अरेरे अरेरे ये क्या हुवा !!
राहुल कनाल शिंदे सेनेत येणार हि बातमी जशी मीच तुम्हाला सर्वप्रथम जाहीर सांगितली त्याचपद्धतीने तब्बल दहा बारा दिवस आधीच मी तुम्हाला सांगितले होते कि जसे एकनाथ शिंदे आणी बहुसंख्य आमदार खासदार आणि नेत्यांना फोडून भाजपाने राज्यातला मोठा राजकीय विरोधक उद्धव ठाकरे यांना जसे पूर्णतः खिळखिळे केले त्याचपद्धतीने एका बेसावध क्षणी अजित पवार यांना त्यांच्या साथीदारांनिशी शरद पवारांपासून बाजूला करून भाजपा पर्यायी शिवसेना पद्धतीने पर्यायी राष्ट्रवादी उभी करून मोकळी होईल आणि तेथेच शरद पवार यांचे राज्यातले देशातले नेतृत्वाचे खच्चीकरण करून भाजपा विशेषतः फडणवीस मोकळे होतील नेमके तेच घडले म्हणून मी तुम्हाला कायम सांगत आलो आहे कि माझ्या लिखाणातली आणि व्हिडीओ मधून जी बातमी मागची बातमी मी सांगितलेली असते त्यावर नेमके लक्ष ठेवा म्हणजे दरवेळी माझ्या बोलण्या लिहिण्यातली सत्यता तुम्हाला पडताळून बघता येईल. वास्तविक भाजपा मध्ये प्रवेशासाठी राहुल कनाल खूप उतावीळ होते कमालीचे उत्सुक होते पण विनंत्या करूनही त्यांना आशिष शेलार यांनी दाद दिली नाही प्रवेश दिला नाही शेवटी कातडी बचावासाठी त्यांना एकनाथ शिंदे यांचा सहारा घ्यावा लागला. उतावीळ होऊ नका पण नेमके जे घडले ते कसे घडले आणि पुढे नेमके काय घडणार आहे त्यावर पुढले माझे काही एपिसोड नक्की इंटरेस्टिंग ठरणार आहेत…
www.vikrantjoshi.com
अजित पवारांचे बंड हे शरद पवारांच्या सूचनेवरून सांगण्यावरून घडविण्यात आले आहे त्यामुळेच जिवलग दिलीप वळसे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल इत्यादी प्रभूती बाहेर पडल्या हे जे विशेषतः शरद पवार गटाकडून पसरविण्यात येते आहे त्याला अजिबात अर्थ नाही त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये. अजिबात तसे घडलेले नाही याउलट देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल असे तिघे मोठी गोपनीयता पाळून त्यांनी हा धक्कादायक प्रकार घडवून आणला आणि अख्ख्या देशाला आणि जगातल्या मराठी माणसाला अवाक करून सोडले आश्चर्याचा फार मोठा धक्का प्रत्येकाला दिला याउलट मी काही दिवस आधी पर्यायी राष्ट्रवादीची बातमी लीक केली म्हणून मला एका महत्वाच्या व्यक्तीची नाराजी पत्करावी लागली अन्यथा मी या प्रवेशाचा मोठा गौप्य्स्फोट नक्की करू शकलो असतो. यापुढे देखील या प्रवेश प्रकरणातले अनेक धक्केदायक पुरावे मी नक्की यथावकाश तुम्हाला सांगणार आहे. वाईट वाटले सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे, हे दोघेही 3 जुलै रोजी जेव्हा मीडियाला सामोरे गेले तेव्हा सुप्रिया यांच्या आणि शरद पवारांच्या देखील अगदी खेटून अंधेरीतला तद्दन ऑर्डीनरी नेता नरेंद्र वर्मा बसलेला होता उभा होता ज्याला साधी महापालिकेची निवडणूक देखील जिंकणे अशक्य आहे विशेष म्हणजे नरेंद्र वर्मा आणि जितेंद्र आव्हाड हे उद्धव सेनेतले मिलिंद नार्वेकर किंवा दुल्हे राजा सिनेमातले जॉनी लिव्हर आहेत म्हणजे नरेंद्र वर्मा यांचे शरद पवारांपेक्षा लाख पटीने प्रफुल पटेल यांच्यावर अधिक प्रेम आहे आणि जितेंद्र आव्हाड यांची देवेंद्र फडणवीसांशी असलेली जिगरी दोस्ती म्हणून त्या दोघांना मी मिलिंद नार्वेकर अशी उपमा देऊन मोकळा झालो आहे…
वास्तविक पवारांपेक्षा त्या अनिल देशमुख यांचे देखील प्रफुल पटेल यांच्यावर मनापासून प्रेम मोठी जवळीक पण फडणवीसांना आशिष देशमुख या दिवसात फार महत्वाचे आहेत खूप जवळचे असल्याने अनिल देशमुखांना अजित पवार यांच्या संगे तीव्र इच्छा असून देखील बाहेर पडता आलेले नाही. अजित पवार आणि रोहित पवार या दोघात अजिबात सख्य नसल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेला दोस्तांना रोहित पवारांना उपयोगी पडला नाही, एका म्यानात दोन तलवारी अशक्य त्यामुळे देखील अजित पवार यांच्यासंगे रोहित बाहेर पडणे शक्य नव्हते. धनंजय मुंडे बाहेर पडले अजितदादांनी त्यांना मंत्री केले त्यामुळे पंकजा मुंडे यांची गरज संपली महत्व संपले हे जे सांगितल्या जाते आहे त्याला जर अर्थ असेल तर पुढल्या काही दिवसात पंकजा मुंडे या एकनाथ खडसे पद्धतीने मोठी चूक करून उद्धव यांच्या शिवसेनेत दाखल होतील पण भावा बहिणींचे सूत जमले आहे हि मला मिळालेली माहिती जर खरी असेल तर मुंडे भगिनी भाजपमधून बाहेर पडण्याचा अविचार नक्की करणार नाहीत. अत्यंत महत्वाचे म्हणजे यापुढे जयंत पाटलांना अनेक गंभीर संकटांना तोंड द्यावे लागणार आहे कारण अजित पवारांच्या मनापासून मनातून उतरलेला नेता म्हणजे एकमेव जयंत पाटील. त्यामुळेच याआधी भाजपा प्रवेशासाठी 2019 दरम्यान जयंत पाटील यांनी भाजपा प्रवेशासाठी आटोकाट प्रयत्न करून देखील ते अजित पवार यांच्याच सांगण्यावरून फडणवीस यांनी फेटाळून लावले होते. उपाय नाही म्हणून आज किंवा यापुढे जयंत पाटील शरद पवार यांच्या संगतीला असतील. महाराज उदयन राजे भोसले यांचा केंद्रीय मंत्री मंडळात शपथविधी केव्हा पार पडतो, बघूया. छत्रपती केंद्रात मंत्री होतील….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी