ना शिंदे बावळे ना फडणवीस वेंधळे, उध्दव तुम्ही कसे मला कळले
सुषमा अंधारे आणि संजय राऊत त्याआधी मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेले अवास्तव वाजवीपेक्षा अधिक महत्व वरून उद्धव यांचा बेभरवशी स्वभाव व वृत्ती म्हणजे कुठल्या क्षणी कोणाला कडेवर घेतील आणि कोणाला जमिनीवर आढळतील, त्यामुळे उद्धव ठाकरे सभोवतालचे सेनेतले अनेक असंख्य बहुसंख्य बहुतेक सारेच विशेषतः 2015 नंतर अनेक बाळासाहेबांच्या हयातीत आणि बरेचसे बाळासाहेबानंतर प्रसंगी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची चिंता काळजी पर्वा अजिबात न करता बाहेर पडले आणि उद्धव यांना एकटे पाडले पण असंख्य प्रभावशाली शिवसेना नेते उद्धवपासून इतरत्र निघून गेल्यानंतर देखील मी बघा कायम एक भीती व्यक्त करीत होतो कि हे असे उद्धव एकाकी असले किंवा अगदीच लुळ्या पांगळ्या नेत्यांच्या भरवशावर त्यांची शिवसेना चालवीत असले तरीही उद्धव विरोधकांना विशेषतः भाजपाला जे नेमके साध्य करायचे होते ते त्यांना अगदी एकनाथ शिंदे यांना उद्धव पासून हिरावून देखील अजिबात साध्य झालेले नाही नव्हते म्हणजे उद्धव ठाकरे यांची सामान्य जनमानसात असलेली इमेज त्यांचा प्रभाव उद्धव सभोवताली विशेषतः राज्यातल्या त्यांच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या सभांना जमणारी अति प्रचंड गर्दी काही केल्या कमी होण्याची दूरदूरपर्यंत चिन्हे दिसत नव्हती आणि हेच उद्धव भाजपा विरोधी राजकीय पक्षांना बिलगले असल्याने भाजपच्या चिंतेचा आणि चिंतनाचा तो फार मोठा विषय होता, त्यावर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत अनेक राजकीय मार्ग चोखंदळून देखील भाजपा आणि उद्धव विरोधक अयशस्वी ठरत होते…
www.vikrantjoshi.com
माझे पुढले वाक्य आत्त्ता या ठिकाणी नोंद करून ठेवा, जी मोठी चिंता उद्धव यांच्या सामान्य माणसांवर जनतेवर मतदारांवर असलेया लोकप्रियतेची प्रभावाची उद्धव विरोधकांना म्हणजे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा राज ठाकरे किंवा प्रकाश आंबेडकर किंवा बच्चू कडू किंवा देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाला सतावत होती आता ती जवळपास मिटत चाललेली आहे, मिटली आहे असेही नक्की याठिकाणी म्हणता येईल. होय ! यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा सर्वसामान्य मराठी आणि अमराठी मतदारांवर असलेला राहिलेला प्रभाव नक्की निश्चित झपाट्याने वेगाने कमी होईल कारण भारतीय जनता पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या अतीव प्रेमापोटी अद्याप पर्यंत इतके दिवस न काढलेला भात्यातला सर्वोत्तम बाण आता आपल्या भात्यातून बाहेर काढून तो नेमका उद्धव यांच्यावर सोडला आहे आणि अलीकडे किरीट सोमय्या यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे उद्धव प्रेमींवर पडलेल्या धाडी हि तर केवळ एक झलक आहे, पुढल्या काही दिवसात आता उद्धव यांची देखील नेमकी नक्की सोनिया गांधी झालेली असेल, उद्धव यांना आणि त्यांच्या आप्तांना नातलगांना उद्धव यांच्या विविध व्यवहारात सामील असलेल्या अनेकांना तर त्यापलीकडे म्हणजे तोंड लपवत येणाऱ्या भीषण भयावह संकटांना सामना करीत कसेबसे आपले अस्तित्व तुरुंगाविना कसे ठेवता येईल याची मोठी काळजी त्या साऱ्यांना नक्की घ्यावी लागणार आहे, सत्य हे कडू असते त्यामुळे माझी हि माहिती कदाचित अनेकांना आवडणार नाही रुचणार नाही पचणार नाही पण मी येथे जे सांगितले नेमकी तीच उद्धव यांच्या राजकीय ह्रासाची आणि नेतृत्वाची सुरुवात आहे…
अलीकडे ज्यांना अपेक्षेपेक्षा अधिक देऊनही म्हणजे आमदार करूनही ज्या मनीषा कायंदे बाहेर पडल्या उद्या उरले सुरलेल्यांची सुरुवात कदाचित नीलम गोरे यांच्यापासून होईल विशेष म्हणजे जेव्हा थेट सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे शिवसेनेत सामील होतील, त्यावेळेच्या सुषमा आणि आताच्या सुषमा यात मोठा फरक तुम्हाला एवढा जाणवेल कि याच मनीषा कायंदे आणि सुषमा अंधारे एकत्र घेऊन, तुझ्या गळा माझ्या गळा, गातांना तुम्हाला दिसतील. उद्धव ठाकरे जर सहजासहजी यशस्वी माघार घेत असतील आणि शांत राहण्याची भूमिका जर ते घेतील तर बाळासाहेबांच्या या लाडक्या मुलास हात लावायचा नाही, असे त्यांच्या प्रभावी विरोधकांचे नक्की ठरलेले होते पण उद्धव यांना शरद पवार पद्धतीने राजकीय खेळी खेळून स्वतःचे अचानक आलेले ऐशवर्य नेमके टिकविता आले नाही त्यांना फाजील आत्मविश्वास नडला, उद्धव सभोवतालच्या उरलेल्यांचे देखील यादिवसात स्वतःचा जीव वाचविणाऱ्या माकडिणीसारखे नक्की झालेले आहे, त्यांनी आतून उद्धव विरोधकांना केव्हाच प्रेमाचा इशारा दिलेला आहे. अतिशय महत्वाचे म्हणजे आता यापुढे आणि पुढल्या कोणत्याही महत्वाच्या निवडणुका लागण्यापूर्वी जे नेमके कर्नाटकात घडले तेच महाराष्ट्रात घडणार नाही याची काळजी भाजपाला घ्यावी लागणार आहे कारण कर्नाटक पद्धतीने आपल्या राज्यात देखील मस्जिदी मधून फतवा निघणार आहे कि इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मुस्लिमांनी अजिबात मतदान न करता आपले मतदान त्यांनी फक्त आणि फक्त काँग्रेस उमेदवारांना करावे त्यामुळे उद्या थेट अब्दुल सत्तर किंवा एमआयएम यांना देखील मुस्लिमांचे मतदान होणार नाही, उद्धव नंतर मुस्लिमांचे काँग्रेसला एक गठ्ठा मतदान हे देखील भाजपासाठी मोठ्या चिंतेची बाब आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी