ठाकरे कुटुंबातील स्त्रिया
अगदी अलीकडे मी एकेकाळी जे ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय जवळचे मानले जायचे ज्यांचा ठाकरे कुटुंबाशी घरोबा होता निष्ठा होती जी कालांतराने ज्यांनी संपविली आणि खाल्ले त्याच घराचे वासे मोजायला सुरुवात आजतागायत ज्या अनेक कित्येक पत्रकारांनी केली त्यापैकी एक पत्रकार राजू परुळेकर यांचा, बाळासाहेब ठाकरे आणि एकंदर ठाकरेंवर कडक जबरी टीका करणारा, ऍनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली, या मथळ्याखाली लिहिलेला एक प्रदीर्घ लेख वाचला. राजू परुळेकर, निखिल वागळे, हेमंत देसाई या पत्रकार लेखकांची लेखणी कायम उत्तम पण त्यातले त्यांचे लिखाण कायम वादग्रस्त आणि स्वकेंद्रित जे यावेळी देखील परुळेकर यांच्या या लेखातून प्रकर्षाने जाणवले. ज्यांच्याशी आपण आधी घरोबा वाढवून विविध फायदे आधी उकळतो कालांतराने त्याच घराचे वासे मोजणारे काही पत्रकार जेव्हा मी जवळून बघतो, अशांची नक्की कायम घृणा येते, परुळेकर देखील त्यातलेच त्यामुळे त्यांच्या ठाकरे टिकेतले मुद्दे जरी अनेक ठिकाणी पटले तरीही बेईमानी करणारे केलेले राजू परुळेकर याठिकाणी मनाला भावले नाहीत. परुळेकर लिहितात ते मान्य आहे कि बाळासाहेब ठाकरेंच्या अखेरच्या भाषणामध्ये त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेला इतर कोणाविषयी देखील कळवळा न दाखवता केवळ माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या, हा जो मनाचा कमकुवतपणा दाखवला, मला वाटते बाळासाहेबांनी, उद्धव आणि रश्मी यांना नेमके ओळखलेच नाही आणि त्यातूनच आज उद्धव यांची व त्यांच्या शिवसेनेची वाट लागली आणि राज्यातले एकी असणारे हिंदुत्व विविध ठिकाणी विखुरले मग ते उद्धव, एकनाथ आणि भाजपा असे तिघांत वाटले गेल्यामुळे त्याचा मोठा राजकीय फायदा नक्की नजीकच्या कालात विरोधकांना होऊन पुन्हा एकवार मराठी माणसाला त्यातून मोठे नैराश्य येण्याची दाट मोठी शक्यता आहे…
www.vikrantjoshi.com
मातोश्री व त्याठिकाणी वास्तव्याला असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील स्त्रिया नेमक्या कशा आहेत कशा होत्या आणि कशा असायला हव्या होत्या त्यावर मला नेमके सत्य येथे मांडायचे आहे, जहरी आहे असले तरी ते पूर्ण सत्य आहे. सुरुवात अर्थात बाळासाहेबांच्या अर्धांगिनी मीनाताई ठाकरे यांच्यापासून केल्यास त्यांनी जसे मनापासून बहिणीच्या कुटुंबावर, भावावर, आपल्या मुलांवर सुनांवर आणि अर्थात बाळासाहेबांवर अगदी निस्वार्थ निरागस प्रेम अखेरपर्यंत केले त्याचपद्धतीने त्यांनी मातोश्रीवर कायम सतत येणाऱ्या प्रत्येक शिवसेना नेत्यांवर आणि वेळोवेळी राज्यातल्या शिवसैनिकांवर अगदी घरातल्या सदस्यांसारखे थोडक्यात साऱ्यांवर सतत कायम अखेरपर्यंत अगदी पुत्रवत प्रेम केले आणि मीनाताई यांच्या या मायाळू दयाळू दिलदार समजूतदार स्वभावाची थोडीशी किंचितशी जरी नक्कल त्यांच्या दोन्ही अति महत्वाकांक्षी सुनांनी म्हणजे स्मिता आणि रश्मी यांनी केली असती तर स्मिता आणि रश्मी दोघींना मोठे राजकीय शिखर पार करता आले असते पण स्मिता यांच्या जशा घरातल्या राजकारणातल्या स्वभावातल्या व्यवहारातल्या वागण्यातल्या अनेक भूमिका सतत वेळोवेळी चुकल्या केवळ त्यातून त्या ज्या आजमितीला पूर्णतः राजकारणापासून नजरेआड झालेल्या आहेत, रश्मी उद्धव ठाकरे यांनी देखील स्मिता यांच्यापेक्षा फारसे वेगळे काहीही केले नाही त्यांनी तर अजिबातच मीनाताई यांच्या सतत सहवासात संस्कारात राहून देखील त्यांना दुसर्या मीनाताई अजिबात होता न आल्याने उद्धव यांनी आपले व शिवसेनेचे फार मोठे कायमसवसरूपी नुकसान करवून घेतलेले आहे…
मिनाताई फार मोठ्या मनाच्या होत्या त्यामुळेच त्यांच्या इच्छेविरुद्ध जेव्हा जयदेव यांनी आधीच्या पत्नीला बाहेर काढून थेट मातोश्रीवर स्मिता यांना पत्नी म्हणून स्थान दिले, मिनाताई, बाळासाहेब आणि मातोश्रीवर ये जा करणारे मनोहर जोशी सुधीर जोशी सुभाष देसाई लीलाधर डाके असे असंख्य दुसऱ्या फळीतले मोठे नेते हे सारेच दुख्खी झाले होते पण दिलदार स्वभावाच्या मीनाताई यांनी स्मिता यांना देखील मोठ्या प्रेमाने एवढे जवळ केले कि मीनाताई यांच्या मृत्यूपर्यंत केवळ स्मिता ठाकरे याच इतर दोन्ही सुनांच्या तुलनेत बाळासाहेब व मीनाताई यांच्या सर्वाधिक जवळच्या विश्व्सातल्या होत्या तसे मानल्या जायच्या किंबहुना मीनाताई आणि बाळासाहेब दोघेही स्मिता यांच्याकडे पुढल्या राजकीय वारसदार म्हणून बघायचे पण स्मिता यांना मातोश्री व शिवसेनेतले आपले स्थान आपले प्रभावी बलदंड नेतृत्व टिकवता आले नाही कि जयदेव किंवा रश्मी व उद्धव यापैकी त्यांना नेमके कोणी राजकारणातून व मातोश्रीवरून बाहेर काढले त्यावर देखील मी तुम्हाला नक्की नेमके सांगून मोकळे होणार आहे. नाही म्हणायला आजही स्मिता ठाकरे यांचा एक माळा वारसा हक्काने मातोश्री इमारतीमध्ये आहे पण कधीतरी त्यांची मुले फारतर तेथे राहायला जातात मात्र एकेकाळी मातोश्रीवर असलेला रुबाब व दबदबा आज अस्ताला गेल्याने स्मिता त्याठिकाणी जाणे टाळतात हि वस्तुस्थिती आहे. थोडक्यात काय तर मीनाताई गेल्या बाळासाहेब देखील गेले स्मिता यांना घालविण्यात आले आणि राज ठाकरे यांना मातोश्रीवर येण्यास मनाई करण्यात आली आणि मोठ्या खुबीने रश्मी तसेच उद्धव यांनी मातोश्रीची संपत्तीची शिवसेनेची शिवसेना भावनाची सारी सूत्रे आपल्याकडे घेतली नि तेथूनच नाशाच्या महाभारताला सुरुवात झाली..
अपूर्ण : हेमंत जोशी