राज्यातल्या राजकीय भानगडी पुढल्या घडामोडी
रणवीर आणि दीपिका जसे मूल होऊ देणार नाहीत रणबीर आणि आलीया जसे नशा करणे सोडणार नाहीत समिर चौगुलेची कॉमेडी जशी फार दिवस चालणार नाही म्हणजे पुढल्या काही महिन्यात त्याचा देखील इतर विनोदी कलाकारांसारखा प्रेक्षकांना नक्की कंटाळा येईल तद्वत शरद पवार हे बिन भरवशाच्या अजित पवारांना कधीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष करणार नाहीत, शरदरावांच्या मनातून आणि हृदयातून आता एकेकाळी अत्यंत लाडके ठरलेले अजित पवार कायमचे उतरले आहेत त्यामुळे अजित पवारांनी आता काकांना बिलगण्याचा त्यांच्या जवळ जाण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये, पत्नी थेट जगतसुंदरी असली तरी एकदा का कामवासना शमली कि नवरा जसा पाठ करून झोपतो तेच राजकारणात आपापसातल्या प्रेम संबंधांचे असते म्हणजे जेथे बाप मनातून उतरल्यानंतर आपल्या मुलांपासून दूर जाऊ शकतो येथे तर अगदी सुरुवातीपासून पवार काका पुतण्यात राजकारणातले शीत युद्ध सुरु होते त्यातून काकांना पुतण्याने आपणहून स्वतःच्या वागण्या बोलण्यातुन आणि कृतीतून केव्हाच सावध केले होते आता पूर्वीचे त्यांचे थोडेफार आपापसातले विश्वासाचे प्रेमाचे रक्ताचे नाते नक्की निश्चित संपुष्टात आले आहे, यानंतर काका कधीही पुतण्याला राष्ट्रवादीत आणि राजकारणात त्याच्या मनासारखे घडेल असे निर्णय घेणार नाहीत त्यामुळे जयंत पाटील यांच्यानंतर लवकरात लवकर राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण तर अजित पवार नक्की नाहीत हे येथे मी स्पष्ट केले आहे जे नेमके घडणार आहे…
www.vikrantjoshi.com
2019 मध्ये नेमके जे घडले होते वास्तविक मी ते तेव्हाच सांगितले लिहिले असते पण मध्यस्थी करणारा माझा मित्र असल्याने त्याला त्या प्रकाराचा त्यावेळी मोठा त्रास आणि मनःस्ताप झाला असता पण आज जी बातमी जुनी झाली आहे शिळी झाली आहे त्यावर आता बोलणे सहज शक्य आहे. 2019 दरम्यान राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना अगदी शंभर टक्के भाजपामध्ये यायचे होते आणि त्यांना भाजपा श्रेष्ठींकडून तसा ग्रीन सिग्नल देखील मिळाला होता पण लगेच चार दिवसांनी हेच जयंतराव म्हणाले कि जोपर्यंत काका आहेत तोपर्यंत मला राष्ट्रवादी सोडायची नाही त्यावर भाजपा श्रेष्ठी म्हणाले कि याचा अर्थ तुम्हाला किमान आणखी वीस वर्षे राष्ट्रवादी सोडायची नाही आणि वीस वर्षानंतर तसेही तुमचे देखील नेतृत्व अस्ताला नक्की आलेले असेल आणि तो विषय तेथे बारगळला पण शरद पवारांना जयंत पाटलांच्या त्या दिवसातल्या सार्या संशयास्पद हालचाली इत्यंभूत कळल्या आणि ते तेव्हापासून जयंत पाटलांच्या बाबतीत देखील सावध झाले. आताही जर आधी अजित पवार भाजपमध्ये गेले तर जयंत पाटील नक्कीच तेथे जाणार नाहीत कारण त्यावेळी देखील जयंत पाटील अजित पवारांच्या जाचाला त्रासाला डावपेचांनी कंटाळले होते म्हणून त्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीपासून फारकत घेण्याचे नक्की केले होते. बघूया, जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर लगेचच भाजपामध्ये प्रवेश करून मोकळे होतात कि त्याआधीच अजित पवार भाजपाला चिपकून बिलगून मिठीत घेऊन मोकळे होतात. माझी माहिती अशी कि अजित पवार यांना भाजपामध्ये घेऊन पक्षांतर्गत कलह नाराजी ओढवून घेण्यापेक्षा एकनाथ शिंदे पद्धतीने त्यांना देखील प्रति राष्ट्रवादी स्थापन करा, आमची संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी असे भाजपाकडून सांगण्यात येईल…
शरद पवार पुन्हा एकवार भाकरी फिरवणार असल्याचे नक्की आहे त्यादृष्टीने त्यांच्या सभोवताली चर्चा बैठका सुरु झाल्यानेच अजित पवार यांनी मला प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल असे अगदी अलीकडे जाहीर सांगून टाकलेले असल्याने काकांच्या भुवया उंचावल्या आणि तिकडे अस्वस्थ जयंत पाटील झाले आहेत. तसेही आजवर अगदी स्थापनेपासून जे जे म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झालेत मग ते आर आर पाटील असतील किंवा छगन भुजबळ किंवा भास्कर जाधव असतील किंवा सुनील तटकरे किंवा मधुकर पिचड इत्यादी इत्यादी त्या साऱ्यात फार मोठा म्हणजे तब्बल पाच वर्षांचा कालावधी मिळून देखील सर्वाधिक निराशजनक कामगिरी जयंत पाटलांची असे अगदी उघड राष्ट्र्वादीतच बोलले जात असल्याने छगन भुजबळ यांनी जरी प्रदशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केलेली असली तरी ओबीसी नेतृत्व म्हणून आणि जयंत पाटील पद्धतीने बांधून ठेवण्यासाठी म्हणजे दगा देऊन पक्षांतर करू नये म्हणून त्याचवेळी अजित पवार यांना चेकमेट म्हणून मला वाटते धनंजय मुंडे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद चालून येऊ शकते पण मुंडे यांना विरोधी पक्ष नेता म्हणून निवडल्यास त्यानंतर शंभर टक्के फक्त आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. अजित पवारांच्या अंगावर थेट उडी घेऊन सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी भरभक्कम उभा राहणारा नेता एकमेव, जितेंद्र आव्हाड त्यामुळे अजितदादा यांचा मित्र धनंजय कि विरोधक जितेंद्र यातून एक नाव फायनल होईल. वास्तविक प्रत्येक नेत्याचे अनेक पाठीराखे असतात त्यामुळे या बडबड्या पाठिराख्यांकडून कधी राजेश टोपे यांचे नाव पुढे येते तर कधी अमोल कोल्हे कधी हसन मुश्रीफ तर कधी अनिल देशमुखांचे देखील नाव घेतल्या जाते पण मुंडे आणि आव्हाड या दोघात एक नाव नक्की फायनल होईल असे एकंदर मिळालेल्या माहितीवरून वाटते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी