चला गम्मत करूया
सध्या राहुल गांधी यांच्याही प्रेमात आकंठ बुडालेल्या मंडळींनी सोशल मीडियावर एक मोहीम जोरात चालवली आहे कि राहुल गांधी यांना घर नाही म्हणजे त्यांचे शासकीय निवासस्थान काढून घेतलेले असल्याने स्वतःचे घर देण्याची, त्यातल्या बहुतेकांनी स्वतःचे घर देण्याची तयारी दर्शवली आहे, तशी इच्छा व्यक्त केली आहे. राहुल प्रेमींनो त्यांना बायको पण नाही विशेष म्हणजे असे असेल तर मी किंवा पत्रकार उदय तानपाठक थेट काँग्रेस मध्ये प्रवेश करायला तयार आहोत कारण आम्हाला प्रेयसी नाही जशी राहुल यांना बायको नाही…
आणखी एक असाच सत्य किस्सा तोही थेट माझ्याच घरातला. सांताक्रूझ पश्चिमेला मी ज्या इमारती मध्ये राहतो, आमच्या या इमारतिला चोवीस तास खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा गराडा असतो एवढा कि थेट मुंगीला किंवा तिच्या पिल्लांना देखील आमच्या या इमारती मध्ये परवानगीशिवाय सहजासहजी प्रवेश नाही. अलीकडे जेव्हा माझी बायको बाहेरून आली तेव्हा तिलाही एका नव्याने रुजू झालेल्या सुरक्षा रक्षकाने विचारले, नेमके कुठे कोणाकडे जायचे आहे त्यावर ती जरा रागातच म्हणाली, मी हेमंत जोशी यांची बायको आहे त्यावर तो तिला म्हणाला, त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक बायका हेच सांगून वर जातात. गेली आठ दिवस झाले मी घरातून गायब आहे…
www.vikrantjoshi.com
मित्रांनो, सतत 43 वर्षे राजकीय पत्रकारितेत घालविली असतांना काही स्वप्ने मी उराशी बाळगली त्यातली काही पूर्ण झालीत काही पूर्ण होऊ शकलेली नाहीत त्यापैकी दोन स्वप्ने अशी होती कि शरद पवार यांच्या व्यतिरिक्त किंवा त्याच त्या उद्धट उर्मट करप्ट मराठा नेत्यांव्यतिरिक्त एखादा वेगळा तोही मराठा नेता असा असावा कि ज्याचा दूरदूरपर्यंत शरद पवार यांच्याशी किंवा उर्मट उद्धट हलकट स्वभावाशी वृत्तीशी दूरदूरपर्यंत संबंध नसेल,आणि माझे हे स्वप्न अलीकडे एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पूर्ण होईल असे दिसत असल्याने जसे लहान पिल्लांच्या जवळ जरी गेले तरी त्या पिल्लांची जी आई असते ती जशी आपल्या अंगावर धावून येते चावायला धावते माझे काहीसे या एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत हे असेच या दिवसात होते आहे म्हणजे मी त्यांच्याकडून कोणतेही करवून घेत नाही पण जर शिंदे यांना अडचणीत आणणारी कामे अमुक एखादा त्यांच्याकडून करवून घेण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा जर त्यांच्या जवळ त्यांच्या कार्यालयात त्यांच्या सभोवताली अमुक एखादा बदनाम बदमाश लबाड चीटर मोठ्या खुबीने त्यांना बिलगून मोकळा होत असेल आणि हा प्रकार जेव्हा माझ्या लक्षात येतो तेव्हा मी असा नीच कितीही ताकदवान बलवान असला तरी त्याच्यावर तुटून पडतो आणि त्याला शिंदे यांच्यापासून दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो…
मागल्या व्हिडीओ मध्ये ज्या प्रभावी पैसेवाल्या नीच शासकीय अधिकाऱ्यावर मी पुरावे देत तुटून पडलो ज्याने मुंबईतल्या एका प्रसिद्ध दैनिकात काम करून कुबेर झालेल्या पत्रकाराला काही कोटी रुपये मोजून थेट शिंदे यांच्या कार्यालयात पोस्टिंग करवून घेतले होते, हा परदेशी नसलेला अधिकारी नक्की एक दिवस शिंदे यांना मोठ्या अडचणीत आणेल हे मला ठाऊक असल्याने मी त्याच्याविषयी सारे सत्य कथन करून मोकळा झालो, चांगला परिणाम असा झाला कि एकनाथजी यांनी या मतलबी भ्रष्ट अधिकाऱ्याची नेमकी माहिती जाणून घेऊन त्याच्या हकालपट्टीची आदेश दिल्याची माहिती माझया कानावर पडलेली आहे. अर्थात यापद्धतीने स्टाफच्या बाबतीत कठोर निर्णय इतरही मंत्र्यांनी घेणे अत्यावश्यक आहे अन्यथा स्टाफ प्रचंड पैसा कमावून मोकळा होतो आणि मंत्री पुढारी मात्र आयुष्यातून उठतो. एकनाथ शिंदे यांच्यासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मोठे आव्हान उभे आहे, असा एकही क्षण नाही कि उद्धव हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पाण्यात बघत नाहीत त्यामुळेच शिंदे किंवा फडणवीस नेमके कायद्याच्या अडचणीत सापडून त्याचा फायदा प्रसंगी विरोधकांना नक्की होईल, असे घडू नये माझा तो प्रयत्न असतो…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी