दादाचे काकांच्या पावलावर वाकडे पाऊल
पुढच्यास ठेच मागचा शहाणा, ज्याने पित पत्रकारितेत घरी आणि दारी दोन्हीकडे आयुष्यात मोठे प्रचंड नुकसान करवून घेतले आहे केवळ पीत पत्रकारितेत बदनाम झाल्याने एका चित्रविचित्र निर्लज्ज ब्लॅकमेलर पण एकटाकी लिखाणात प्रभावी असलेल्या ठरलेल्या पत्रकाराला त्याच्या या ठार वेड्या वागण्यातून अनेक वर्षे पत्रकारितेतून अक्षरश: धूम ठोकावी लागली होती, भूमिगत झाल्यागत त्याची वाईट अवस्था होती, तो थट्टेचा आणि चेष्टेचा विषय ठरला होता मात्र त्याने पुन्हा एकदा मोठ्या खुबीने अनेकांना गंडवत लुबाडत फसवत संपवत पुन्हा एकदा पूर्वीच्याच पद्धतीने सुपारी घेऊन खोटे व्हिडिओ करून तद्दन खोट्या बातम्या सांगून पसरवून त्यातून अनेकांना सतत गंडा घालून थापाड्या पत्रकारितेला अलीकडे सुरुवात केली आणि केवळ देवेंद्र फडणवीस अतिशय मॅच्युअर्ड असल्याने याच्या थापांना ते अजिबात बळी न पडता त्यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याविषयी अजिबात गैरसमज करवून न घेता वरून त्या मंत्र्याला सांभाळून घेतले आणि या वेड्या पत्रकाराच्या थापांना दबावाला अजिबात बळी न पडता साऱ्यांनी म्हणजे मंत्र्यांनी नेत्यांनी अधिकाऱ्यांनी या पाजी पत्रकाराला हरामखोराला चार हात दूर लांब ठेवण्याच्या अप्रत्यक्ष सूचना दिल्या. हा ठार वेडा दिसणारा पण आतून अतिशय कृतघ्न नीच वृत्तीचा घातक पत्रकार जर कळत नकळत एखाद्याला याच पद्धतीने गोत्यात आणून तुम्हाला लुटण्याचा लुबाडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचे पुरावे जसे त्या मंत्र्याने याचे पुरावे जमा करून त्याच्या श्रेष्ठींकडे सुपूर्द केले त्याच पद्धतीने हे असे पुरावे माझ्याकडे किंवा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करा, जशी या घाणेरड्या पत्रकारच्या थोबाडात अगदी चार चौघात आनंद दिघे यांनी ठेवून दिली होती तेच एकनाथ शिंदे करून मोकळे होतील….
www.vikrantjoshi.com
मित्रांनो, माणसाच्या हातून चुका होतात पण वेळीच त्यात सुधारणा केली तर माणूस खूप मोठा होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. येथे त्या विक्षिप्त पत्रकाराचे उदाहरण अजित पवार यांच्यावरून आठवले. मला एक कोटी रुपये द्या मी तुमचे महत्व वाढवून देवेंद्र फडणवीस यांना पार बदनाम करून त्यांचा अनंत तरे करतो, या त्याच्या हलकट अमिषाला हा मंत्री बळी पडला नाही आणि तसेही त्या मंत्र्याला एक कोटी रुपये काय पाच लाख रुपये देखील काढून देणे शक्य नव्हते, म्हणून हा हरामखोर पत्रकार उठला आणि त्या मंत्र्यांचे थेट फडणवीस यांच्याशी संबंध बिघडवायला तो निघाला पण देवेंद्र यांना त्या बेईमान भ्रष्ट घातकी पत्रकाराची नेमकी वृत्ती माहित असल्याने त्यांनी याचे बोल अगदी हसण्यावारी नेले, देवाने त्या मंत्र्याला वाचविले. मला जेव्हा नेमका प्रकार कळला, मी त्या मंत्र्याला फोन करून विचारताच त्याने असे काही घडले नाही, लक्ष देऊ नका, मला विनंती केली पण तोपर्यंत माझ्याकडे नेमके पुरावे आलेले असल्याने मला आज हे लिहिणे तुम्हा सर्वांच्या कानावर घालणे अत्यावश्यक वाटले. पुन्हा एकवार तुम्हाला जाहीर आव्हान देतो आणि आवाहन करतो कि या पद्धतीच्या राज्यातल्या मुंबईतल्या कोणत्याही पत्रकाराच्या पीत पत्रकारितेला दबावाला कोणीही अजिबात बळी पडू नये, असे घडल्यास, माझ्या कानावर घाला, या पद्धतीच्या मीडियाला मी पुढल्या आठ दिवसात नक्की सरळ करून मोकळा होईल…
याच पत्रकाराच्या वृत्तीचा संदर्भ मी आता येथे अजित आणि शरद पवार या दोघांशीही जोडून नेमके पुरावे मांडून मोकळा होणार आहे. आपण आधी ज्या चुका केल्या त्या पुन्हा करायच्या नाहीत हे जर त्या पत्रकाराने यावेळी पुन्हा जोमात जोशात आल्यानंतर केले असते, नेहमीची फसवी पद्धत आणि भाषा वापरून जर प्रत्येकाला लुबाडले नसते तर आयुष्याच्या उतरणीला तो पुन्हा एकवार नाव कमावून भाऊ तोरसेकर होऊन वर गेला असता पण तसे घडले नाही त्याने मागच्या चुका पुन्हा पुढे केल्या. तेच अजित पवार यांचे म्हणजे ज्या पद्धतीने त्याच्या काकांनी शरद पवार यांनी अत्यंत चुकीचे लबाडीचे बिन भरवशाचे राजकारण केले करताहेत त्याची री जर अजित पवार यांनी ओढली नाही नसती तर अजितदादा शरद पवार यांच्यापेक्षा शत पटीने नक्की पुढे निघून गेले असते. काकांची आर्थिक कुवत मोठी आहे आणि दानत तर कुवतीपेक्षा मोठी असल्याने शरदरावांच्या चुकांवर अनेकदा पांघरूण पडले आणि ते आजही राज्यात देशात राजकारणात सत्तेत कायम टिकले मोठे होत गेले पण अजितदादा यांना फक्त येऊ द्या माहित आहे देणे दान करणे चार कार्यकर्त्यांना पश्चिम महाराष्ट्रव्यतिरिक्त मोठे करणे त्यांना जवळपास माहित नाही शिवाय त्यांची राजकारण करण्याची पद्धत थेट शरद पवार यांच्याच सारखी, बिनभरंवशाची लबाडीचा संधी साधू असण्याची, त्यामुळे या दिवसात ना त्यांच्यावर शरद पवार यांचा ना भाजपाचा विश्वास, त्यातून त्यांच्या सभोवताली असलेले धनंजय मुंडे यांच्यासारखे कितीतरी प्रभावी नेते एकतर अजितदादा यांच्यापासून कायमचे दूर जातील किंवा राजकारणात मोठे नुकसान करवून घेतील…
हेमंत जोशी