कसबा आणि चिंचवड कोणाची धडपड कोणाची परवड
आकाशात उंच कोठेतरी घार शांतपणे उडत असते पण अचानक ती जमिनीवर असलेल्या दिसलेल्या सावजावर झडप घालून फडशा पाडते, पवारांचे देखील हे असेच आहेत म्हणजे यादिवसात ते एकदम शांत आहेत पण त्यांची हि शांतता नेमकी नक्की वादळापूर्वीची शांतता आहे, होती शांत राहून त्यांनी अचानक झडप घेऊन पार पडलेल्या विधान परिषद आणि कसबा पोट निवडणुकीत विशेषतः भाजपा आणि शिंदे फडणवीस यांच्या सत्तेतल्या युतीला नाही म्हणायला घाम फोडला आहे त्याचवेळी मरगळलेल्या हडबडलेल्या उद्धव ठाकरे आणि राज्यातल्या काँग्रेस मध्ये अचानक उत्साहाचे वातावरण निर्माण करून प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची उरली सुरली शिवसेना तेही आंबेडकरांच्या वंचित शिवाय विरोधकांना घाम फोडून जेरीस आणून कोणत्याही निवडणुकात तोडीस तोड उत्तर देऊन मोकळे होऊ हा जणू फार मोठा धोक्याचा इशारा या पार पडलेल्या विधान सभा पोटनिवडणुका आणि विधान परिषद निवडणुका निमित्ते पवारांनी विशेषतः देशातल्या आणि राज्यातल्या भाजपा व एकनाथ शिंदे यांना दिला आहे त्यातून अतिशय वेगाने तातडीने जर राज्यातल्या शिंदे यांच्या शिवसेनेने आणि फडणवीस यांच्या भाजपाने हालचाली करून अपयशाची नेमकी करणे शोधून जर त्यावर नेमका तोडगा शोधून काढला नाही नेमक्या उपाय योजना आखल्या नाहीत तर राज्यात येत्या लोकसभा आणि विधान सभा निवडणूकातून त्यांना मोठी किंमत नक्की अदा करावी लागणार आहे. माननीय प्रकाश आंबेडकर यांचे चंचल, बेभरवशाच्या बायकोसारखे आहे असते म्हणजे अमुक एखाद्याला विनाकारण वाटत राहते कि प्रकाशजी संसार आपल्यासंगे सुखाने करताहेत किंवा करणार आहेत पण नवरा वेगळा आणि पोटातला गर्भ शेजारी राहणाऱ्या प्रियकराचा पद्धतीने आंबेडकर यांचे आजपर्यंतचे राजकारण खेळण्याची पद्धत आहे जी नेमकी उद्धव ठाकरे यांच्या अजिबात लक्षात आली नाही आणि त्यांनी फसगत झालेल्या नवऱ्यासारखी स्वतःची विशेषतः प्रकाश आंबेडकर बाबत स्वतःची गोची व फजिती करवून घेतलेली आहे विशेष म्हणजे अजूनही उद्धव ठाकरे स्वतःला राजकारणातले कौटिल्य धुरंधर समजत असतांना आजही तरीही ते प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार या दोन्ही वस्ताद उस्ताद प्रियकराच्या आकंठ प्रेमात बुडालेले असून त्यातून ते अतिशय वेगाने झपाट्याने स्वतःची व त्यांच्या शिवसेनेची बाजू लंगडी कमकुवत करण्यात मश्गुल आहेत गर्क आहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी