मोदी शाह फिदा, फडणवीस शिंदेंवर गदा, तोडणार वादा अजितदादा
या दिवसात आपल्या या राज्यात प्रत्येक राजकीय पक्षात प्रचंड गदारोळ आहे सावळा गोंधळ माजला आहे त्यातून सामान्य कार्यकर्ते गोंधळलेले आहेत आणि सामान्य मतदाराला नेमके काय चालले आहे कळेनासे झाले आहे. पण भिऊ नका गोंधळू नका मी तुमच्या पाठीशी आहे जे नेमके आत घडते आहे ते तुम्हाला मी बाहेर येऊन अगदी जाहीर सांगणार आहे. प्रत्येकवेळी काकांचा खोडा त्यातून पार्थ किंवा अजितदादा बाबत मनात दुस्वास ठेवून पवारांनी घेतलेले निर्दयी निर्णय, गेल्या काही महिन्यांपासून अजितदादा मनातून मनापासून प्रचंड अस्वस्थ होत्ते, नाही म्हणायला त्यांचे बंद खोलीत त्यांच्या काकांशी बारीक सारीक वाद देखील व्हायचे, जेव्हापासून अजितदादा यांच्या विशेषतः भाजपा श्रेष्ठींशी थेट अमित शाह यांच्याशी संवाद सुसंवाद व्हायला लागले जे साहजिक काकांच्या कानावर आले पडले त्यातून या महिन्याभरात तर काका पुतण्यात विविध मुद्यांवर नाही म्हणायला एकदा नव्हे तर तीन तीन वेळा मोठी खडाजंगी देखील झाली आणि अजित पवार यांनी लगबगीने त्यांच्या गटातल्या या राज्यातल्या असंख्य महत्वाच्या नेत्यांना आमदारांना विश्वासात घ्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा तर काकांच्या हे नक्की लक्षात आले, अजित पक्षांतर करून भाजपामध्ये त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसहित आमदारांसहित राष्ट्र्वादीतल्या अनेक दिग्गज नेत्यांसहित नक्की प्रवेश करून मोकळा होणार आहे…
www.vikrantjoshi.com
अजित पवार यानंतर या महिन्यात किंवा फारतर पुढ्ल्या महिन्याच्या सुरुवातीला भाजपा मध्ये प्रवेश करतील हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे मात्र नजीकच्या काळात एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादी अशी युती होऊन पुढले मुख्यमंत्री अजित पवार हेच असतील हि जी मीडियातल्या काही मंडळींनी बातमी पेरली होती ती केवळ अफवा होती ज्याचे मी याआधीच्या लेखात खंडन करून मोकळा झालो आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी युती हि भाजपा कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि संघाच्या स्वयंसेवकांना नक्कीच आवडणारी नव्हती त्यामुळे हे असे अजिबात घडणार नाही मला तसे आतल्या गोटातून कळले होते मात्र जर याच भाजपामध्ये हर्षवर्धन पाटील किंवा राधाकृष्ण बिखे पाटील सामील होऊन भाजपामय होतात किंवा एकनाथ शिंदे जणू एक संघाचे कट्टर स्वयंसेवक म्हणून पद्धतीने वावरतात तर राधाकृष्ण किंवा हर्षवर्धन पद्धतीच्या बाहेरून भाजपामध्ये आलेल्या कट्टर काँग्रेस नेत्यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातले पण उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले अजित पवार किंवा मराठवाड्यातले अशोक चव्हाण किंवा मोठ्या प्रमाणावर विशेषतः बौद्धांचे नेतृत्व करणारे नितीन राऊत नक्कीच येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने एक गठ्ठा मते मिळविताना मोलाचे आणि महत्वाचे ठरणार असून त्याच दृष्टीने या तिघांनाही भाजपामध्ये सामावून घेण्याची घाई धडपड गेल्या काही महिन्यांपासून नेत्यांची सुरु होती आणि आता यश नक्की दृष्टीक्षेपात आलेले आहे त्यातले अजित पवार हे आता कोणत्याही कुठल्याही क्षणी भाजपामध्ये त्यांच्या मोठ्या लावाजम्यासहित नक्की दाखल होणार आहेत आणि नितीन राऊत तर आपला जवळचा मित्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सतत संपर्कात आहेत त्यांच्या सततच्या गाठीभेटी या दिवसात चघळण्याचा विषय आहे…
जे याआधी आयुष्यभर शरद पवार यांनी सतत फोडाफोडीचे आणि दगाफटका करणारे राजकारण सत्तेत राहण्यासाठी केले नेमका त्याचा हिशेब आता त्यांना थेट त्यांच्या घरातून चुकविला जातो, यालाच नियतीने बदला घेणे म्हणतात. नेतृत्वाच्या बाबतीत अति सामान्य असलेल्या ठरलेल्या पोटच्या लेकीसाठी सततची धडपड त्यातून काहीशा बंडखोर वृत्तीच्या धाडसी पुतण्याकडे मुद्दाम केलेले दुर्लक्ष त्याचे सततचे अपमान आणि कायम सत्तेच्या राजकारणातून डावलणे हे सारे शरद पवार यांच्या नको त्या क्षणी,म्हणजे ऐन राजकीय निवृत्तीच्या. वेळी अंगलट आले विशेष म्हणजे कदाचित भाजपा श्रेष्ठींना थेट पवार यांनाच आपल्याकडे घ्यावे, असाही विचार त्यांच्या मनात होता पण राज्यातले बदनाम बदमाश भ्रष्ट आणि वादग्रस्त मुसलमान नेत्यांचे पवारांनी केलेले लाड ते भाजपा विचारांना पटणारे नव्हते किंवा त्यांचा मतदार त्यातून त्यांच्यापासून नक्की दूर गेला असता हि भीती देखील भाजपा श्रेष्ठींना असल्याने पुढे विखे पाटील पद्धतीने त्यांनी थेट अजितदादा यांनाच भावनिक साद देऊन आधी विश्वासात घेतले आणि आता थेट आपलेसे केले, कर्नाटक विधानसभा निवडणुका अगदीच तोंडावर असल्याने लगेचच राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होतील असे नक्की नाही पण एकनाथ शिन्दे यांचे या दिवसातले अस्वस्थ होणे बरेच काही सांगून जाते. शिंदे कुठे कमी पडले, फडणवीसांचे काय होईल असे आणखी कितीतरी महत्वाचे विषय आहेत, त्यावर पुन्हा मी लिहून मोकळा होईल…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी