भ्रष्ट व दुष्ट बांधकाम खाते : पत्रकार हेमंत जोशी
यावेळी न जिंकता ते सत्तेत आले पण पुढल्या विधानसभा निवडणूका स्वबळावर जिंकून जर महाघाडीला पुन्हा सत्तेत यायचे असेल तर एकटे अशोक चव्हाण शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर घटक पक्षांना हे यश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलू शकतात पण वेळ निघून चाललेली आहे केवळ शरद पवार सोडल्यास इतरांच्या पायाखालची वाळू झपाट्याने घसरते आहे पवार मात्र चतुर आहेत त्यांना इतरांना वापरून घ्यायचे आणि आपले भले कसे करायचे चांगले जमते, सध्या देखील ते तेच करताहेत नाही म्हणायला काँग्रेसच्या मंत्र्यांच्या व नेत्यांच्या पवारांची हि चतुराई लक्षात येते आहे पण सत्तेचा मोह राज्यातल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांना आवारत नाही नेमके हेच प्रमुख नेते दिल्लीच्या जवळ आहेत वरून मंत्रिमंडळात आहेत पण समजून उमजून देखील केवळ सत्तेच्या पैशांच्या मोहापायी हे नेते सत्तेतून महाआघाडीतून अजिबात बाहेर पडायला तयार नाहीत आणि सत्ता तर एखाद्या बाईला बिलगलेल्या कामांध पुरुषासारखी असते म्हणजे त्या पुरुषाला हे माहित असते कि झोंबलेल्या बाईला एड्स आहे तरीही त्याची मिठी जशी सैल होत नाही पडत नाही तसे या नेत्यांचे व मंत्र्यांचे या राज्यात झालेले आहे त्यांना सत्तेवाचून राहवत नाही सत्ता त्यांना सोडवत नाही इकडे त्यांच्या व शिवसेनेच्या याच लोभी वृत्तीचा नेमका फायदा शरद पवार घेताहेत, पुढे फायदा फक्त आणि फक्त त्यांना व त्यांच्या राष्ट्रवादीलाच होणार आहे हे नक्की आहे…
जे नितीन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री या नात्याने राज्यात करून दाखवले होते आणि युतीला मोठे यश विधानसभेला मिळवून दिले होते किंवा जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री या नात्याने छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात केले होते आणि तुरुंगात जाऊन देखील आजतागायत ते व त्यांचे कुटुंबीय सत्तेची फळे चाखताहेत तेच किंवा त्या पेक्षा मोठे काम सद्य परिसस्थितीत याच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून प्रचंड अनुभवी व उच्चशिक्षित अशोक चव्हाण यांना एव्हाना केव्हाच सुरु करता आले असते दुर्दैवाने आधीच वाईट अनुभव गाठीशी असतांना देखील चव्हाण नेमका फायदा उचलतांना अद्याप अजिबात दिसलेले नाहीत आणि येथे त्यांचे फार मोठे चुकते आहे, काम करून देखील वैयक्तिक पैसे मिळविता येतात हे नितीन गडकरी यांनी दाखवून दिले आहे विशेष म्हणजे गडकरी यांनी बांधकाम खात्याचे मंत्री या नात्याने १९९५ ते २००० दरम्यान या खात्याच्या माध्यमातून लोकांची सेवा केली पुढे केवळ याच गडकरी यांच्या कामांवर प्रभावित होऊन मतदारांनी पुन्हा युतीला कौल दिला दुर्दैवाने त्यांना सत्ता हाती घेता आली नाही तो भाग वेगळा पण २००० नंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार नितीन गडकरी हेच होते तेच छगन भुजबळ यांनी केवळ त्यांच्या नाशिक शहरात व जिल्ह्यात केले त्यांनी आपल्या शहरात जिल्ह्यात मोठाले पूल बांधले रस्ते चांगले केले परिणाम ते तुरुंगात जाऊन देखील पुन्हा निवडणूक जिंकून सत्तेत बसले, एखाद्या नापास विद्यार्थ्याला देखील पुढल्या वर्गात प्रवेश मिळावा तसे भुजबळ व कुटुंबियांच्या बाबतीत घडले…
उद्धवजी व अशोकराव तुम्ही हे करून दाखवा किंवा म्हणा तर कि सारी कामे गेली खड्ड्यात आधी लगीन राज्यातल्या रस्त्यांचे पुलांचे मग इतर खात्यांचे आणि बघा राज्यातली जनता तुम्हाला कशी डोक्यावर घेते. ज्या देशातले ज्या राज्यातले रस्ते चांगले नाही तो देश किंवा ते राज्य प्रगती करणे अशक्य. जगातले सारे प्रगत देश झपाट्याने पुढे गेले त्यावर एकमेव कारण म्हणजे तेथे मोठाले रस्ते आहेत रस्ते उत्कृष्ट दर्जाचे आहेत, येथे या राज्यात कोठेही जा एकतर रस्ते फार लहान आहेत आणि बहुतेक ठिकाणी खड्ड्यात रस्ते आहेत, भलेही, बांधा आणि हस्तांतरित करा पद्धतीने राज्यातल्या मार्गांचा आणि महामार्गाचा विकास करा पण सारी कामे बाजूला ठेवून उद्धवजी व अशोकजी तुम्ही दोघेही आधी बांधकाम खात्यातील अभियंत्याना, कंत्राटदारांना तसेच बांधकाम खात्यातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना धारेवर धरा आणि रस्त्यांचे तेवढे बघा कारण जनता दरदिवशी दरक्षणी तुम्हाला याचसाठी शिव्याशाप देऊन मोकळी होते आहे कारण रस्ते चांगले नाहीत, मोठाले नाहीत त्यामुळे जो तो घराबाहेर पडल्यानंतर जीव मुठीत घेऊन आणि मेटाकुटीला येईपर्यंत प्रवास करतो आहे त्याच्या शरीराचे व गाड्यांचे त्यातून कंबरडे मोडते आहे, सत्तेत येऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ केव्हाच संपलाय मात्र उरलेल्या चार वर्षात अशोकजी, एकनाथ शिंदे आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी तातडीने जातीने लक्ष घालून आधी बांधकाम खात्यावर जरब बसवावी नंतर अतिशय झपाट्याने गडकरींच्या वेगाने कामाला सुरुवात करावी, माझे वाक्य लक्षात ठेवा केवळ या एकमेव खात्याच्या भरवशावर जनता तुम्हाला निवडून आणेल व पुन्हा एकवार सत्तेत बसवेल अन्यथा तुमचे वाटोळे नक्की ठरलेले आहे. केवढे दुर्दैव या राज्याचे कि नितीन गडकरी यांच्यासारखा बांधकाम खात्याचा मंत्री किंवा आर आर पाटील यांच्यासारखा ग्राम विकास खात्याला पुन्हा एकवार मंत्री मिळू नये, अशोकराव व एकनाथजी हि सुवर्ण संधी सोडू नका, एकनाथजी तुम्हीही सतत पैसे पैसे करू नका, खूप आहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी