जसा इतरांचा हनिमून बघू नये तसे राजकारणात डोकावू नये…
जसे एका पुण्यवान ऋषींचा मधुचंद्र चोरून एका कुत्र्याने बघितला नि ऋषींनी त्याला शाप दिला कि माझा मधुचंद्र तर तू एकट्याने बघितला पण तुझा मधुचंद्र अख्खे जग बघेल वरून दगड देखील तुला मारतील ते तसे या राज्यात या दिवसातल्या राजकारणाचे, जर तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती म्हणून येथे वावरत असाल तरीही तुम्हाला जर राज्यातल्या राजकारणात नाक खुपसण्याचा मोह झाला तर मी तुम्हाला असा शाप देतो कि तुम्हाला यात नाक खुपसल्याने वेड लागेल त्यातून तुम्ही रस्त्याने सैरावैरा धावत सुटाल, जनता तुमच्या पाठी हाती दगडं घेऊन तुम्हाला मारायला तुमच्या मागावर असेल, फुक्काचं वेड लावून घ्यायचे नसेल तर या येडझव्या राज्यातल्या राजकारणापासून चार हात लांब राहा कारण हे राज्यकर्ते नेते त्यांच्या स्वार्थापायी तुम्हाला वेड लावून नक्की मोकळे होतील. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यातल्या एकालाही जनतेचे भले करण्यात रस नाही इंटरेस्ट नाही त्या साऱ्यांचे जे भांडण आहे जे वाद आहेत ते केवळ वाट्यावरून भांडणे लागलेली आहेत, मेरी साडी तेरी साडी से ज्यादा सफेद कैसी, केवळ हाच वाद त्यांचा त्या साऱ्यांचा आपापसात आहे. एकमेव उद्धव ठाकरे आपल्याला राजकारणात खाऊन टाकेल उद्धव हे राजकारणात या राज्यातला सर्वाधिक तगडा प्रतिस्पर्धी आहे हे फार पूर्वी एकमेव भाजपाच्या भाजपा नेत्यांच्या लक्षात आले, नेमके त्यांच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हापासून उद्धव ठाकरे नको त्या चुका घोडचूका मोठ्या चुका करायला लागले आणि येथूनच राज्याच्या राजकारणाची दिशा पूर्णतः बदलली, राजकारणाचे वारे वेगळ्या दिशेने वाहायला लागले…
www.vikrantjoshi.com
शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादी, काँग्रेस, प्रकाश आंबेडकर, वंचित, राज ठाकरे, मनसे, राजू शेट्टी, मुस्लिम संघटना मुस्लिम नेते इत्यादींचे भाजपाला य राज्यात म्हणाल तर स्पर्धा आहे पण तगडे आव्हान यापैकी एकाचेही नाही, आपल्या राज्यातल्या कोणत्याही निवडणुका अगदी विधानसभा किंवा वारंवार होणाऱ्या विधान परिषद निवडणुका देखील देशातल्या आणि राज्यातल्या भाजपाला आणि देशातल्या राज्यातल्या महत्वाच्या भाजपा नेत्यांना फारशा किंवा तेव्हढ्याशा नक्कीच महत्वाच्या नाहीत नव्हत्या तर 2024 च्या लोकसभा निवडणुका भाजपाला विशेषतः या राज्यात जिंकणे, मोठ्या प्रमाणावर खासदार निवडून आणणे हाच त्यांचा अगदी सुरुवातीपासून प्रमुख हेतू होता मुख्य अजेंडा होता जो तुमच्यापैकी एकाच्याही ध्यानीमनी नव्हता मात्र त्याची स्पष्ट कल्पना नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी सुरवातीला एकमेव देवेंद्र फडणवीस यांना देऊन ठेवलेली होती त्यानंतर या दोघांनी यथावकाश राज्यातल्या इतरही भाजपा नेत्यांना दिली, सर्वाधिक भीती फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या जनसामान्यातल्या लोकप्रियतेची, हा धोक्याचा इशारा या दोघांनीही राज्यातल्या भाजपा नेत्यांना देऊन ठेवलेला होत्या त्यामुळेच तुमच्या ते लक्षात आले असेल कि यावेळी नितीन गडकरी यांनी देखील नेहमीसारखे चार चौघात उद्धव यांना अजिबात डोक्यावर घेतले नाही किंवा बाळासाहेबांच्या कारकीर्दीचा कुठे साधा उल्लेख देखील त्यांनी केला नाही. मला कायम त्या देवेंद्र फडणवीस यांचे यासाठी मनापासून कौतुक वाटते कि त्यांच्यावर जेव्हा या पद्धतीची मोठी जबाबदारी येऊन पडते त्यानंतर ते कमालीची गुप्तता पाळत त्यांच्यावर सोपवलेली मोहिम ते फत्ते करून मोकळे होतात…
सध्याचे सरकार पडेल का, एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व संपविण्यात येईल का तर नाही हेच त्यावर उत्तर आहे, अजिबात असे किंवा यातले काहीही घडणार नाही फक्त शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी हि जशी लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने भाजापाची गरज होती त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने खुद्द शरद पवार यांना केव्हाच तडकाफडकी भाजपाशी युती करून मोकळे व्हायचे होते म्हणून कदाचित शरद पवार यांना राज्यातल्या सत्तेत सामीलकरून घेतांना नक्कीच पुढल्या काही दिवसात राज्यात काही मोठे बदल नक्की घडतील पण त्यातून भाजपा नेते गरज सरो वैद्य मरो पद्धतीची वागणूक नक्कीच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला देणार नाही असे घडले तर इतर कुठलाही नेता किंवा राजकीय पक्ष भविष्यात मोदी शाह फडणवीस आणि भाजपावर विश्वास ठेवणार नाही. गेल्या काही महिन्यात झपाट्याने राजकारणातले बदल हे उद्धव ठाकरे यांच्या गंभीर चुका उघड करीत आणि त्यांना राजकीय दृष्ट्या मोठ्या खुबीने मोठ्या चलाखीने दुबळे करणे हे भाजपाचे ध्येय उद्दिष्ट होते आणी ते आता त्यांच्या बऱ्यापैकी टप्प्यात आले आहे ज्याला प्रमुख जबाबदार स्वतः उद्धव ठाकरे हेच आहेत. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये आपापसात मोठे वाद आहेत वरून ते प्रचंड गोंधळले आहेत, त्यांना विशेषतः उद्धव सेनेविषयी मनातून अजिबात आस्था नाही प्रेम नाही. स्वतः फुटल्यामुळे उद्धव सेना अशक्त झाली आहे आणि आता तर शरद पवार देखील ठाकरे यांच्या पासून नक्कीच दुरावले आहेत दूर गेले आहेत, अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने उद्धव यांची पाचोऱ्याची सभा फेल्युअर ठरविली त्यातून भाजपा खुश आणि उद्धव यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे….
क्रमश: हेमंत जोशी