काळोख राज्यातला राजकारणाचा आगाऊपणा झारीतल्या शुक्राचार्यांचा
मंत्री अतुल सावे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि राज्याच्या अतिशय महत्वाच्या विभागाचे म्हणजे सहकार खात्याचे ते मंत्री आहेत, सुरुवातीला ते मंत्री झाल्यानंतर काही दिवस मी त्यांच्या एकंदर कार्यपद्धतीवर वागण्यावर टीका करीत असे पण एक दिवस याच अतुल सावे यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या राज्यातल्या दोन फार मोठ्या भाजपा नेत्यांनी मला अगदी बोलावून सांगितले कि सावे माणूस चांगला आहे,सहकार सारख्या अतिशय भ्रष्ट आणि बिलंदर खात्याचा त्यांना अद्याप फारसा अभ्यास नसल्याने काही चुका जर सावे यांच्या हातून घडल्या तर त्या थेट जाहीर न करता व्यक्तिगत त्यांना त्या सुधारायला सांगा, ते नक्की त्यावर गांभीर्याने दखल घेतील, त्यानंतर आजतागायत मला व्यक्तीश: अनेकदा असे जर काही आढळले तर मी त्यांना त्यावर सावध करतो. येथे या ठिकाणी अतुल सावे यांचा विषय यासाठी निघाला कि अलीकडे त्यांच्या सहकार खात्यातील काही महत्वाच्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडे प्रत्यक्ष भेटून अशी तक्रार केली कि अतुल सावे यांच्या सभोवताली आसपास चोवीस तास सतत पक्षाचे एखादे दोन पदाधिकारी आणि सरकारी अधिकारी असे ठाण मांडून बसले आहेत कि ते सावे यांच्या नकळत आम्हाला फोन करून आमच्यावर सतत दबाव टाकून आमच्याकडून एकतर खंडणी वसूल करतात किंवा फायद्याची कामे करवून त्यावर रग्गड पैसे मिळवितात जर त्यांना अशी आर्थिक दाद दिली नाही तर त्यातले काही महा बिलंदर थेट वृत्तपत्रांना किंवा वृत्त वाहिन्यांना हाताशी धरून आमच्यावर अतिशय खालच्या पातळीवर येऊन टीका करतात आणि आम्हाला ब्लॅक मेल करतात ज्यातून अंधारात असलेल्या अतुल सावे साहेबांची मोठी बदनामी होते…
www.vikrantjoshi.com
सहकार खात्यातील काही जे अधिकारी सावे यांच्या सभोवताली घुटमळणार्या मंडळींना बळी पडले आहेत, त्यावर मला अलीकडे अशा पद्धतीने प्रसारित झालेला एका खाजगी वृत्तवाहिनीचा व्हिडीओ दाखविला आणि ज्या अनेक प्रकरणात विशेषतः पुणे ठाणे मुंबई जिल्ह्यातील काही सहकार खात्यातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामे सांगण्यात किंवा करवून घेण्यात आली त्यावर मला पुरावे देखील सांगितले उघड केले. मंत्री कार्यालयातील कुठल्याही महत्वाच्या स्टाफला किंवा सावे सभोवताली घुटमळणार्या या कार्यकर्त्यांना कि मित्रमंडळींना अतुल सावे एवढ्या खालच्या थरावर येऊन केवळ पैसे मिळविण्यासाठी या पद्धतीने आपल्या स्वतःच्या खात्यात नक्की धुडगूस घालायला लावणार नाहीत पण त्यांच्या नकळत हे जे अगदी सऱ्हास घडते आहे ज्याला सहकार खात्यातले अधिकारी विशेषतः खूप त्रासले आणि कंटाळले आहेत त्यावर सावे यांनी व्यक्तिगत लक्ष घालून आपली कामे न झाल्यास वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रांना माहिती देऊन सहकार खाते पर्यायाने अतुल सावे यांची बदनामी होते आहे, तातडीने या अशा झारीतल्या शुक्राचार्यांना शोधून त्यांना एकतर हाकलून लावणे किंवा दूर ठेवणे अतिशय आवश्यक ठरते आहे. पत्रकारिता करतांना मनाशी एखादे मिशन ठरवुन त्यावर सतत प्रयत्न करणे किंवा काम करणे माझे स्वप्न होते आणि ते एकनाथ शिंदे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी बरयापैकी पूर्ण केले, अनेक निर्णय किंवा कार्यपद्धती अनेकदा आपल्या माझ्या मनासारखी घडतांना दिसत नाही पण त्यावर लगेच रुसून फुगून शिंदे आणि फडणवीसांच्या हात धुवून मागे लागणारा मी चंचल पत्रकार नाही किंबहुना अनेकदा काही नेत्यांवर मी मनापासून प्रेम करतो म्हणून त्यांच्यावर टीका करतो उदाहरण उद्धव ठाकरे यांचे, त्यांनी हिंदुत्व सोडून आणि मराठी माणसाला रांडेसारखे वापरून व्यक्तिगत फायदे घेत जेव्हा राज्याची वाट लावायला सुरुवात केली, अशावेळी ते मुख्यमंत्री असतांना देखील मी अनेकदा उद्धव यांना त्यांची जागा दाखवून दिली…
अत्यंत महत्वाचे म्हणजे जे कदाचित राज्यातल्या सामान्य मतदाराला नक्की माहित नसेल कि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे माझया आजवरच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ अनुभवातले त्या शरद पवार यांच्यासारखे असे अभावाने सापडणारे नेते आणि राज्यकर्ते आहेत कि या तिघांना कधीही आराम करणे अजिबात अजिबात ठाऊक नाही किंबहुना असे कष्ट करणारे अविरत काम करणारे आराम अजिबात न करणारे नेते फार अभावाने जन्माला येतात, अशावेळी आजही या तिघांत जर एखाद्याचे चुकले तर मी त्यांना न डगमगता न डरता होणाऱ्या चुका त्यांच्या नजरेस आणून ठेवतो. अगदी अलीकडेच मी शिंदे यांच्या कार्यालयात अतिशय मोठ्या आणि महत्वाच्या पदावर काम करणाऱ्याला सांगितले कि एकनाथजी यांच्या भोवताली विशेषतः त्यांच्या निवासस्थानी जो काही बदमाश आमदारांचा काही बदमाश मुंबईकरांचा आणि काही अति बदमाश ठाणेकरांचा वेढा पडला आहे त्याला दूर करून यापुढे एकनाथ यांनी जर काम केले नाही तर पुढे ते देखील एखाद्या गंभीर प्रकरणात अडकण्याची खूप मोठी दाट शक्यता आहे अर्थात एकनाथ यांचे एकदम स्पष्टवक्ते असलेले खासदार चिरंजीव श्रीकांत यांच्याही ते लक्षात आले आहे आणि माझया माहितीनुसार श्रीकांत यांनी झाडू हाती घेऊन काही मंडळींना हाकलायला सुरुवात केलेली आहे, बघूया भविष्यात कोणते बदल ते घडवून आणतात…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी