सांग सांग भोलानाथ पवारांचा दादा होईल का ?
आपल्या या महाराष्ट्रात राष्ट्रावर महाराष्ट्रवर वरच्या हुद्द्यावर काम करणारी माणसे नसणे किंवा कमी आहेत कमी असणे हि अत्यंत दुर्दैवी घटना आहे म्हणजे ज्यांच्या घरातले तरुण सरकारी नोकरीत रुजू होतात किंवा राजकारणात उतरून आमदार किंवा नामदार होतात किंवा अमुक एखाद्या पदावर काम करायला लागतात किंवा कुठल्याही व्यवसायात उतरतात त्यातल्या बहुतेक प्रत्येकाची किंवा त्यांच्या घरातल्यांची एकमेव इच्छा हीच असते कि या कमावत्या तरुणाने राष्ट्राला राज्याला लोकांना लुबाडून लुटून यापुढे मोकळे व्हावे आणि राष्ट्राला कंगाल भंगार अवस्थेत आणून कुटुंब किंवा घर तेवढे श्रीमंत करून सोडायचे,सोडावे. माझा मुलगा किंवा माझे अपत्य हे यापुढे राष्ट्राचे भले करून सोडेल अशी इच्छा एकही कुटुंबात व्यक्त होत नाही तेथेच राज्य रसातळाला आले किंवा घराघरातून राष्ट्रप्रेमाची भावना जेव्हा संपली तेव्हाच महाराष्ट्राचे उज्वल भवितव्य व भविष्य अंधारले हीच वस्तुस्थिती आहे. आजपर्यंतच्या बुजुर्ग नेत्यांनी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी राष्रप्रेमाची किंवा राष्ट्रसेवेची भावना सामान्य माणसात न रुजवल्याने राज्यातला भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार बघता बघता मोठा वाढीस लागला, आशेच किरण दूरदूरपर्यंत क्वचित दिसतो तेव्हा आशा पल्लवित होतात पण अशी अधिकारावरील माणसे अलीकडे खचित जन्माला येत असल्याने दुर्दैवाने दुष्टांवर मात करून किंवा चाल करून आपल्याला पुढे पुढे जायचे आहे हे कायम यानंतर लक्षात ठेवले पाहिजे. मला आठवते 1980 ते 2010 असा हा तब्बल जवळपास तीस वर्षांचा राजकीय कालावधी जळगावच्या सुरेशदादा जैन यांच्यासाठी सुवर्णकाळ होता, खऱ्या अर्थाने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील हा दादा माणूस कधीही राजकारणातून त्याचा अस्त किंवा अत्यंत वाईट राजकीय अंत होईल कधीही कोणालाही वाटले नव्हते पण मी तेव्हाही त्यांच्यावर लिहितांना, सुरेशदादा यांनी जळगाव जिल्ह्यतले विशेषतः शहरातले गुंड प्रवृत्तीचे आणि फारसे देशप्रेम नसलेले नेते, मुसलमान नेते मोठे करू नयेत त्यातल्या त्यात चांगले नेते आणि उत्तम अधिकारी निवडून जळगाव जिल्ह्याचे राजकारण खेळावे करावे असे मी आधी त्यांना आणि नंतर पुढे आलेल्या एकनाथ खडसे यांना अगदी मनापासून सांगत असे पण सत्तेतून आलेल्या मस्तीच्या नादात त्या दोघांचे माझ्या सांगण्याकडे लक्ष जाणे अशक्य होते शेवटी तेच घडले सुरेशदादा आधी तुरुंगात सडले नंतर जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणातून कायमचे संपले, त्यांचा एकेकाळचा थेट मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी झाला. सत्तेतून आलेला मद मस्ती गर्व मोठ्या नेत्याला कसा नोव्हेअर करतो याचा आंखो देखा हाल जळगाव जिल्ह्यातल्या काही सुजाण नागरिकांनी चौधरी जैन खडसे स्वरूपात चांगलाच अनुभवला आहे…
सुरेशदादा जैन यांच्या पाठोपाठ जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर खऱ्या अर्थाने पकड घेतली ती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र खडसे देखील सुरेशदादा जैन पद्धतीचे राजकारण खेळू करू लागले किंबहुना पैसे मिळविण्याचा खडसे यांचा घाणेरडा नाद तर सुरेशदादा जैन यांना देखील मागे टाकणारा ठरला, सुरेशदादा दानधर्मी असल्याने जळगाव जिल्ह्यातली दादांची इमेज हि एखाद्या हिंदी सिनेमातील डाकूसारखी होती म्हणजे हिंदी सिनेमातला डाकू जसा अख्खा टापू लुटून आल्यानंतर लुटलेल्या पैसे संपत्तीतून ज्या गावात तो दानधर्म करतो तेथला मसीहा म्हणून तो ओळखल्या जातो, सुरेशदादा हे मोठे दानधर्मी वृत्तीचे असल्याने त्यांच्या पडद्याआड चाललेल्या भ्रष्टाचाराकडे स्थानिक जनतेने अजिबात कधीही लक्ष दिले नाही पण खडसे हे म्हणजे सुरेशदादा जैन नव्हेत त्यामुळे एकनाथ खडसे एकटाच आणि आपल्याच कुटुंबाला नातेवाईकांना आणि काही जवळच्या चेल्या चपाट्यांना आर्थिक दृष्ट्या मोठा करतोय हे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या झपाट्याने लक्षात आल्याने त्यांनी मग एकनाथ खडसे यांचे जिल्ह्यातील परमोच्च स्थान बघता बघता डळमळीत करून सोडले त्याऐवजी गिरीश महाजन गुलाबराव पाटील चिमणराव पाटील चंद्रकांत सोनावणे चंद्रकांत पाटील शिरीष चौधरी संजय सावकारे इत्यादी अनेक नेत्यांना साथ दिली त्यांना मोठे केले आणि एकनाथ खडसे यांना बऱ्यापैकी मागे खेचले विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांचे केवळ आजवर नशीब बलवत्तर आहे म्हणून अद्याप त्यांचा सुरेशदादा जैन झालेला नाही म्हणजे अजून तरी त्यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आलेली नाही, पण खडसे यांच्या संपत्तीवर म्हणजे केलेल्या काळ्या कमाईवर टाच येणारच नाही त्यातून ते तुरुंगात जाणारच नाहीत असे आज तरी नक्की सांगता येणार नाही, शरद पवार यांच्यावर लिहिण्याआधी मला जळगाव जिल्ह्यातील सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे या दोघांच्या राजकीय कार्यशैलीची येथे यासाठी माहिती देणे आवश्यक वाटले कारण राज्याचे राजकारण गेली कित्येक वर्षे यशस्वीरीत्या सांभाळून सत्तेत रमणार्या शरद पवार यांच्या राजकारणाची पद्धत या दोघांपेक्षा अजिबात वेगळी नाही, खडसे आणि जैन यांच्या या पद्धतीने केवळ जळगाव जिल्ह्यात जातीचे आणि भ्रष्टाचाराचे मोठे लोण पसरले पण शरद पवार यांच्या या सेम वागण्याने अख्ख्या राज्यात मुस्लिमांचे विशेषतः अनेक पाक विचारांच्या मुसलमानांचे आणि जातीयवादाचे तसेच भ्रष्टाचाराचे मोठे लोण पसरल्याने अख्खा महाराष्ट्र गढूळ भ्रष्ट जातीयवादी घडला आहे घडतो आहे, पवारांच्या या बेलगाम वागण्याला विशेषतः देवेंद्र फडणवीस मोठ्या हिम्मतीने आणि ताकदीने पवारांना जाऊन भिडले म्हणून मी प्राण तळहातावर घेऊन फडणवीस विचारांच्या अधिकाऱ्यांना मीडियाला आणि नेत्यांना मनापासून साथ दिली, चिंता केली नाही…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी