अरेरे ! उद्धव अखेर आयुष्यातून उठले
माझा साधारणतः पंधरा दिवसांपूर्वीचा व्हिडीओ पुन्हा अवश्य बघा कारण मी जे बोललो होतो सांगितले होते तेच घडले, राज्याच्या राजकारणात पुढले पंधरा दिवस अत्यंत धामधुमीचे असतील काहीतरी विपरीत घडेल मी म्हणालो होतो नेमके ते तसेच घडते आहे, उभे राज्य उद्धव ठाकरे यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगामुळे म्हणाल तर चर्चेत आहे म्हणाल तर अस्वस्थ झाले आहे अचंबित झाले आहे. उद्धव यांची आजची अवस्था कंस मामासारखी झालेली आहे म्हणजे घरातल्या शिवसेनेतल्या आडव्या येणाऱ्या प्रत्येकाला ज्या उद्धव यांनी संपविले राजकीय जीवनातून उठविले नोव्हेअर केले अपमानित केले कधी घराबाहेर तर कधी पक्षाबाहेर काढले ते सारे एकवटले एकत्र आले आणि उद्धव यांना आज पुरून उरले, उद्धव यांच्या हातून सारे काही हिसकावून घेतले, उद्धव यांचे जर डोके ठिकाणावर असेल तर त्यांनी जमविलेल्या अमाप समाप अमर्याद अफाट अचाट संपत्ती वाचविण्यासाठी पुढली धडपड करावी अन्यथा पुढल्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांची दडवलेली संपत्ती देखील त्यांच्याकडून हिसकावून घेतल्या जाईल आणि हिशेब न देऊ शकल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबियांना देखील नक्की गजाआड व्हावे लागेल. जाने दो अपने बालासाब का बेटा है, केवळ या प्रेमाखातर वर दिल्लीतून अद्याप ऍक्शन घेतल्या गेलेली नाही अन्यथा उद्धवजी तुमच्याकडून ते देखील नक्की केव्हाही हिसकावून घेतल्या जाऊ शकते, हीच वस्तुस्थिती आहे…
www.vikrantjoshi.com
कृष्ण जन्माला आला आणि त्याने कंस मामाचा वध केला यापेक्षा वेगळे असे काहीही तुमच्याबाबतीत घडलेले नाही, 27 तारखेला बजेट अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशी उरले सुरले आमदार आणि खासदार शंभर टक्के एकतर राजीनामा देऊन मोकळे होतील पण आजच्या त्यांच्या हालचाली बघता उद्धवजी तुमच्याकडले मुंबईतले बहुसंख्य नगरसेवक,राज्यातले आमदार आणि खासदार मला वाटते किंवा माझ्या माहितीनुसार शिवसेनेत नक्की सामील होतील म्हणजे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून मोकळे होतील कारण कायदा तेच सांगतो आहे त्यांच्यासमोर दुसरा अन्य कोणताही उपाय नाही त्याच्यामुळे तुम्ही आणि आदित्य फारतर जर एकनाथ शिंदे यांच्या बाजूला त्यांच्या रांगेत बसला नाहीत तर राजीनामा देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय तुमच्यासमोर उरलेला नाही. पैशांच्या बाबतीत सतत लेना बँक म्हणजे देना शब्द तुमच्या शब्द कोशातच नाही नव्हता आणि मोठा होऊ पाहणाऱ्या मग तो घरातला असेल किंवा शिवसेनेतला, प्रत्येकाला आयुष्यतून उठविणे हे एकमेव काम तुम्ही केले आणि या सार्या पापाचा आज घडा भरल्याने तुमच्यावर हि दयनीय परिस्थिती ओढवलेली आहे. मराठी मतदार तुमच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान करेल तुमच्या बाजूने यापुढे उभा ठाकेल असे वाटत नाही आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला मतदान करणारा मुसलमान नक्की तुम्हाला सलाम ठोकणार नाही, प्रकाश आंबेडकरांच्या आणि शरद पवारांच्या भरवंशावर म्हणे कधीही सत्तेची स्वप्ने बघायची नसतात, थोडक्यात तुम्हाला येथेही वेळीच मी सावध करतो आहे, सारे काही फक्त मला माझ्या पत्नीला आणि दोन मुलांना या हव्यासापोटी उद्धवजी तुम्ही पराक्रमी असूनही धारातीर्थ पडला आहात, स्वार्थ माणसाला संपवतो….
क्रमश: हेमंत जोशी