राज यांनी वाजवली सभा गाजवली
पूर्वी आपल्याकडे जेव्हा फियाट किंवा अँबेसिडर पलीकडे कार नसायच्या किंवा नव्हत्या तेव्हा माझ्याकडे विदेशी बनावटीच्या आकर्षक कार्स असायच्या. भारतीय कार्स मध्ये जशी इतर चाकांच्या तोडीस तोड स्टेपनी असते तशी स्टेपनी त्या विदेशी कार्स मध्ये नसायची, अगदी लहान आकाराची स्टेपनी असायची थोडक्यात कार्सचे टायर पंचर झाल्यानंतर अशी पिटुकली स्टेपनी लावून कार फारतर चार दोन किलोमीटर पर्यंत नेऊन टायर दुरुस्त करवून घ्यावे लागे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे असे नेते आहेत ज्यांना कोणत्याही विचारांच्या मराठी माणसाच्या थेट हृदयात स्थान आहे पण राज यांच्या नेतृत्वाची अवस्था त्या पिटुकल्या स्टेपनी सारखी हुबेहूब आहे म्हणजे दुसऱ्या फळीतील एखादा दुसरा संदीप देशपांडे यांच्यासारखा तगडा नेता सोडल्यास जवळपास इतर सारेच नेते त्यांच्याकडे त्या पिटुकल्या छोट्याशा स्टेपनीसारखे आहेत जो राज यांच्या मनसे चा मोठा ड्रॉ बॅक आहे असे मला राहून राहून वाटते. राज्यातल्या कानाकोपऱ्यात जर संदीप देशपांडे पद्धतीचे पाच पंचवीस नेते मनसे मध्ये असते किंवा टिकून राहिले असते तर सत्तेतले मनसेतले आजचे चित्र आहे त्या पेक्षा नक्की वेगळे दिसले असते. तरीही एकटे राज साऱ्यांना बऱयापैकी पुरून उरतात सतत कायम राजकीय चर्चेत असतात सार्यांना आकर्षित करतात आणि मनसे व महाराष्ट्र राष्ट्रात गाजवून सोडतात…
www.vikrantjoshi.com
भारतातले ख्रिश्चन्स बौद्ध आणि मुस्लिम्स भारताबाहेरून अजिबात आलेले नाहीत, या तिघांचेही मूळ हिंदू हेच आहेत होते कालानुरूप आपल्यातल्या भारतीय हिंदूंनी एकतर धर्मांतर केले किंवा अनेकांचे जबरदस्तीने किंवा फसवून धर्मांतर करण्यात आले विशेषतः मुस्लिम्स आणि ख्रिश्चन्स यांचे धर्मांतर तर हमखास फसवून किंवा जबरदस्तीने मोठ्या प्रमाणात करण्यात आले मात्र बौद्ध धर्मीय हे केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंदूंचे बौद्ध झाले हे तुम्हाला वेगळे सांगण्याची येथे गरज नाही, येथे हा धर्मांतराचा विषय यासाठी कि भारतातले महाराष्ट्रातले बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मीय जरी त्यांनी धर्मांतर केले किंवा धर्मांतर करण्यात आले त्यातून ते आजही हिंदू देवदेवतांना अजिबात विसरलेले नाहीत, अनेकदा त्या दोन्हींचे धर्मगुरू जरी या मंडळींना त्यांच्या मूळ हिंदुत्वापासून दूर नेण्याचा प्रयत्न करीत असले तरी यापैकी बहुतेकांच्या घरातून हिंदू देवदेवतांसमोर देखील तेवढ्याच आदराने आपुलकीने हात जोडले जातात मात्र बौद्ध आणि ख्रिश्चन्स धर्मियांप्रमाणे येथे मुसलमान जरी पूर्वी हिंदू होते नंतर त्यांना बाटवण्यात आले, बाटलेले हे सारेच मुसलमान त्याच हिंदूंचा अतिशय तिरस्कार राग द्वेष करतात त्यामुळे या देशातले बौद्ध आणि ख्रिश्चन्स जसे हिंदुस्थानमय झाले आहेत त्याचवेळी या देशातले बहुसंख्य मुसलमान मात्र स्वतःला अप्रत्यक्ष पाकिस्थानी समजतात आणि हिंदू व हिंदुस्थानचा मनापासून द्वेष करतात, आम्हाला पाण्यात पाहतात, सतत अख्ख्या हिंदुस्थानाला मुसलमान करण्याची स्वप्ने बघतात त्याच पद्धतिने त्यांचे प्रयत्न सुरु असतात आणि त्यांचे धर्मगुरू साऱ्या मुसलमानांना हिंदूंबाबत नफरत करण्याचे विष कालविण्यात स्वतःला धन्य समजतात सतत त्यात व्यस्त असतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आवाहनावरून जरी शिंदे फडणवीस सरकारने माहीमची मजार कबर उध्वस्त केलेली असली तरी जेव्हा केव्हा या राज्यात पुन्हा एकदा जर चुकून उद्धव आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सत्तेत आले तर अगदी नक्की अबू आझमी अस्लम शेख नवाब मलिक किंवा बाबा सिद्दीकी पैकी एखाद्या लबाड जात्यंध मुसलमानाला मुंबईचा पालक मंत्री करण्यात येईल आणि हेच पालक मंत्री तेव्हा सरकारी खर्चाने जमीनदोस्त केलेली हि माहीमची मजार पुन्हा उभे करून मोकळे होतील आणि नेमका उद्धव ठाकरे यांच्या याच खतरनाक वृत्तीचा पंचनामा व जाणीव गुढी पाडव्याच्या भाषणात राज ठाकरे यांनी करून दिली आणि नेमक्या उद्धव यांच्या याच वृत्तीचे स्वभावाचे पुरावे मी सतत कायम तुमच्यासमोर नेहमी मांडत आलेलो आहे. राज ठाकरे यांनी जावेद अख्तर यांच्या पाकिस्थानातील ज्या भाषणाचा उल्लेख केला हे अपवादात्मक, कारण हिंदूंनी कितीही डोके आपटले तरीही जात्यंध मुसलमान हिंदूंना हिंदुस्थानाला जवळ करतील जवळ घेतील हिंदुस्थानाशी एकरूप होतील हे कदापिही शक्य नाही आणि पाश्चिमात्य देशातले बाहेरून आलेले मुसलमान हमखास भारतीय पद्धतीने तेथे देखील धर्मांतर घडवून आणणे, लव्ह जिहाद, हल्ले आणि देशात अस्थिर वातावरण निर्माण करणे, पद्धतीने वागताहेत ज्याचा समाचार अशा मुसलमानांविरुद्ध जग पातळीवर मुस्लिमेतर मंडळींनी एकत्र येऊन घेणे अत्यावश्यक आहे किंबहुना मोदी यांचा नेमका तोच प्रयत्न असतो….
हेमंत जोशी