आघात आणि घातपात : राजकारणातल्या टोळीयुद्धाला सुरुवात
90 च्या दशकात महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या टोळीयुद्धाला सुरुवात झाली अतिरेक झाला आणि पोलिसांनी हाती शस्त्रे घेतली त्यात अनेक गुंडांचा खात्मा करण्यात आला, टोळीयुद्ध थांबले सारे काही शांत झाले, 2010 दरम्यान राज्यातल्या खतरनाक राजकीय टोळीयुद्धाला सुरुवात झालेली आहे असे मी लिहिले होते कारण राजकारणातून राजकारणाच्या भरवशावर अगदी सहज अति प्रचंड पैसा मिळविता येतो त्यासाठी थोडेफार देशभक्तीचे नाटक करावे लागते हे टोळीयुद्धाचे जनक गुरु महागुरू शरद पवार प्रमोद महाजन अशा चार दोन नेत्यांनी येणाऱ्या पुढल्या पिढीला शिकविले त्यातूनच मग राज्यातले सरकारी कर्मचारी अधिकारी प्रशासकीय अधिकारी राजकारणी दलाल मीडिया विविध राजकीय पक्ष आमदार खासदार नेते विविध पक्षातले कार्यकर्ते बनेल बदमाश भ्रष्ट वृत्तिचे तयार झाले आणि बघता बघता हे सारे मिळून एखादा दुसरा अपवाद वगळता आपल्याच मातेवर आईवर या मातृभूमीवर दररोज न चुकता अगदी आजही बलात्कार करताहेत करू लागले, 1995 पर्यंत त्या मंत्रालयात जेव्हा मी आणि नामदेव ढसाळ आमच्या विदेशी गाड्या पार्क करत असू त्या बघायला जे कुतूहलाने उभे राहायचे अशी कार आपल्याकडे असावी स्वप्ने रंगवायचे आज त्याच मंडळींकडे एकाचवेळी अशा कितीतरी स्वतःच्या मालकीच्या कार्स घरासमोर उभ्या आहेत कारण 1990 नंतर सत्तेतल्या व सत्तेत नसणार्या पण सत्ते सभोवताली रेंगाळणाऱ्या साऱ्यांची छुपी युती झाली व त्यातील प्रत्येक पुरुष व स्त्रियादेखील माझ्या या मराठी भूमीवर व्यवस्थित सतत बलात्कार करू लागले किंवा आपल्याच आईला म्हणजे मातृभूमीला ते विकू लागल्याने मोठ्या रकमांची आता त्यातल्या प्रत्येकाकडे रेलचेल आहे.
www.vikrantjoshi.com
शिवसेना संपविण्याच्या नादात भाजपचे मोठे अधिक नुकसान होईल उलट त्यातून उद्धव ठाकरे अधिक मोठे होतील हा विचार अमित शाह यांनी एक दिवस देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोलून दाखविला म्हणजे उद्धव यांच्यातली आक्रमकता जर हिंदू आणि मराठी आचार विचारांना मोठी करणारी असती तर त्यांना राजकारणातून कायमस्वरूपी संपविण्यात मोदी शाह फडणवीस यांनी कदाचित रस घेतलाही नसता पण भाजपाला दूर सारून कमी लेखून पैसा हेच प्रमुख उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून उद्धव यांनी त्यांच्या सवंगड्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जो धुडगूस घालणे सुरु ठेवले होते तो अतिरेक जेव्हा या तिघांनाही रुचला नाही आवडला नाही आणि त्यातून ज्या मोठ्या राजकीय हालचाली अलीकडच्या काही वर्षात सुरु झाल्या तेव्हाच माझ्या हे लक्षात आले कि मोठ्या राजकीय टोळीयुद्धाला सुरुवात नक्की होईल ज्यात काँग्रेस पवार आणि उद्धव यांच्यासारख्या नेक बिलंदरांचा राजकीय खात्मा करूनच हे तिघे मोकळे होतील. फक्त कोणतेही राजकीय युद्ध खेळतांना मोदी व शाह हे त्यांच्या मनःस्वास्थ्यावर व शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होऊ देत नाहीत आणि फडणवीस हे भावनिक मराठी नेतृत्व असल्याने ते मात्र या अशा कटकटी व दगदगीचा धावपळीचा विपरीत परिणाम आपल्या तब्बेतीवर करवून घेतात ज्याची त्यांच्या अतिशय जवळ असलेल्यांना कायम मोठी काळजी असते. मोदी शाह फडणवीस यांनी शिवसेना संपवली नाही, फक्त त्यांनी अगदी कायमस्वरूपी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंब सदस्यांना शिवसेनेतून यापुढे कायमस्वरूपी दूर केले आहे म्हणजे यानंतर उद्धव आणि कुटुंब आणि उरले सुरले चेले चपाटे यांचा शिवसेना या शब्दाशी या सन्घटनेशी या पक्षाशी काडीचाही कवडीचाही संबध उरलेला नसेल. अत्यंत मोठा गौप्य्स्फोट या ठिकाणी करतो कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व् हिंदू परिषद, भाजपा, अभाविप, बजरंग दल अशा ज्या असंख्य विविध बहुसंख्य अनेक नानाविध संघटना जगभरात राज्यात देशात काम करतात तशी एक सन्घटना आता नव्याने जन्माला आलेली आहे विशेष म्हणजे ती फडणवीस मोदी आणि शाह या तिघांनी जन्माला घातलेली आहे….
आणि त्या प्रभावी वजनदार दमदार संघटनेचे पक्षाचे नाव आहे एकनाथ शिंदे या मराठा नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना थोडक्यात हिंदुस्थानातल्या सर्वाधिक प्रभावी रा स्व संघाची आणि भाजपाची सारी प्रचंड ताकद सतत एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या पाठीशी यापुढे कायमस्वरूपी उभ्या केली जाईल ज्यातून उद्धव हे नेतृत्वातून काळाच्या पडद्याआड जातील आणि बाळासाहेबांची शिवसेना अधिकाधिक नक्की बहरत जाईल. माझ्या गावात एक होलसेल किराणा व्यापारी होता गावातल्या सामान्य ग्राहकाला त्याच्या दुकानात मोठी खरेदी करणे अशक्य होते म्हणून त्या व्यापाऱयाने गावात एक आणखी किरकोळ दुकान काढले हे असे आता यापुढे भाजपा आणि शिवसेनेचे म्हणजे ज्यांना भाजपा मध्ये जायचे नाही त्या सर्वांना नक्की शिवसेना हा नवा पर्याय या तिघांनी उपलब्ध करून दिला आहे, आजतरी उद्धव यांचे नेतृत्वरुपी प्रेत कुठेतरी कोपऱ्यात निपचित पडलेले तुम्हाला दिसेल जे घडायला नको होते पण उद्धव पती पत्नीची राक्षसी व लोभी महत्वाकांक्षाच त्यांना नक्की आजतरी राजकारणातून सत्तेतून संपवून मोकळी झालेली आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी