पंकजाविषयी थोडेसे, होईल एकनाथ खडसे
अगदीच काही महिने मागे जा आणि माझा तो व्हिडीओ बघा ज्यात मी धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस या दोघातली मध्यरात्रीची गुप्त भेट व दोघातली राजकीय खलबते त्यावर भाष्य केले होते अर्थात त्यावर मी हि माहिती उघड केली म्हणून माझे आवडते धनंजय मुंडे नेमके माझ्यावर रुसले होते नाराज झाले आणि त्यांनी त्यावर माझ्याशी फोनवरून तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती अर्थात त्या दोघातल्या गुप्त भेटीविषयी मी लगेचच बोलणे त्या दोघांच्या राजकीय हालचाली उघड करणे नक्की धनंजय मुंडे यांना परवडणारे नव्हते म्हणून त्यांची त्यावर नाराजी स्वाभाविक होती, पण मी त्यावेळी जे सांगितले तेच नेमके सत्य होते जे पुढे नजीकच्या भविष्यात घडणार होते, थोडक्यात जे सांगितले आता तेच घडणार आहे पण एकाच म्यानात दोन दोन तलवारी कशा राहतील त्यावर काहींनी माझ्याशी खाजगीत शंका व नाराजी व्यक्त केली होती. वाचकांनो, पुढल्या काही दिवसात नेमके नक्की तेच घडणार आहे म्हणजे पंकजा आणि प्रीतम मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देतील त्यानंतर त्या लगेच उद्धव यांच्या शिवसेनेत प्रवेश करून मोकळ्या होतील त्यानंतर एक नक्की घडणार आहे म्हणजे माना या न माना पण देवेंद्र फडणवीस यांचे लाडके व जवळचे धनंजय मुंडे अर्थात भाजपामध्ये प्रवेश करून मोकळे होतील जे गेल्या काही वर्षांपासून नेमके मोदी यांच्या देखील मनात आहे, खुद्द मोदी यांना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कायम डोकेदुखी ठरणाऱ्या आणि कटकटी करणाऱ्या दोन्ही मुलींऐवजी त्यांची पसंती धनंजय मुंडे हीच आहे कारण त्या धनंजयमध्ये मोदी शहा फडणवीस आणि अन्य भाजपा नेत्यांना गोपीनाथ मुंडे हुबेहूब दिसतात कारण धनंजय ते तसेच वागतात…
www.vikrantjoshi.com
फार पूर्वी एका पत्रकाराच्या बाबतीत घडलेला किस्सा असा कि त्याची बायको एका दुसर्या पुरुषाच्या प्रेमात होती, त्या दोघातला प्रेमविलाप या पत्रकाराने एक दिवस रेड हॅन्ड पकडल्यानंतर त्याने तिला तिच्या प्रियकरापासून मोठ्या युक्तीने कायमचे दूर केले खरे पण काही केल्या या पत्रकाराचा संशय कधीही कमी झाला नाही एवढा कि त्याची पत्नी तिच्या सख्य्या भावाशी जरी बोलायला गेली तरी हा तिच्याकडे संशयाने बघायचा, शरद पवार यांचे विशेषतः या दिवसात त्या अजितदादा आणि धनंजय मुंडे या दोघांच्या बाबतीत तेच होते आहे म्हणजे हे दोघे एक दोन दिवस जरी नजरेआड झाले तरी पवार काहीसे सैरभैर होतात, त्यांची चिडचिड होते ते मनापासून मनातून अस्वस्थ होऊन हे दोघे नेमके कुठे आहेत त्यावर विश्वासू माणसांना त्या दोघांना शोधण्यासाठी त्यांच्या मागावर सोडतात आणि नेमक्या पवारांच्या याच अती संशयी स्वभावाचा आणि साशंक नजरेचा धनंजय आणि अजित दादा या दोघांनाही म्हणाल तर त्रास होतो म्हणाल तर सासुरवास होतो पण अजितदादा यांना राष्ट्रवादी शिवाय पर्याय नसल्याने त्यांना तेथेच नांदण्याशिवाय पर्याय आणि उपाय नाही पण एकाचवेळी शरद पवार आणि अजित पवार या दोघांपासून काहीसे दुरावलेले आणि त्याचवेळी पूर्वीची प्रेयसी भाजपाच्या आकंठ प्रेमात पुन्हा बुडालेले आणि फडणवीसांच्या बाहुपाशात येण्यास उत्सुक व इच्छुक असलेले धनंजय नेमके व नक्की भाजपामध्ये येतील आणि तेथेच भराभर पटापट सत्तेच्या राजकारणात मोठे होतील…
अलीकडे भाजपचे या राज्यातले सर्वाधिक प्रभावी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस लागोपाठ सतत दोनवेळा बीड जिल्ह्यात तेही पंकजा आणि प्रीतम यांच्याशी अतिशय जवळचा संबंध येतो अशा कार्यक्रमांना त्यांनी हजेरी दिली असतांना पंकजा आणि प्रीतम या दोघींची त्या कार्यक्रमांना अनुपस्थिती वरून जवळच्या कार्यकर्त्यांना व जिल्ह्यातील पाठीराख्या नेत्यांना फडणवीसांच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याच्या अगदी उघड सूचना त्यावरून त्या दोघी भाजपाला सोडून अलीकडे ज्यांच्याशी राजकीय घरोबा वाढविण्याच्या त्यांच्या हालचाली, शंभर टक्के बातमी खरी ठरणार आहे कि मुंडे भगिनी भाजपा सोडल्यानंतर नेमक्या उद्धव यांच्या शिवसेनेत जातील तसेही प्रीतम यांना का कोण जाणे पण एकनाथ शिंदे यांची त्यांच्यावर तीव्र नाराजी असल्याने त्या दोघी फक्त आणि फक्त उद्धव यांच्या शिवसेनेत प्रवेश करून मोकळ्या होतील, त्यांना एकनाथ शिंदे नक्की जवळ करणार नाहीत, माझे पुढील वाक्य लिहून ठेवा कि भावाबहिणीनी पक्षांतर केल्यानंतर बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे यांचा गोपीनाथ मुंडे होईल म्हणजे ते अधिक प्रभावी ठरतील तर पंकजा आणि प्रीतम यांचा एकनाथ खडसे होण्याची नेमकी, दाट, अधिक शक्यता आहे, घाई व दादागिरी करून पंकजा मोठी राजकीय चूक करताहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी