राजभवन : क्या है राज ?
आज 24 जानेवारी, 23 जानेवारीला मी याच ठिकाणी तुम्हाला अगदी सकाळी 9 वाजता सांगितले कि भगतसिंग कोश्यारी यांचे राज्यपाल पद जाणे हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे आणि मला व विक्रांत दोघांनाही राज भवन वरून एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीने फोन करून विचारले कि तुम्हाला हे काही तास आधी कसे कळले कारण याच दिवशी दुपारी स्वतः राज्यपाल महोदय त्यांच्या गच्छंती बाबत नेमक्या शब्दात प्रेसला सांगणार होते, पण मी त्याआधीच बातमी लीक केली त्यातून कदाचित राज्यपाल महोदयांसहित सर्वांना अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर मित्रांनो, यानंतर कोणत्याही क्षणी राज्यपाल महोदयांना, तुम्ही राजीनामा द्या, हे नक्की सांगितले जाणार आहे म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांची गच्छंती अटळ आहे, ते तसे नक्की ठरलेले आहे. आता येथे काही घडलेली उदाहरणे सांगतो, तुम्हाला जर वाटले कि मी दिलेल्या उदाहरणांचा संबंध कोश्यारी यांच्या वर्तुणुकीशी वर्तनाशी कार्य पद्धतीशी वागण्याशी जोडायचा आहे तर तो तुमचा अधिकार आहे , मी जस्ट वेळ घालविण्यासाठी म्हणजे टाइम पास म्हणून येथे काही प्रसंग आणि उदाहरणे सांगून मोकळा होणार आहे…
आपल्या या राज्याचे काही वर्षांपूर्वी जे एक मुख्य सचिव होते ते अमुक एखादा कागद हाता वेगळा करण्यासाठी प्रसंगी अगदी पाच हजार रुपये देखील स्विकारुन मोकळे व्हायचे, एवढे ते पैशांचे लोभी किंवा वागण्यात चिप होपलेस बेक्कार टुक्कार हलकट होते. आणखी एक घडलेला प्रसंग, मुंबईत घडलेला. माझ्या अगदी दुरून ओळखीचे एक कुटुंब पवईला राहायचे. बायको देखणी आणि नवरा मोठ्या पगाराच्या नोकरीवर होता पण पत्नीच्या बाबतीत स्वभावाने अति कंजूष, बाहेर मात्र स्वतःवर भरपूर पैसे उधळायचा. एक दिवस त्याने पवईच्या एका पंचतारांकित हॉटेलात रूम बुक केली आणि मौज मजा करण्यासाठी एका कॉल गर्लला बोलाविले, धक्कादायक असे कि तो जो आपल्या बायकोला एकदम सज्जन शांत शरीफ खानदानी समजत होता नेमकी तीच त्याच्या खोलीत कॉल गर्ल म्हणून सोबतीला आली. अर्थात त्या दोघांचा अगदी तडकाफडकी घटस्फोट झाला. एखाद्या सस्पेन्स सिनेमा सारखे अनेक विविध प्रसंग आपल्या सभोवताली असे अनेकदा घडतांना आपण बघतो म्हणजे ज्याला आपण मसीहा साधू संत संस्कारी शरीफ सज्जन समजतो नेमका तोच एक दिवस या समाजाचा खरा खलनायक आहे हे जेव्हा आपल्याला कळते, माणसे चांगली असू शकतात, त्यावर आपला विश्वास कायमचा उडतो….
www.vikrantjoshi.com
अगदी अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या या राज्यात लागोपाठ दोन वेळा येऊन गेले म्हणजे आधी ते नागपूरला आले होते त्यानंतर मोदी मुंबईला येऊन गेले. या दोन्ही वेळी मी मोदी त्यांना सतत निरखत असतांना माझ्या ते लक्षात आले कि मोदी आणि पवार या दोघात एक कमालीचे साम्य असे आहे कि जेव्हा केव्हा पवारांना एखाद्याला नॉव्हेअर करायचे असते, राजकारणातून बाजूला सारून एकटे पाडायचे असते संपवायचे असते, एखाद्या मोठ्या माणसाचे महत्व कमी करायचे असते तेव्हा शरद पवार त्या नेत्याला किंवा महत्वाच्या व्यक्तीला मोठ्या खुबीने गर्दीच्या ठिकाणी किंवा चार चौघात टाळतात त्याच्याशी बोलणे हसणे टाळतात थोडक्यात त्याला निग्लेकट करून अपमानित करतात जेणेकरून या माणसाचे माझ्याकडले महत्व संपले आहे, हा संदेश जणू ते देऊन मोकळे होतात जे सेम वागणे नरेंद्र मोदी यांचे वाटले, म्हणजे नागपुरात त्यांनी मोठ्या खुबीने किंवा पवार पद्धतीने थेट नितीन गडकरी यांना अगदी जाहीर त्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊन त्यांना आधी सतत खजील केले थोडक्यात तुमचे महत्व मी आता कमी केलेले आहे हे इतरांना जाहीर दाखवून दिले. नेमकी तीच पद्धत मोदी यांनी मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बाबत वापरली, त्यांच्याकडे मुद्दाम सर्वांसमोर सतत दुर्लक्ष जेव्हा केले तेव्हाच माझ्या लक्षात आले कि कोश्यारी बाबत काही गंभीर तक्रारी थेट त्यांच्या पर्यन्त पोहोचल्या आहेत….
आणि 23 जानेवारीला माझ्या बातमीनंतर कोश्यारी यांनी राज्यातून बाहेर पडण्याची थेट कल्पना देतांना नकळत मोठ्या खुबीने कायम स्वरूपी राजकीय निवृत्तीची घोषणा करून देखील ते मोकळे झाले, एक प्रकारे कळत नकळत केलेल्या काही चुकांची त्यांनी अप्रत्यक्ष मोदी यांना या पत्रकातून कबुली देत, मी महाराष्ट्रातून बाहेर पडतो आहे, हे सांगून ते मोकळे झाले. याच नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने हसत खेळत अगदी मनमोकळेपणाने लागोपाठ या दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे यांना जवळ घेतले कौतुक केले प्रेम दिले, एकनाथ शिंदे हे जसे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे ते तसेच मोदी यांचे लाडके आणि आवडते आहेत हेही याच नरेंद्रमोदी यांनी त्या शरद पवार पद्धतीने राज्याला दाखवून दिले. भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर नवे राज्यपाल जेव्हा येतील तेव्हाच त्या बारा विधान परिषद सदस्यांच्या नावाची घोषणा होईल हे नक्की आहे, अर्थात वादग्रस्त भगतसिंग कोश्यारी हा विषय येथेच संपत नाही….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी