लेटेस्ट : केवळ प्रौढांसाठी : पत्रकार हेमंत जोशी
मी तर तसे जाहीर सांगितलेच आहे कि कोरोना काळात एखाद्या अडचणीत किंवा संकटात सापडलात तर माझ्याशी अवश्य संपर्क साधावा त्यात मी पडलो राजकीय पत्रकार त्यामुळे लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक गमतीशीर देखील फोन आलेत, अदयाप तसे मी त्यांना माझ्या स्वभावानुसार उत्तर दिलेले नाही पण देणार नाही याची आता मला माझीच शाशवती वाटत नाही. माझा एक मित्र आहे विशेष म्हणजे तोही बऱ्यापैकी नावाजलेला पत्रकार आहे आणि त्याला नको त्या बायकांकडे जाण्याचा सुरुवारीपासून नाद आहे, अर्थात हा नाद अनेक पुरुषांना असतो त्यांत नवल ते कसले ? नरिमन पॉईंट सारख्या ठिकाणी देखील असे घडू शकते अगदी माझ्या कार्यालयाशेजारच्या इमारतीमध्ये जे मसाज पार्लर आहे तेथे हॅप्पी एंडिंग करून घ्यायला कोण कोण येते तुम्हाला नावे सांगितलीत तर तुम्ही आश्चर्याने तोंडात बोटे घालाल कारण या बड्या मंडळींना त्याठिकाणी घेऊन जाणारा मंत्रालयातील एक दलाल तो देखील माझ्या परिचयाचा असल्याने मला अगदी सहज नावें समजलीत. तर तो पत्रकार मित्र जगात कोठेही गेला तरी सर्वात आधी त्या त्या ठिकाणचे रेड लाईट एरिया नेमके कसे आणि कोठे याची सर्वात आधी माहिती घेऊन मोकळा होतो…
फार पूर्वी हा पत्रकार मुंबईत फोर्ट परिसरात त्याकाळी असलेल्या एका अशा बदनाम मसाज पार्लर मध्ये नियमित जात असल्याने तेथल्या एका मणिपाल वरून आलेल्या तरुणीचा त्याच्यावर जीव जडला. एवढा जीव जडला कि हा तिला टीप सुद्धा चेकने देत असे. हा जेव्हा केव्हा तिच्याकडे जायचा ती त्याला हमखास त्याचे व्हिजिटिंग कार्ड मागायची आणि हा चतुर पत्रकार उगाच पुढल्या भानगडी नको म्हणून कार्ड द्यायला टाळाटाळ करीत असे. शेवटी एक दिवस तिने खूप हट्ट केल्याने याने खिशातून एक कार्ड काढले आणि तिच्या हाती सोपवून मोकळा झाला कारण त्यानंतर त्याला तेथे जायचे नव्हते त्याने दुसरे पार्लर शोधून
ठेवलेले होते. पुढले अत्यंत महत्वाचे म्हणजे ते त्याचे व्हिजिटिंग कार्ड नव्हते ते मंत्रालायात सुंदर तरुण पत्नीला कायम सोबत ठेवून मोठी दलाली करणाऱ्या, एका स्वतःला बडा नेता म्हणवून घेणाऱ्या दलालाचे ते कार्ड होते, त्या दलालाचा नेमका पेशा मला येथे सांगायचा नाही त्यामुळे ते नाव अनेकांच्या लगेच लक्षात येईल. या पत्रकाराचे तिच्याकडे जाणे बंद झाल्याने ती त्या कार्ड वर असलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधून त्या दलालाशी हा पत्रकार मित्र समजून नको नको ते फाजील बोलायची…
स्वतःच्या बायकोला मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे पुढे करणारा हा दलाल का म्हणून अशा पार्लर्स मध्ये जाईल, तो तिच्या फोनमुळे अस्वस्थ होत असे, शेवटी एक दिवस त्याने तिला सरळ सरळ सांगून टाकले कि जेथे मलाच माहित नाही कि माझ्या बायकोला झालेली मुले माझी आहेत किंवा नाहीत तेथे मी का म्हणून तुझ्याकडे येईल, पुढे एक दिवस ती अचानक या पत्रकाराला कुठेतरी भेटली आणि घडलेला किस्सा तिने त्याला सांगितला. अर्थात हेच ते बाहेरख्याली पुरुष ज्यापद्धतीने साळसूदपणे आपापल्या बायकांसमोर सारे काही वाईट धंदे करून आदर्श पती म्हणून पाठ थोपटवून घेतात. मूळ मुद्द्याकडे आता वळतो. यादिवसात अनेकांचे नको त्या कामांसाठी जेव्हा फोन येतात मला वाटते आता मी देखील तेच करतो त्या पत्रकारासारखे, असे गमतीदार दूरध्वनी क्रमांक देऊन मोकळा होतो. एकाला पूजेसाठी भटजी हवा आहे त्याला भट ब्राम्हणांची नफरत करणार्याचा नंबर देऊन मोकळा होतो. अनेकांना दारू हवी असते, मला ज्या पद्धतीने ते सांगतात जसे काही मी हातभट्टी चालवणारी आंटी आहे. ज्यांनी उभ्या आयुष्यात दारूचा थेम्ब पण तोंडात घेतला नाही मला वाटते अशा काही मित्रांचे नंबर देऊन मोकळे व्हावे. दारूची दुकाने सुरु होऊन पुन्हा बंद होणार हे दारू विक्रेत्यांना नेमके माहित असल्याने अलीकडे दुकाने सुरु होताच जी झुंबड उडाली त्यात प्रामुख्याने दारू विक्रेत्यांचीच माणसे उत्पादन शुल्क खात्याला हाताशी धरून उभी करण्यात आली होती आता त्याच बाटल्या दहा पट किमतीने विकल्या जाणार आहेत यात तिळमात्र शंका नाही. ज्यांना हातभट्टी किंवा देशी दारू शिवाय काहीही चालत नाही अशा गरिबांनी त्या दोन तीन दिवसात सुटकेस पोती इत्यादी भरून जी लाखो रुपयांची दारू विकत घेतली तो मोठा दारू घोटाळा झाला एवढेच याठिकाणी सांगतो, त्यावर विस्तृत नक्की पुढे कधीतरी…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.