हंगामा हंगामा हंगामा परिषद निवडणुकीतला धिंगाणा
मुले मोठी झाली राजकारणात आली कि कोणत्याही नेत्याचे इतर नातेवाईंकांडे नक्की दुर्लक्ष होते म्हणजे जे दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार किंवा सुनील तटकरे इत्यादी आजतागायत अनेकांचे झाले तेच नेमके त्या नगर जिल्ह्यातल्या बाळासाहेब थोरात यांचे देखील झाले म्हणजे थोरली विवाहित डॉक्टर मुलगी राजकारणात येते आहे असे त्यांना दिसताच हळूहळू बाळासाहेब थोरातांचे देखील फार पूर्वीपासून त्यांच्याच संगतीने राजकारणात आणि काँग्रेस मध्ये व्यस्त असणाऱ्या नगराध्यक्ष भगिनी दुर्गा व विधान परिषद सदस्य जावई आमदार डॉ सुधीर तांबे यांच्याकडे जसे दुर्लक्ष व्हायला लागले हळूच त्यांच्या भाच्याने देखील मग वेगळी राजकीय चूल मांडायला सुरुवात केली ज्याची डॉ सुधीर आणि दुर्गाताई यांना पूर्णतः कल्पना होती आणि मामा बाळासाहेबांना देखील भाचा सत्यजित राजकीय काड्या करतोय हे लक्षात आलेले होते त्यामुळे बाळासाहेब थोरात बऱ्यापैकी तांबे कुटुंबियांच्या बाबतीत सावध झालेले होते, सत्यजित यांची फडणवीस व अन्य काही महत्वाच्या भाजपा नेत्यांशी वाढलेली जवळीक मामांच्या नक्की लक्षात आलेली होती त्यामुळे भाच्याने खर्या अर्थाने थोरात बाळासाहेबांना मामा बनविले,या राजकीय गॉसिप किंवा चर्चेला तसा अजिबात अर्थ नाही…
ज्याला डोक्यावर घेतले त्यानेच अंगावर मुतून ठेवले किंवा ज्या मामाने घरात आसरा दिला त्यानेच मामाची पोरगी पळवली असा काहीसा चित्र विचित्र अनुभव अलीकडे खुद्द देवेंद्र फडणवीसांना विशेषतः सुजय आणि राधाकृष्ण विखे पाटील या पिता पुत्राच्या बाबतीत आला आहे किंवा येत चालला असल्याची माझी पक्की माहिती आहे ज्यात कदाचित स्वतः फडणवीस यांना काहीसे आश्चर्य वातातदेखील असेल पण मी गेली चाळीस वर्षे विखे पाटील यांच्या तिन्ही पिढ्यांचा अगदी जवळून राजकीय व राधाकृष्ण यांचा आर्थिक अभ्यास करीत आल्याने हे असे फडणवीसांच्या बाबतीत घेणार आहे त्यावर मी माझी शंका त्यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांकडे बोलून दाखवली होती विशेष म्हणजे विखे पाटील हे त्यांच्या सहकार क्षेत्रात बऱ्यापैकी नुकसानीत असतांना देखील त्यांनी आपणच जणू सहकार क्षेत्राचे या राज्यातले मसीहा आणि देशातले अभ्यासू अशी प्रतिमा विशेषतः फडणवीसांना टाळून थेट अमित शाह यांच्याकडे उभी केली होती त्यामुळे जर फडणवीसांना वर दिल्लीत बोलावून घेतले तर राज्याचा पुढला मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे वातावरण निर्माण करण्यात सुजय व राधाकृष्ण यशस्वी ठरल्याने वरून त्यांच्याकडे या दिवसात अत्यंत महत्वाचे असे मंत्री म्हणून महसूल खाते असल्याने त्यांनी अगदी हळूच फडणवीस यांना मोठी राजकीय स्पर्धा मोठ्या खुबीने मोठ्या चलाखीने उभी केलेली आहे आणि हेच नेमके वास्तव आहे….
www.vikrantjoshi.com
होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यातून याच विखे पाटील पिता पुत्रांना आपली नेमकी राजकीय ताकद आणि हुशारी दाखविण्यासाठी मला वाटते त्या देवेंद्र फडणवीसांनी तांबे पिता पुत्राला जवळ घेतले आहे मोठी राजकीय ताकद दिलेली आहे ज्या सुवर्ण संधीची मोठ्या आशेने तसेही तांबे कुटुंबीय वाट पाहत होते जी संधी त्यांना फडणवीसांनी मोक्याच्या वेळी उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष म्हणजे त्या बाळासाहेब थोरात यांचे नगर जिल्ह्यातील राजकीय महत्व कमी करण्यात नक्की फडणवीस यांचा उद्देश नाही किंवा त्यांना तसे अजिबात वाटत नाही पण ज्याच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या दिल्या त्यानेच रक्कम लांबविली यापद्धतीने जे राजकारण करणे या दिवसात त्या राधाकृष्ण विखे पाटलांकडून सुरु आहे वरून त्यांना काही कळीचे भाजपातले काही नारद ज्या पद्धतीने राज्यात व केंद्रात सहकार्य करताहेत त्याला नक्की चेकमेट म्हणून फडणवीस यांनी सत्यजित यांना संधी देऊन विशेषतः महसूल मंत्री म्हणून वादग्रस्त ठरलेल्या विखे पाटील यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे, विशेष म्हणजे भाजपा म्हणजे काँग्रेस नव्हे कि फडणवीस यांना बायपास करून विखे पाटील सत्तेचा राजकारणात पुढे निघून जातील, हे घडणे असे होणे अजिबात शक्य नाही आणि त्यांच्या हातून जर हि चलाखी लबाडी या दिवसात घडत असेल तर त्यांचा रस्ता राजकीय अस्ताकडे चालला आहे हे माझे वाक्य आज अधोरेखित करून ठेवा…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी