कंबोज आणि फडणवीस : कोण कसा कोण कासावीस…
अलीकडे जवळपास पंधरा वीस दिवस मी मुंबई बाहेर दूरवर कुठेतरी होतो त्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडी आणि भानगडी यापासून दूर होतो अलिप्त होतो. जगभर वेगळ्या पद्धतीने पर्यटन हा माझा छंद षौक आणि आवड त्यामुळे सवड मिळताच आवड जपतो, कधी कधी तर एकटाच जगात कुठेही निघून जातो. राज्यात यापुढे अनेक राजकीय घडामोडी घडतील हे मी तुम्हाला साधारण एक महिन्यापूर्वीच सांगितले होते नेमके तसेच घडले आणि घडेल किंवा घडवून आणल्या जाईल. मोहित कंबोज तसा एकदम टग्या तरुण आणि नेता, तो त्या त्या काळी ज्याच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या काळात त्या दरम्यान तो त्या त्या नेत्यांसाठी प्रसंगी जीव देखील देऊ शकतो, कृपा शंकर सिंह किंवा आशिष शेलार आणि त्यानंतर आजपर्यंत मोहित त्या देवेंद्र फडणवीस यांचा म्हणाल तर एक विश्वासू एक उत्तम साथीदार जिवलगा जवळचा कार्यकर्ता आणि सखा देखील, देवेंद्र फडणवीसांसाठी त्याने अनेकांशी पंगे घेतले, अनेकांना अंगावर घेतले त्यामुळे फडणवीस विरोधकांची त्याच्यावर करडी नजर असते त्यामुळे अनेकदा त्याला अतिशय टोकाच्या टीकांना सामोरे जावे लागते आणि हाही एक टग्या कार्यकर्ता आणि नेता त्यामुळे समोरचा शत्रू किंवा विरोधक कितीही बलाढ्य ताकदवान असला तरी हा प्रत्येकाला पुरून उरतो, ठोश्यास ठोसा किंवा जश्यास तसे उत्तर देऊन प्रसंगी विरोधकांना सळो कि पळो करून सोडतो…
मी आणि मोहित आम्ही दोघेही एकाच इमारतीत राहतो त्यामुळे मोहित नेमका आत बाहेर कसा हे मी किंवा विक्रांत त्याला त्यावर अतिशय जवळून ओळखतो. विशेष म्हणजे मोहित सभोवताली आणि आमच्या इमारतीला देखील अनेक पोलीस तसेच मोहित यांची खाजगी सुरक्षा अधिकारी आणि आमच्या इमारतीसाठीचे सुरक्षा रक्षक असा प्रचंड गराडा कंबोज सभोवताली चोवीस तास सतत पडलेला असतो आणि या साऱ्यांची नजर चुकवून मोहित बायकांचे षौक करेल हे अजिबात शक्य नाही आणि आम्ही जे त्याला अगदी जवळून बघतो आणि ओळखतो, मोहित स्त्रीलंपट नक्की नाही, त्याची पत्नी अत्यंत देखणी आहे रूपवती आहे, मोहित तिच्यावर आणि अपत्यांवर जीवापाड प्रेम करतो, प्रसंगी त्याचे व्यवहार त्याची श्रीमंती, त्याचे व्यवसाय याबाबत मी कानावर हात ठेवीन पण मोहित याचे स्त्रियांच्या बाबतीत चारित्र्य चांगले नाही असा जर एखाद्याने त्याच्यावर आरोप केला तर त्याच्याआधी मी नि विक्रांत आरोप करणाऱ्याला त्याची जागा दाखवून मोकळे होऊ. सतत एकतर कुटुंबात किंवा कार्यकर्त्यांमध्ये किंवा व्यवसाय आणि मित्र परिवारात रमणारा हा निर्भय नेता नक्कीच अजिबात आंबट शौकीन नाही, तो महागड्या कार्सचा आलिशान घराचा उत्तम कपड्यांचा आणि कुटुंबासहित पर्यटनावर खर्च करणारा अतिशय कुटुंबवत्सल तरुण, त्याच्यावर अलीकडे करण्यात आलेले विभत्स आरोप, साफ खोटे, मनापासून वाईट वाटले…
इट का जवाब पथ्थरसे, पद्धतीने चवताळलेल्या चिडलेल्या पेटून उठलेल्या मोहित कंबोज यांनी त्यानंतर नेमक्या आणि स्वतःच्या पद्धतीने विरोधकांना आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आणि मला त्यावर म्हणाल तर मनातून वाईट वाटले म्हणाल तर आश्चर्य वाटले कि ज्या तेजस कडे मी उद्याचा उद्धव यांचा खर्या अर्थाने शिवपुत्र संभाजी म्हणून बघत होतो, आशा आणि अपेक्षा ठेवून होतो तो तेजस देखील आदित्यच्या चार पावले पुढे निघाला आणि जेथे लक्ष्मी वेगाने व वाम मार्गाने येते त्या प्रत्येक घरात हे असे विष हमखास पसरत जाते. ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र लुटला लुबाडला बरबाद केला विविध हरामखोरांच्या हाती दिला त्यातल्या एकाचेही नक्की चांगले होणार नाही हे जे मी कायम माझ्यासहित सर्वाना ओरडून सांगतो त्या प्रत्येकाच्या घरात दिव्याखाली हमखास अंधार आहे किंवा नजीकच्या काळात महाराष्ट्राला नागडे करणाऱ्या प्रत्येकाचे नक्की वाटोळे होणार आहे, खा पण मर्यादा पाळा, अन्यथा यातल्या प्रत्येकाचा वक्त केवळ चांगला आहे त्यांचा किंवा त्यांच्या फारतर पुढल्या पिढीचा अंत चांगला होऊच शकत नाही.साधारणतः 85 ते 90 दरम्यान आपल्या या राज्यात एक खूप शिकलेले रुबाबदार सरकारी अधिकारी होते, ज्यांच्यापासूनच नेमका शिक्षणाचा बाजार मांडल्या गेला त्यात त्यांनी त्यावेळी करोडो रुपये कमावले, पुढे त्यांचा एकुलता एक देखणा मुलगा निष्णात डॉक्टर झाला त्याला रूपवती श्रीमंत बुद्धिमान पत्नीही मिळाली मात्र आठ दहा वर्षानंतर देखील आपल्याला मुलबाळ होत नाही बघून त्याच्या पत्नीने उत्तम प्रॅक्टिस बंद करून ती देवाधर्माला लागली आणि या अस्वस्थतेतून पुढे त्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, आता त्याचा मुलगा आणि सून देशभर देव देव करीत भ्रमंती करतात, कमावलेले काळे पैसे खायला पुढल्या पिढीत कोणीही उरले नाही, उरणार नाही, राज्याला आणि सामान्यांना सतत नागडे करणाऱ्या मूठभर मंडळींनी आपल्या घरात कायम डोकावून बघावे, असे करू नये वागू नये त्यांना वाटेल…
क्रमश : हेमंत जोशी