले आहे…
मी जे सांगतो तेच सत्य आहे आणि सत्य हे कि, कितीही ताकद दिली तरी उभ्या आयुष्यात सुप्रिया सुळे या सोलो हिरो बनून कधीही राज्याचे नेतृत्व करणे अशक्य. शरद पवार आहेत तोपर्यंत सुप्रिया यांची राजकीय फडफड थोडीफार सुरु राहील आणि या अशा नेतृत्वातल्या लंगड्या गाईला शरद पवार कायम ताकद देण्यात गुंतले आणि पुतण्याचे राजकीय खच्चीकरण करण्यात त्यांनी चुकीची धन्यता मानली. कदाचित पवारांनी हे त्यांच्या जवानीचा जोश असतांना हे घडवून आणले असते तर ते यशस्वीही झाले असते पण वृद्ध आणि जर्जर शरीर घेऊन त्यांना नक्की सुप्रिया सुळेंचे नेतृत्व उत्तुंग करणे यापुढे शंभर टक्के शक्य नाही म्हणून त्यांनी आपली राजकीय ताकद अजित पवार यांना देऊन अभेद्य आणि अजिंक्य नेतृत्व असे बिरुद लावून निवृत्ती पत्करणे गरजेचे होते पण ते घडले नाही आणि वर्गातल्या सर्वाधिक ढ नेतृत्वहीन विद्यार्थिनीला मेरिट मध्ये आणण्याचा त्यांनी चुकीचा प्रयत्न केला. सुप्रिया यांचे नेतृत्व लादण्याच्या शरद पवार यांच्या या दयनीय प्रयत्नाला अजितदादा सहित सारेच कंटाळले आणि शरद पवारांना फारकत देऊन ते बाहेर पडले. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील दिल्लीत जातील आणि राज्यातले नेतृत्व आपल्याकडे चालून येईल केवळ या सुप्त स्वार्थातून तिकडे जयंत पाटलांनी अजित पवारांना बदनाम करण्याची त्रास देण्याची एकही संधी कधी सोडली नाही त्यामुळे जयंत पाटील आणि चार दोन चेहरे सोडल्यास ज्यांना नेमके फायद्याचे राजकारण कळते उमजते समजते असा एकही नेता यापुढे शरद पवारांना बिलगून चिटकून राहणार नाही…
अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेले मानाचे स्थान या अशा सततच्या कायमच्या लबाडीतून आणि फसवाफसवीतून शरद पवार यांनी झिरो करून ठेवलेले असल्याने यापुढे शरद पवार सुप्रिया सुळे किंवा शरदरावांच्या एकही पाठीराख्याला भाजपा मध्ये प्रवेश नसल्याने पवार पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाची कारण यापुढे पक्षाचे चिन्ह व मालकी अजित पवार यांच्याच कडे राहणार असल्याने पवारांना पर्यायी चिन्ह व पक्ष बांधणी नक्की करावी लागणार आहे थोडक्यात त्यांचा देखील आता उद्धव ठाकरे झाला आहे आणि पक्षाची जुळवाजुळव केल्यानंतर शरद पवार शंभर टक्के काँग्रेस मध्ये विलीन होऊन करून मोकळे होतील, हे माझे वाक्य आजच लिहून ठेवा…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी