सभापती : राम राजे निंबाळकर कि नीलमताई गोऱ्हे
विधान सभा भाजपाच्या ताब्यात आहे तेथे माजी विधान परिषद सभापती राम राजे निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत, विधान परिषद सभापतपद खाली आहे,विधान परिषदेच्या सभापतीचा कार्यभार उपसभापती उद्धव सेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे यांच्याकडे असला तरी त्यांचा पूर्णवेळ सभापती पदावर डोळा असल्याने यादिवसात त्या नक्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत कारण परिषदेला राष्ट्रवादीची सदस्य संख्या सर्वाधिक असली तरी पुढ्ल्या केवळ काहीच दिवसात भाजपा शिंदे युती संख्या बळात नक्की निश्चित राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव सेना यांच्यापुढे निघून जाईल त्यामुळेच विधान परिषद सभापती पदासाठी उत्सुक व इच्छुक असलेले दोन उमेदवार या दिवसात त्यातले एक देवेंद्र फडणवीस यांच्याशी तर दुसरे एकनाथ शिंदे यांच्याशी संधान संपर्क साधून आहेत हे शंभर टक्के खरे आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि जावई राहुल नार्वेकर या दोघातली गहिरी मैत्री त्या मैत्रीचा नेमका फायदा उचलून एका बेसावध क्षणी शरद पवार यांचा डोळा चुकवून आणि अजित पवारांना चकवा देऊन राम राजे निंबाळकर भाजपा मध्ये प्रवेश करून मोकळे होतील अर्थात तत्पूर्वी ते सभापती पदाचे अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांकडून शब्द घेतील त्यानंतरच ते भाजपा मध्ये प्रवेश घरून मोकळे होतील…
www.vikrantjoshi.com
खरी स्पर्धा याच राम राजे निंबाळकर यांना नेमकी डॉ नीलम गोऱ्हे यांचीच आहे कारण निलमताई गोऱ्हे देखील विधान परिषदेच्या सभापती होण्यास तेवढ्याच इच्छुक आणि उत्सुक आहेत, म्हणूनच त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून नेमके सभापती पद पदरात पडून घ्यायचे आहे. आजच्या तारखेला राम राजे निंबाळकर आणि डॉ नीलम गोऱ्हे हे दोघेही भाजपा शिंदे गटात नाहीत पण कोणत्याही क्षणी दोघेही त्यांचा राजकीय पक्ष सोडून म्हणजे निंबाळकर पवारांना टाटा करून तर निलमताई रश्मी ठाकरे यांना फ्लायिंग किस देऊन दोघेही पक्षांतर करून मोकळे होतील. सभापती पदाच्या बाबतीत निंबाळकर आणि निलमताई या दोघांतही तुल्यबळ तंगडी स्पर्धा आहे, दोघेही त्यांच्या जागी ताकदवान उमेदवार असले तरी विधान परिषदेचे बऱ्यापैकी पावित्र्य राखण्यासाठी निंबाळकर नकोत, नीलम गोऱ्हे अधिक उत्तम आणि संस्कारित सभापती म्हणून नक्की हे राज्य त्यांच्याकडे बघून मोकळे होईल. राम राजे निंबाळकर आणि जावाई राहुल नार्वेकर या दोघांच्या हातात अख्खे विधान भवन येणे,नक्की योग्य नाही, चुकीचे घडेल, गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून विधान भवनाचे जे पावित्र्य अपवित्र झाले आहे हे असेच पुढे घडले किंवा चुकीच्या नेत्यांच्या आणि अनंत कळसे सारख्या बदमाश अधिकाऱ्यांच्या हाती जर हे विधान भवन आले तर नेमक्या चांगल्या विषयांवर न्याय मिळवून देणे उत्तम आमदारांना शक्य होणार नाही…
मला आत्ता या क्षणी त्या विधान भवनात सतत घडणाऱ्या भानगडी वाटाघाटी व्यवहार लबाडी अगदी सखोल माहित असल्यात तरी सध्या तरी त्यावर येथे मला काही लिहायचे नाही फक्त एवढेच सांगतो किविधान भवन परिसरातले वातावरण चांगले नाही भ्रष्ट आहे पूर्णतः बिघडलेले आहे. सुषमा अंधारे आल्या आणि तसेही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेनेतले अनेक कित्येक आक्रमक नेते अलगद बाजूला काढल्याचे स्पष्ट चित्र निर्मण झालेले आहे विशेष म्हणजे डॉ नीलम गोऱ्हे आणि रश्मी उद्धव ठाकरे या दोघींमध्ये पूर्वीचे ते प्रेम किंवा जिव्हाळा उरला नाही राहिलेला नाही नक्की त्या दोघीत मोठा दुरावा निर्माण झाला असल्याने आणि शिंदे यांच्या माध्यमातून त्यांना परिषदेवर मोठी संधी चालून येत असल्याने निलमताई उद्धव सेनेतून बाहेर पडून शिंदे सेनेत सामील होतील हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे, नीलम गोऱ्हे आणि राम राजे निंबाळकर दोघेही पक्षांतर करून मोकळे होतील हे नक्की आहे फक्त सभापती पद नेमके कोणाच्या वाट्याला येते तेवढे बघणे आपल्या हातात आहे….