सुषमा अंधारे काळोख करतील आडनावाप्रमाणे…
सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे उद्धव सेनेतील दुल्हे राजा सिनेमा सारखे जॉनी लिव्हर म्हणून उद्धव गटात काम करतात हा जो त्या दोघांवर अगदी थेट किंवा जाहीर आरोप सतत केल्या जातो तो आरोप मनाला पटावा इतपत विशेषत: सुषमा अंधारे यांचे वर्तन आणि वागणूक अलीकडे संशयास्पद वाटू लागलेली आहे. वास्तवात कादर खान कडे नोकरी करणारा जॉनी लिव्हर प्रत्यक्षात मात्र कादर खान याचा कट्टर शत्रू सिनेमाचा हिरो गोविंदा याचा हेर दूत दोस्त खास माणूस म्हणून काम करत असतो, आपला मालक आपल्यामुळे अधिकाधिक कसा अडचणीत येईल किंवा गोविंदा कसा खुश होईल हे काम कादर खान याच्या नकळत बेमालूमपणे थोडक्यात कादर खान याचे खाऊन त्यालाच उल्लू मूर्ख बनवत जॉनी लिव्हर अनेकांचे मनोरंजन करतो, सिनेमा बघायला सुसह्य करतो, येथे सुषमा अंधारे या हुबेहूब राजकारणातल्या आणि गोविंदा शरद पवार आणि कादर खान आणि उद्धव ठाकरे या दोघातल्या या दिवसातल्या जॉनी लिव्हर आहेत त्याच पद्धतीने त्यांचे राजकारण खेळणे सुरु आहे असे अलीकडे राहून राहून वाटायला लागले आहे किंबहुना हकालपट्टी करण्यात आलेले उद्धव सेनेचे आप्पासाहेब जाधव यांनी जे आपल्या मुलाखतीत सांगितले तेच आता शम्भर टक्के सत्य आहे याची हळूहळू जेव्हा खात्री पटायला लागलेली असतांना उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या जाळ्यात एखाद्या माशासारखे अलगद अडकले असून त्यांची धावपळ फजिती अस्वस्थता तडफड आता बघवत नाही, पण धरले तर चावते आणि सोडले तर पळते, असे उद्धव यांचे सुषमा अंधारे बाबतीत नेमके घडलेले असल्याने झालेल्या गुप्तरोगाला अंधारात बसून कुरवाळत बसण्यापलीकडे उद्धव ठाकरे यांच्या हातात आता सध्या अलीकडे यादिवसात फारसे काहीही उरलेले नाही…
इंग्रज जसे मोठ्या खुबीने युक्तीने चलाखीने आधी भारतात घुसले नंतर त्यांनी अख्खा देश ताब्यात घेतला ते तसेच सुषमा अंधारे यांचे म्हणजे भारत आर्थिक दृष्ट्या खंगलेला आणि मोगलांच्या छळामुळे गांजलेला असतांना जसे ख्रिश्चन मिशनरी मोठ्या खुबीने हिंदू कुटुंबाच्या हलाखीचा मजबुरीचा नेमका फायदा उचलत त्यांचे धर्मांतर घडवून आणतात त्याच पद्धतीने चलाख इंग्रज भारतात घुसले आणि रंजल्या गांजलेल्यांच्या पाठीवर थाप मारत अनेक भारतीयांना आधी आपलेसे केले नंतर भारताला गुलाम बनविले, जेव्हा उद्धव फार मोठ्या राजकीय संकटातून आपली नैय्या कशीबशी काठाला लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते आणि झपाट्याने अनेक नेते त्यांच्यापासून दूर निघून जात होते, त्यादरम्यान जे बोलल्या जाते त्यापद्धतीने मोठ्या खुबीने शरद पवार यांनी राज्यात अतिशय डोईजोड ठरलेल्या उद्धव सेनेकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कमालीच्या धूर्त कावेबाज धडाकेबाज आणि ठासून वक्तृत्व भरलेल्या सुषमा अंधारे यांना अलगद मोठ्या युक्तीने उद्धव यांच्या गटात पाठवून दिले आणि इंग्रजांपद्धतीने सुरुवातीला फायदा दिसणार्या सुषमा अंधारे या आज आपण आहोत त्या पेक्षा भविष्यात अधिक खड्ड्यात टाकून मोकळ्या होतील हे एरवी स्वतःला राजकारणातले चाणक्य समजणारया उद्धव यांच्या ते अजिबात लक्षात आले नसावे आणि त्यानंतर उद्धव यांच्या हातून जे घडले ते अधिक खतरनाक आणि नुकसानदायी ठरले, ठरण्याची दाट,अधिक, खूप,मोठी शक्यता आहे. अनेक प्रभावी नेते थेट उद्धव यांना सोडून जात असतांना सुभाष देसाई, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे लीलाधर डाके सारखे काही नेते कठीण परिस्थितीत उद्धव यांना आणि त्यांच्या मोडकळीस आलेल्या शिवसेनेला घट्ट बिलगून चिटकून चिपकून पकडून राहिले मात्र उद्धव यांनी न सोडून जाणार्या या नेत्यांनाही केराची टोपली दाखवत विशेष म्हणजे मनीषा कायंदे किंवा नीलम गोर्हे पद्धतीच्या आक्रमक प्रामाणिक लॉयल महिला नेत्यांना देखील उद्धव ठाकरे यांनी बाहेरून आलेल्या वाचाळ चंचल बेलगाम बेभरवशाच्या सुषमा अंधारे यांच्या समोर अतिशय निष्प्रभ करून सोडले आणि या काल परवा घुसलेल्या अंधारे बाई यांना वाजवीपेक्षा अधिक महत्व देत त्यांना थेट आपल्या शेजारी बसवत इतर नेत्यांची पंचाईत केली कुचंबणा केली. सुषमा अंधारे विषयी अधिक धक्कादायक आणि व्यापक पुढल्या भागात….
क्रमश: हेमंत जोशी