कर्नाटकात काँग्रेस जिंकली पेक्षा भाजपाची जिरली…
कर्नाटकातल्या विधान सभा निवडणूक निकालांवरून महाराष्ट्रातल्या भाजपा आणि भाजपा प्रणित युतीचा थेट राजेश खन्ना होईल म्हणजे राज्यातली भाजपा आणि युती देखील येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर थेट देवाघरी निघून जाईल नो व्हेअर होईल असे नक्की नाही पण आजची महाराष्ट्रातली भाजपा आणि युती त्यांची अवस्था एकेकाळी कर्करोगाला बळी पडलेल्या अभिनेता शरद पोंक्षे किंवा संजय दत्त किंवा अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासारखी आज नक्की निश्चित आहे पण त्या तिघांनी ज्या हिमतीने थेट मृत्यूशी म्हणजे कर्करोगाशी सामना करून मृत्यूवर विजय मिळविला नेमके ते तसेच राज्यातल्या भाजपा आणि युतीला येणाऱ्या होणाऱ्या राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत पद्धतशीर प्लॅनिंग करून अचानक आलेल्या संकटातून बाहेर पडावे लागणार आहे जे त्यांना झालेल्या चुका सुधारून आणि पुढे न करता तशी शपथ घेऊन त्यापद्धतीने अगदी तातडीने जनतेसमोर यावे लागणार आहे, पुढला विजय तेवढा कठीण नाही पण आता तो कर्नाटकच्या एकंदर निकालांवरून तसा सोपा नक्की राहिला नाही. मंत्री मंडळ विस्तार अति तातडीने करणे पण विस्तार करतांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये जे सध्याचे अनेक अतिशय नालायक भ्रष्ट उद्धट निर्ढावलेले राज्याला विकायला निघालेले मंत्री आहेत त्यांना जरी डच्चू देणे शक्य नसले तरी किमान त्यांच्याकडली महत्वाची खाती काढून त्यांना फारशी महत्वाची नसलेली खाती सुपूर्द करून ताळ्यावर आणणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा उद्या असे घडता कामा नये कि जे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना जमणार नाही ते काम माझ्यासारख्यांना हाती घेऊन संजय राठोड यांच्यासारख्या बेशरम मंत्र्यांच्या भानगडी जनते समोर आणून अशांना त्यांची नेमकी जागा दाखवावी लागेल. प्रखर हिंदुत्व हा माझा मुख्य आत्मा आहे त्यामुळेच आपल्या या महाराष्ट्रात जे नेते जो पक्ष जे सरकार हिंदू धार्जिणे असते त्यांच्या उत्तम कामांची बाजू घेऊन अशांच्या बाजूने लढणे त्यांना विना अपेक्षा पाठिंबा व साथ देणे मी कायम माझ्या पत्रकारितेचा खरा धर्म समजत आलेलो आहे पण जी प्रेयसी झाली तीच नेमकी रस्त्यावरची वेश्या निघाली असे जर अगदी सध्याच्या युतीची अवस्था होत असेल तर शब्दांचे प्रहार करीत राहणे नक्की आवश्यक ठरते…
www.vikrantjoshi.com
काही केल्या गेल्या कित्येक महिन्यांची हगवण थांबत नव्हती पण ती अचानक एखाद्या वैद्याच्या औषधाने थांबावी ते तसे महाराष्ट्रातल्या महाआघाडीच्या कर्नाटक विधानसभा निकाल लागल्या नंतर झालेले आहे म्हणजे राज्यातली महाआघाडी चारही बाजूंनी अडचणीत संकटात सापडलेली होती. काँग्रेसचे राष्ट्रवादीशी जमत नव्हते तर राष्ट्रवादी उद्धव सेनेला परेशान करून मोकळी झाली होती राज्यातले इतर काही लहान लहान घटक पक्ष नाही म्हणायला राज्यातल्या महाआघाडीकडे जरी होते तरी ते सारे कुंपणावर बसून आहेत हे सहज लक्षात येत होते, महाआघाडीतले अनेक थेट अजित पवार यांच्यासहित केव्हाही भाजपात जाऊन बसतील हे तसे आपण सारेच अगदी उघड्या डोळ्यांनीबघत होतो विशेष म्हणजे एकाच पक्षातल्या नेत्यांचे आपापसात अजिबात जमत नव्हते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचे महाआघाडीतले आणि त्यांच्या पक्षातले उघड शत्रू बघून त्यापेक्षा शिंदे फडणवीस सुखी आहेत असे म्हणण्याची वेळ आली होती किंवा अजूनही परिस्थिती विशेष वधारली सुधारलेली आहे असे अजिबात नाही, तिकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत तर अशी परिस्थिती आहे होती कि उद्या जर रश्मी ठाकरे यांनी जरी लेकरांना कडेवर घेऊन उद्धवसेना सोडली तरी मला फारसे आश्चर्य वाटले नसते. शेळ्या राखणारा मेंढपाळ जसा सकाळी उठला कि आधी जशी आपल्या शेळ्या मेंढ्या जागेवर आहेत किंवा नाहीत म्हणून जिवाच्या आकांताने अगदी सकाळी परसाकडे देखील न जाता आधी मोजणी करून मोकळा होतो आणि एखादी जरी शेळी किंवा मेंढी कमी झालेली असेल तर जसा धाय मोकलून रडत बसतो त्यापेक्षा शरद पवार यांचे काहीही वेगळे नाहीनव्हते म्हणजे सकाळी उठल्यानंतर म्हणे राष्ट्रवादी किंवा महाआघाडीतले किती कमी झाले त्यावर त्यांची गिनती सुरु होते. थोडक्यात काय तर कालपर्यंत आपल्या या राज्यात महाराष्ट्रात ज्या महाआघाडीच्या अवस्था खंगलेल्या क्षय रोग्यासारखी होत चाललेली होती, कर्नाटकातले निकाल बघून ऐकून अचानक महाआघाडीच्या सार्या खंगलेल्या गांजलेल्या नेत्यांमध्ये अचानक उत्साह संचारला असून जे कुंपणावर बसलेले होते त्या साऱ्यांनी थेट पुन्हा महाआघाडी किंवा ज्यांनी विरोधी पक्षांमध्ये कोलांटी उडी मारलेली आहे, जणू आमच्या मनात पक्षांतराचे फितुरीचे विचार कधी शिवलेच नव्हते असे बेरकी भाव त्यांच्यातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता तुम्हला नक्की बघायला मिळतील, एवढेच काय पुढल्या अगदीच काही दिवसात जे शिंदे सेना आणि भाजप युतीमध्ये बाहेरून येऊन विराजमान झाले आहेत त्यांना देखील महाआघाडीचे वेध लागलेले तुम्हाला दिसतील. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि राज्यातल्या भाजपाला आता यापुढे प्रत्येक क्षण वैऱ्याचा आहे, सावध भूमिका आणि हाती चाबूक घेऊन जोराचे निर्णय घेणे आता त्यांना अत्यावश्यक आहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी