उद्धव ठाकरेंचे शत्रू लाख, ठरतील चिराग कि होतील बेचिराख
हिंदी सिनेमातल्या एका दमात अनेकांना लोळविणार्या हिरोसारखी निदान या दिवसातली तरी श्रीमान उद्धव ठाकरे यांची या देशात आणि या राज्यात प्रतिमा तयार झालेली असल्याने देशभरातल्या विविध राज्यातल्या अनेकांना कित्येक नेत्यांना त्यांच्याविषयी आकर्षण आहे कुतूहल आहे जे राज्यातल्या देखील विविध नेत्यांना याच उद्धव ठाकरे विषयी आकर्षण होते, आपल्या कामाचा माणूस म्हणून सुरुवातीला जसे याच उद्धव यांना जसे भाजपाने घट्ट मिठीत घेतले होते पुढे त्याच पद्धतीने म्हणजे उद्धव यांचे भाजपाशी बिनसल्यानंतर शरद पवार यांच्यासारख्या चलाख चतुर नेत्यांसहित राज्यातल्या अख्ख्या भाजपा विरोधकांनी त्यांना डोक्यावर घेतले खरे पण नंतर थोड्याच महिन्यात भाजपा विरोधकांना आणि उद्धव यांना मिठीत घेतलेल्यांना त्यांनी केलेली नेमकी मोठी चूक लक्षात आली त्यातून समस्त नेत्यांनी कोपऱ्यात जाऊन स्वतःच स्वतःच्या थोबाडात थाड थाड मारून घेतल्या, ज्या उद्धव यांची नेमकी लबाडी चतुर स्वभाव संधीसाधू धोरण आणि आजूबाजूच्यांना संपवत फार फार पुढे निघून जाण्याची हातोटी हे जे सुरुवातीला जेथे भाजपा नेत्यांच्या देखील लक्षात न आल्याने त्यांनी उद्धव यांना मोठी ताकद देऊन स्वतःच्या पायावर जो मोठा धोंडा मारून घेतला होता पुढे तीच चूक केवळ भाजपा द्वेषातून शरद पवार व राष्ट्रवादी आणि थेट सोनिया गांधी आणि काँग्रेस यांनी देखील केली, अत्यंत महत्वाचे म्हणजे नेते मग ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शाह आणि शरद पवार असतील किंवा राज्यातले विविध दिग्गज काँग्रेस नेते या साऱ्यांना अगदी सुरुवातीपासून उद्धव यांच्या या धूर्त स्वभावाची संपूर्ण कल्पना देणारा अनुभवी नेता होता राज ठाकरे…
www.vikrantjoshi.com
राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांची नेमकी वृत्ती तोंडपाठ असल्याने त्यांना या बेवकूफ बनणाऱ्या नेत्यांची भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसची अगदी मनापासून किंवा येत होती, हे सारेच माझ्यासारखे मोठे राजकीय नुकसान करवून घेणार आहेत याची कल्पना त्यांना असल्याने राज ठाकरे अगदी बेंबीच्या देठापासून या साऱ्यांना त्यांच्या कानात अगदी ओरडून सांगत होते पण अनुभव घेतलेल्या राज ठाकरे यांचे हे मनापासून सावध करणे भाजपासहित जे उद्धव यांच्या जवळ आळीपाळीने गेले होते त्या सार्यांनीच, राज ठाकरे यांचे सांगणे सावध करणे हसण्यावारी नेले आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी अगदी सुरुवातीपासून उद्धव यांच्यावर बिश्वास टाकला ते सारे बरबाद झाले किंवा त्यांनी आपले आपल्या राजकीय पक्षाचे मोठे नाहक नुकसान करवून घेतले. उद्धव हे इतरांच्या उरावर खुबीने पाय ठेवून स्वतः फार पुढे निघून जातात, हे आजतागायत त्यांच्या राजकारणाला आणि धूर्त स्वभावाला बळी पडलेल्या एकाच्याही अगदी शरद पवार नरेंद्र मोदी यांच्यासहित कोणाच्याही लक्षात आले नाही एवढे उद्धव हे येडा बनून पेढा खातात. आज या राज्यातला असा एकही राजकीय पक्ष किंवा नेता नाही त्यातले काही अगदी उघड उघड तर काही आतून उद्धव यांच्या विरोधात आहेत पण भाजपा राष्ट्रवादी सहित या साऱ्यांना केव्हाच उद्धव ठाकरे यांनी थेट फाट्यावर मारून सामान्य माणसाच्या मग तो हिंदू असो किंवा मुसलमान प्रत्येकाच्या हृदयात अशी जागा निर्माण केली आहे ज्याची फार मोठी किंमत या मंडळींना मोजावी लागणार आहे, मोजावी लागते आहे…
साधाभोळा आघाडीचा पण खात्रीचा अशी स्वतःची मोठ्या खुबीने राज्यात प्रतिमा इमेज उभी करणारे उद्धव ठाकरे हे आज मितीला थेट नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस शरद पवार एकनाथ शिंदे किंवा काँग्रेस किंवा वंचित सारखे अन्य पक्ष हे या सर्वांची पुढे येणारया प्रत्येक निवडणुकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरले आहेत, जंग जंग पछाडून देखील ज्या उद्धव यांनी वास्तवात आणि वास्तविक अनेक गंभीर चुका केल्या आहेत पण त्याचवेळी त्यांनी जी सामान्य मतदारांच्या जनतेच्या मनात जागा निर्माण केली आहे या अशा वास्तवातल्या अत्यंत धोकादायक व भ्रष्ट नेत्याला हा असा मोठेपणा, त्यावर उद्धव यांनी एकट्याने अनेकांना दगा देत उभे केलेले आव्हान, त्यावर बोलावे तेवढे कमी. आता तुम्हाला अत्यंत महत्वाचे सांगतो कि उद्धव सभोवताली या दिवसात प्रचंड राजकीय गोंधळ उभा करून किंवा त्यांना एकटे पाडून देखील उद्धव यांच्या सभांना होणारी गर्दी आणि शब्दांना भाषणांना मिळणारा मान, एखादा चुकीचा नेता देखील सामान्य जनतेच्या हृदयावर कसे स्थान निर्माण करतो, मला वाटते उद्धव ठाकरे हे या देशातले इतिहासात नोंद करायला भाग पाडणारे नेते. मला तर उद्धव यांच्या या धोकेबाज वृत्तीची तंतोतंत माहिती असल्याने नाही म्हणायला मी त्यावर नेमके सत्य अनेकदा मांडून मोकळा होतो, पण जेथे राज किंवा स्मिता किंवा राणे यांच्यापासून तर शरद पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा थेट नरेंद्र मोदी फिके पडले तेथे माझे लिखाण म्हणजे मेहमूद समोर समीर चौगुले. आता अत्यंत गोपनीय मला कळलेले असे कि उद्धव ठाकरे यांचे राजकीय महत्व संपविण्याची फार मोठी जबाबदारी काही मोठ्या नेत्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकलेली आहे, बघूया फडणवीस यशस्वी होतात कि एक दिवस तेही उद्धव समोर हतबल ठरलेल्या नेत्यांच्या पंक्तीला येऊन बसतात…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी