वेश्या व्यवसाय बंद करा त्यापेक्षा कॉलगर्ल व्हा
राष्ट्र प्रथम हा विचार जेव्हा या राज्यातल्या या राष्ट्रातल्या नसानसातून भिनला तरच यापुढे काही खरे आहे अन्यथा चार दोन सध्याचे नेते एकदा बाजूला पडले तर आपला देखील पाकिस्थान व्हायला वेळ लागणार नाही. याठिकाणी आपण केवळ आपल्या महाराष्ट्राचा विचार करूया म्हणजे ज्या मोजक्या लोकांच्या हाती हे राज्य आहे त्यांनी राष्ट्र प्रथम हा विचार मनात ठेवून आहे ती सध्याची पैसे खाण्याची पद्धत जराशी बदलली तरीही आपले राज्य या राष्ट्रात पैसे खाण्याच्या बाबतीत रोल मॉडेल म्हणून पुढे येईल अर्थात त्यासाठी ज्या मूठभर लोकांच्या हाती या राज्याची सत्ता आहे त्यांनी स्वतःमध्ये बदल करून त्यांनी आपल्यापुढे माजी सनदी अधिकारी टी चंद्रशेखर आणि एक म्हणाल तर नामचीन म्हणाल तर लोकमान्य लोकप्रिय केंद्रीय मंत्री या दोघांच्या पद्धतीने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे आवश्यक आहे. एखाद्या सतत नियमित वेगाने धंदा घेणाऱ्या, अनेकांना सतत उरावर घेणाऱ्या वेश्येने जसे कॉलगर्ल म्हणून स्वतःमध्ये बदल घडवून आणावा ते तसे नेमके बदल या राज्यातल्या सध्याच्या पैशांवर तुटून पडलेल्या मोजक्या मूठभर मंडळींना स्वतःमध्ये घडवून आणायचे आहेत. विशेषतः आपल्या या राज्यात मंत्रालय कर्मचारी, मंत्र्यांचा स्टाफ, कंत्राटे घेणाऱ्या विविध कंपनीज, अधिकारी राज्यातले सरकारी अधिकारी व कर्मचारी, शासकीय अभियंते, कंत्राटदार, दलाल, विविध आमदार नामदार खासदार आणि सरकार, मीडिया, प्रशासकीय अधिकारी विविध राजकीय पक्षातले बहुसंख्य नेते पदाधिकारी, विविध राजकीय घराणे, विविध व्यापारी, व्यावसायिक इत्यादी मोजक्या मंडळींना ज्यांच्या हाती या राज्याच्या अती सामान्य लोकांची सर्वसामान्यांची सत्ता आहे त्यांना त्या सर्वांना आपल्या वृत्तीमध्ये थोडासा छोटासा इवलासा बदल घडवून आणायचा आहे तो बदल असा कि टी चंद्रशेखर किंवा पंतप्रधान पदाच्या एकेकाळी शर्यतीत असणाऱ्या त्या केंद्रीय मंत्री पद्धतीने या राज्याचा या राष्ट्राचा विकास जर तुम्ही घडवून आणला तर आपल्या या राज्याचा आपल्या या राष्ट्राचा जगात हात धरणारे इतर एकही राष्ट्र उरलेले नसेल. तो मंत्री व चंद्रशेखर पद्धत अशी कि समजा तुम्हाला अमुक एखाद्या शहराचा विकास घडवून आणायचा आहे किंवा एखादा महामार्ग विकसित करून आणायचा असेल आणि त्यावर समजा शंभर कोटी रुपये खर्च होणार असतील तर त्या शंभर कोटीतला एकही रुपया स्वतःच्या खिशात न टाकता तमुक एखादा प्रकल्प दर्जेदार उभा करून मोकळे व्हा, अख्खे शंभर कोटी रुपये ठरल्याप्रमाणे केवळ त्याच प्रोजेक्टवर खर्च झाले पाहिजे त्यानंतर जर स्वतःच्या घरी देखील मोठ्या प्रमाणात पैसे न्यायचे असतील तर तोच शंभरकोटी रुपयांचा प्रोजेक्ट दीडशे कोटी रुपयांना दाखवून मोकळे व्हा थोडक्यात त्यातले पन्नास कोटी तुम्हाला वाटून खाता घेतील वरून मूळ योजना, प्रोजेक्टच्या दर्जात कोठेही कसूर उरणार नाही, या देशात त्या गडबडकरी म्हणून त्यांच्या पक्षात नामचीन ठरलेले ते केंद्रीय मंत्री यांनी हाती घेऊन झपाट्याने पूर्ण केलेल्या प्रोजेक्ट मध्ये कधीही कोणालाही नावे ठेवायला जागा नसते, अगदी विरोधक पंतप्रधानसहित सारेच अगदी जाहीर त्यांचे कौतुक करून मोकळे होतात, मी देखील या पद्धतीचे अगदी उघड समर्थन करतो. पण नेमके इतर करतात काय कि शंभर कोटींच्या प्रोजेकट मधून आधीच निम्मे पैसा काढून खाऊन मोकळे होतात नंतर त्या मूळ शंभर कोटी रुपयांच्या प्रोजेक्टची किंमत हळूहळू वाढवत ती दोनशे तीनशे कोटी वाढवत नेऊन ते वरचे पैसे देखील खाऊन फ़स्त करतात त्यामुळेच तो मंत्री किंवा चंद्रशेखर पद्धतीचा या राज्यातला एकही प्रोजेक्ट तुम्हाला उभा राहिलेला कधीही दिसणार नाही कारण असे दर्जाहीन प्रोजेक्ट उभे करणारे अतिशय नीच व नालायक सत्ताधारी सतत सत्तेभोवताली आपल्या या राज्यात चिटकून बसलेले आहेत त्यातून फक्त आणि फक्त मूठभर मंडळींचे फार मोठ्या प्रमाणात भले झालेले आहे. त्यामुळे एकटा देवेंद्र फडणवीस प्रसंगी आपला जीव गमावून बसेल पण सत्तेला सतत चिकटलेले हे नीच हे हरामखोर हे राष्ट्रद्रोही कधीही सुधारणार नाहीत, या मंडळींवर तात्पुरती वचक दहशत निर्माण करून काहीही उपयोगाचे नाही त्यापेक्षा त्या मोदी यांच्याशी थेट पंगा घेतलेल्या केंद्रीय मंत्र्याची किंवा टी चंद्रशेखर यांची राष्ट्रहित आणि स्वहित पद्धत अमलात आणलेली बरी….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी