खेदजनक : मंत्रालयातील हा प्रकार खळबळजनक
मुख्यमंत्री म्हणून दिवंगत शंकरराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण वगळता 1980 ते आजतागायत मंत्रालयात विविध मंत्र्यांकडे ठाण मांडून बसलेल्या असलेल्या कोणत्याही बिलंदर भ्रष्ट बदमाश भस्मासुर वृत्तीच्या स्टाफची हकालपट्टी करणे इतर कोणत्याही कुठल्याही मुख्यमंत्र्याला अजिबात शक्य झाले नाही. विशेष म्हणजे शंकरराव आणि पृथ्वीराज यांच्या कार्यकाळात या ज्या विविध मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे कबजा करून असलेल्या बसलेल्या मंडळींना काही काळ या दोन चव्हाणांनी बाहेर केले होते मात्र या दोघांचा कार्यकाळ संपताच अगदी लगेच हे स्वीय सहाय्यक खाजगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी पुन्हा लगेचच त्यांच्या आवडीच्या खात्याच्या मंत्र्यांकडे राज्यमंत्र्यांकडे किंवा थेट त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे लगेच रुजू होऊन पुन्हा खोऱ्याने पैसे मिळवू लागले, आता तर वरून थेट ब्रम्हदेव जरी खाली उतरले तरी त्यांनाही या बहुतांश मंत्रालयात मंत्र्यांकडे ठाण मांडून बसलेल्या हरामखोर नीच हलकट स्टाफला हाकलून लावणे त्यांच्या खात्यात परत पाठविणे अजिबात शक्य नाही. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे यापूर्वी अनेकदा जो विधान भवनात किंवा मंत्रालयातला प्रकार उघड होऊन देखील दाबून टाकण्यात आला, म्हणजे अनेक महत्वाच्या फाईल्स किंवा पत्रांवर हे पीए पीएस ओएसडी स्वतःच त्या त्या मंत्र्यांच्या राज्यमंत्र्यांच्या सह्या करतात आणि मोठ्या रकमा खिशात घालतात असे जवळपास विविध मंत्र्यांकडले पंचवीस कर्मचारी तर मलाच त्यांच्या नावांसहित आणि त्यांनी जमवलेल्या मालमत्तेसहित ठाऊक आहेत माहित आहेत मात्र जोपर्यंत एखादा मुख्यमंत्री या अशा नालायक स्टाफ विरुद्ध ऍक्शन घेण्यास धजत नाही तोपर्यंत मी कितीही बोंबा मारल्या तरीही अजिबात उपयोग होणार नाही…
www.vikrantjoshi.com
अतिशय गंभीर प्रकार असा कि हे जे मंत्र्यांच्या हुबेहूब सह्या करून पैसे मिळविणारे महाबिलंदर अधिकारी कर्मचारी विविध मंत्र्यांकडे आमदारांकडे कार्यरत आहेत त्यापैकी दोन अतिशय भ्रष्ट महानालायक शासकीय अधिकारी अलीकडे थेट मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत ज्या दोघांमुळे याआधी ते ज्या इतर महत्वाची खाती संभाळणारया मंत्र्यांकडे खाजगी सचिव किंवा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते, हे दोघे आजतागायत ज्या ज्या अशा मंत्र्यांकडे कार्यरत होते त्या मंत्र्यांचे राजकीय वाटोळे केवळ या दोघांमुळेच झालेले आहेत जे आता थेट एकनाथ शिंदे यांना नक्की अडचणीत आणण्यासाठी मोठ्या खुबीने मोठ्या युक्तीने रुजू झाले आहेत जो प्रकार नक्की निश्चित थेट मुख्यमंत्र्यांना अडचणींचा ठरणारा आहे. या दोघांपैकी एकाची नियुक्ती तर मुंबईतल्या एका प्रसिद्ध दैनिकात महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या पण एरवी मोठी दलाली करून कोट्यवधी रुपये मिळविणाऱ्या एका पत्रकाराने तेही काही कोटींच्या बदल्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकून केलेली आहे. या अधिकाऱ्याची शिंदे यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्याने लगेचच ठाणे आणि मुंबई परिसरातील काही महत्वाच्या व्यापाऱ्यांना दलालांनाउद्योगपतींना बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम कंत्राटदारांना नव्या मुंबईतील महापालिका अधिकाऱ्यांना राज्यातील काही कामाच्या शासकीय अधिकाऱयांना थेट व्हाट्सअप मेसेज करून तो एकनाथ शिंदे यांच्याकडे रुजू झालेला असून काहीही कोणत्याही कामासाठी त्याचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असल्याचा, या आशयाचा मेसेज करून नेहमीप्रमाणे कार्यालयात येण्यापूर्वी त्याच्या घरी त्याने सकाळी न चुकता दरबार भरविण्यास सुरुवात देखील केली आहे. अर्थात या असंतोष माजविणाऱ्या संतोषीचे अतिशय गंभीर कारनामे येथेच संपत नाहीत, पुढल्या भागात त्यावर अवश्य वाचा…
क्रमश: हेमंत जोशी