राशीला साडेसाती कटकटी आणि डोकेदुखी
मी या लेखात देवेंद्र फडणवीसांविषयी आगळी वेगळी माहिती देणार आहे जी अजिबात खोटी नाही किंवा देवेन्द्रजी आणि त्यांच्या आसपास सावलीसारखे म्हणजे रामाच्या सीतेसारखेसतत जवळ असणाऱ्या त्या पद्धतीने वागणाऱ्या दिलीप राजूरकर केतन पाठक किंवा भावी आमदार सुमित वानखेडे यांना देखील अमान्य करून चालणारी नाही एवढी ती भन्नाट असेल तुम्ही न ऐकलेली असेल कदाचित !! अलीकडे मी लागोपाठ तीन वेगवेगळ्या देशात म्हणजे परदेशात जाऊन आलो, फिरतांना अनेक मराठी आणि भारतिय भेटले भेटतात, सांगून खोटे वाटेल कदाचित देवेंद्र यांच्यावर जेलस असणाऱ्यांना पण जे जे मला भारतात किंवा भारताबाहेर भेटतात किंवा भेटले जेव्हा त्यांना मी राजकीय पत्रकारितेत आहे सांगतो मला ते हमखास आधी नरेंद्र मोदी आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांविषयी नक्की विचारतात आणि जेव्हा मी त्यांना देवेंद्र विषयी जराशी वेगळी माहिती देतो सांगतो ऐकतांना ते सारे देहभान विसरून, कान देऊन ऐकतात विशेष म्हणजे वयापेक्षा देवेंद्र अधिक तरुण दिसत असल्याने तरुणी तर अधिक आस्थेने चौकशी करतात मन लावून ऐकतात. आपल्या ओळखीचे देवेंद्र हे असे मोदी यांच्या नंतर जगमान्य लोकमान्य आहेत, बघून ऐकून उर आनंदाने नक्की भरून येते. देवेंद्र फडणवीसांचा एक फार फार मोठा ड्रॉ बॅक आहे जो मोदींनी अगदी सुरुवातीला भरून काढला म्हणून मोठे होताना त्यांना अधिक सोपे गेले जे फडणवीसांना नेमके नक्की कठीण जाते आहे.जसे मोदी यांना एक जिवाभावाचा प्रसंगी जीवावर उदार होऊन मोदी यांना घट्ट बिलगून राहणारा म्हणाल तर सखा म्हणाल तर सहकारी म्हणाल तर भक्त आणि म्हणाल तर संताजी धनाजी, दुर्दैवाने हा असा आक्रमक धाडसी ध्येयवेडा अमित शाह अद्याप आजपर्यंत फडणवीसांना गवसला नाही थोडक्यात फडणवीसांकडे एकच कमी आहे ती अमित शहा सारख्या जिवलगाची जीव देण्याची तयारी असलेल्या पंगेबाज मित्राची…
www.vikrantjoshi.com
देवेंद्र फडणवीस सत्तेत आले, आल्या आल्या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उराशी बाळगलेली आणि बघितलेली तीन स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याची मनापासून ठरविले आणि ते मुख्यमंत्री झाल्या झाल्या कामाला लागले, अगदी झपाट्याने त्यांनी ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली त्यादृष्टीने तयारी सुरु केली. विशेष म्हणजे अलीकडे ते या राज्याचे उप मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील ती तीन स्वप्ने पूर्ण करण्या झटत आहेत होते, अर्थात नरेंद्र मोदी यांची त्यासाठी परवानगी मदत आणि मनापासून सहकार्य अत्यावश्यक होते, मोदी यांचा हात पाठीवर असल्याशिवाय एकट्या देवेंद्र यांना ती तिन्ही किंवा त्यातले कुठलेही एक स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे अशक्य होते, म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस मोदी यांना प्रत्यक्ष भेटीत तेही नेमकी कागदपत्रे हाती घेऊन भेटले आणि म्हणाले, मला तुम्ही मुख्यमंत्री केले पण मला या राज्यासाठी जर हि तीन कामे पूर्ण करता आली नाहीत तर माझे पद हे व्यर्थ गेले असे मला आयुष्यच्या अखेरपर्यंत राहून राहून वाटेल आणि ती तीन स्वप्ने होती, मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग, नागपुरातले नॅशनल कँसर इन्स्टिट्यूट आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यापैकी समृद्धी महामार्ग जवळपास पूर्ण झाला आहे त्यानंतर नागपुरातले कँसर इन्स्टिटयूट देखील केव्हाच पूर्ण होऊन लोकसेवेत दाखल करण्यात आले आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणूक भाषणातून ते अभिमानाने नक्की सांगतील कि नरेंद्र आणि देवेंद्र यांनी नवी मुंबई विमानतळ हि महाराष्ट्राला दिलेली मोठी गिफ्ट आहे, असे हे देवेंद्र जी मोठी स्वप्ने ते बघतात त्यानंतर झपाट्याने त्या स्वप्नांना प्रत्यक्षात नक्की उतरवून मोकळे होतात म्हणून जगभर नरेंद्र नंतर देवेंद्र यांच्याच नावाची चर्चा असते ज्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते…
अपूर्ण : हेमंत जोशी