वातावरण तापले संदर्भ बदलले राजकारण सडले
13 आणि 14 तारखेला म्हणजे दोन दिवस लागोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्रास उल्लू बनवून त्याच्या या दिवसातल्या अस्वस्थ मनाचा गैरफायदा घेऊन श्रीकांत आणि एकनाथजी यांच्या आसपास अरविंद शाह यांच्यासारखे जे अनेक संधीसाधू लबाड घातक नासलेले सडके मित्र मंडळ जमा झालेले आहे त्यापैकी एक दोघांनी खासदार श्रीकांत यांना अक्षरश: उचकवून त्यांची मुद्दाम दिशाभूल करून आणि स्वतःचे महत्व स्वार्थ व दबाव वाढविण्यासाठी ज्या विविध वृत्तपत्रातून एकनाथ हे कसे मोठे आणि फडणवीस कसे लहान दर्शविणार्या ज्या जाहिराती छापून आणल्या गेल्या त्यातून पुन्हा एकवार राज्याची राजकीय समीकरणे पूर्णतः बदलून गेली आहेत म्हणजे दोनच दिवस आधी ज्या पद्धतीने शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय कलगीतुर्यातून जशी राष्ट्रवादी आणि राजकारणातली समीकरणे बदलली होती त्याच वेगवान पद्धतीने विशेष म्हणजे कारण नसतांना खासदार श्रीकांत यांच्या पुत्र हट्टापायी लगेचच इकडे भाजपा आणि शिंदे सेना युतीची राजकीय गणिते आणि समीकरणे बदलली बिघडली. मी जे लिहितो जे बोलतो त्यातले प्रत्येक वाक्य तुम्ही वाचक अतिशय काळजीपूर्वक आधी वाचा नंतर डोक्यात ठेवत चला कारण त्यात अनेक विविध भविष्यातले राजकीय बदल नेमके वर्तविलेले असतात जसे मी जे अजित पवार यांच्याविषयी सांगितले नेमके ते तसेच केवळ दोन दिवस त्यांच्याविषयी घडले, घडून येतांना दिसते आहे. एका झटक्यात एका फटक्यात एका दणक्यात एका क्षणात एका लाथेत एका निर्णयात त्या काका शरद पवार यांनी आधी अजित पवार यांची मस्ती उतरवली नंतर त्यांना ठिकाणावर आणून कामाला लावले. मला सतत आणि कित्येक वर्षांपासून तू जे सतत इमोशनल ब्लॅकमेल करतो आहेस, तुला राजकारणातुन बाजूला टाकणे किंवा संपविणे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे असे पुतण्या अजित पवार यांना सूचना करीत शरद पवार यांनी अजित यांचे टाळके आधी ठिकाणावर आणले आणि केवळ या आठ दिवसातच तुमच्या ते लक्षात आले असेल कि अजित पवार सुतासारखे सरळ झालेले असून आता ते राष्ट्रवादीचे नमलेले शमलेले एक शांत आणि प्रामाणिक नेते जणू, पद्धतीने लोकांना कार्यकर्त्यांना समस्त मीडियाला सामोरे येतांना दिसताहेत…
www.vikrantjoshi.com
आणि नेमके हुबेहूब याच पद्धतीचे वागणे बोलणे तुम्हाला यानंतर नक्की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वागण्यातून नक्की जाणवणार असले तरी यापुढे शिंदे सेना आणि भाजपा फडणवीस यातील नाते व वातावरण कायम शंभर टक्के एकमेकांशी संशयाचे आणि सावध राहण्याचे असणार आहे हे तुम्ही सारे येथे लिहून ठेवा. नवरा चालू आहे बाईलवेडा आहे अशी का एकदा बायकोने आपल्या नवऱ्याविषयी समजून करवून घेतली कि ती आपल्या नवऱ्याला त्याच्या तरुण बहिणीसोबत देखील एकटे पाठवायला तयार नसते हे असे हुबेहूब वातावरण शिंदे आणि फडणवीस यांच्यात नक्की असणार आहे जरी आज हे जाहिरातींमुळे तापलेले वातावरण शांत झालेले असले तरी. एक महत्वाचे सांगतो कि आपल्या या राज्यात आणि संपूर्ण देशात मुंबईतल्या एका त्यावेळेच्या अग्रगण्य दैनिकाच्या मालकाने कम संपादकाने 1990 दरम्यान आमच्याकडे बातमी हि जाहिरातींसारखी छापल्या जाईल असे सांगून केवळ बातम्या छापून त्याकाळी जे करोडो रुपये कमविले आणि हि असली घाणेरडी बातम्यांतून पैसे कमविण्याची सवय जी देशातल्या अख्य्या मीडियाला लावून ठेवली ते तसेच यापुढे शिंदे पिता पुत्राच्या या जाहिरात प्रकारामुळे नवा प्रकार मीडियात नक्की जन्माला येणार आहे म्हणजे एखाद्या जाहिरातीवरून राज्यात आणि देशात कशी खळबळ माजून एखादी मोठी व महत्वाची बातमी तयार केली जाऊ शकते, हा नवा प्रकार या दोघांनी 13 जूनच्या एका जाहिरातीतून मीडिया साठी जन्माला घातला जो प्रकार यापुढे झपाट्याने वाढू शकतो एवढी ती जाहिरात अनेक राजकीय उलथापालथी घडवून आणणारी ठरली, शिंदे सेना आणि फडणवीस यांच्यातील राजकीय समन्वय न साधला गेल्याने तरुण व तडफदार खासदार श्रीकांत शिंदे आधी ठाणे जिल्ह्यातील आपापसातल्या म्हणजे शिंदे सेना व भाजपा मधल्या धुसफुसीला कंटाळले त्यातून त्यांना त्यांच्या व एकनाथ यांच्या सभोवताली जे अनेक अत्यंत नालायक मित्रमंडळ कोंडाळं करून उभे आहे त्यातील दोघा तिघांनी पाहुण्याच्या काठीने साप मारण्याची हलकट नीच पद्धत अमलात आणून श्रीकांत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नको ती जाहिरात छापून आणली आणि शिंदे सेना व भाजपा या दोघांमध्ये त्या नालायकांनी नको त्या नाजूक क्षणी हागुन ठेवले घाण केली आणि विनाकारण राजकीय वातावरण तापवून मोठे गैरसमज त्यांनी करवून ठेवले. एकनाथ व श्रीकांत शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वादातून ठिणगीचे वातावरण बघता बघता आगीत रूपांतर झाले आणि अत्यंत महत्वाचा विषय पुनः बाजूला पडला म्हणजे त्या पाच नालायक मंत्र्यांचा आणि आणखी काही नीच भ्रष्ट मंत्र्यांचा विषय बाजूला पडला त्यांची चांदी झाली…
अपूर्ण : हेमंत जोशी