शिवसेनेत सेनापती वर्सेस शिवसैनिक…
आमच्या लहानपणी भावंडांमध्ये मी मोठा असल्याने माझी घरात बऱ्यापैकी दादागिरी खपवून घेतल्या जायची. त्याकाळी आम्ही स्तब्ध पुतळा नावाचा खेळ खेळत असू. माझा चेहरा हा असाच माझ्या लहानपणापासून सुतकी आणि रडका त्यामुळे मी इतरांना कितीही हसविण्याचा प्रयत्न केला तरी मला कधी फारसे यश मिळत नसे शेवटी मी माझ्या दादागिरीवर उतरून सांगत असे कि माझ्या हावभावांवर म्हणजे तोंड वेडे वाकडे करण्यावर तुम्हाला हसावेच लागणार आहे त्यामुळे ज्या भावंडासमोर मी उभा त्याला हसण्यावाचून गत्यंतर नसायचे, माझ्यात आणि आजच्या श्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काडीचा देखील फरक नाही म्हणजे फडणवीस मग तो विरोधातला असो कि सेनेतला किंवा त्यांच्या भाजपामधला, ज्यांच्यासमोर जाऊन उभे राहतात प्रसंगी ते शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे किंवा अजित पवार किंवा हिरमुसल्या चेहऱ्याचे जयंत पाटील किंवा कोणताही हावभाव चेहऱ्यावर अजिबात न आणणारे छगन भुजबळ ज्याला त्याला, त्यांना या कठीण दिवसात हसून दाद द्यावीच लागते, यात फडणवीसांच्या दादागिरीचा संबंध नाही तर त्यांनी व्यक्तिगत जे संबंध प्रत्येकाशी जपले वाढविले जोपासले आहेत त्याचे ते मला वाटते सकारात्मक परिणाम आहेत, म्हणूनच ज्याक्षणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री या पदासाठी स्वतःऐवजी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले त्यादिवशी भाजपा आणि अन्य विविध विचारांच्या राज्यातल्या कुटुंबातल्या चुली त्यादिवशी म्हणे पेटल्या नाहीत, इतकी प्रचंड लोकप्रियता त्यांनी राज्यातल्या घरोघरी कमावली मिळवली प्राप्त केलेली आहे. फडणवीसांसारखा सेनापती तयार करायला घडायला तयार व्हायला अनेक वर्षे जेव्हा एखाद्या किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची तपश्चर्या एखाद्या कार्यकर्त्यांकडून नक्कीकरवून घेतली जाते तेव्हा देवेंद्र फडणवीस आनंद दिघे गोपीनाथ मुंडे पद्धतीचे लोकमान्य लोकप्रिय नेतृत्व तयार होत असते, नेमकी याचीच फार मोठी चिंता नागपुरातल्या संघ मुख्य कार्यालयाला यादिवसात भेडसावते आहे त्यावर त्यांचे मोठे चिंतन सुरु आहे किंवा त्यापद्धतीने दिल्लीतल्या भाजपा वरिष्ठांशी त्यांची बोलणी सुरु आहेत कारण महाराष्ट्राच्या बाबतीत हे दुसऱ्यांदा घडले आहे, ज्या नितीन गडकरी यांना संघ परिवाराने देश नेतृत्व करण्या घडविले वाढविले मोठे केले ज्यात स्वतः गडकरी यांची मोठी मेहनत फार मोठे श्रम नक्की पणाला लागलेले होते, आज दुसऱ्यांदा संघावर तेच संकट ज्यांनी आधी आणले त्यांनीच पुन्हा आणून ठेवले, देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटून भाजपातले डेंजर नेतृत्व मोकळे झाले…
आता तुम्हाला शिवसेनेच्या आतल्या गोटातली माहिती सांगतो तत्पूर्वी सिंहाच्या ओठांची पप्पी घ्यायची हिम्मत करावी कोणी किंवा वाघाच्या डोळ्यात कचरा गेल्यानंतर फुंकर मारावी कोणी किंवा अजित पवारांना वाकुल्या दाखवाव्यात कोणी किंवा अस्वलाच्या ढुंगणाला जखम झाल्या नंतर त्यावर मलम चोळावा कोणी पद्धतीचा प्रश्न मला याक्षणी नेमका पडला आहे म्हणजे त्या उद्धव ठाकरे यांना चार पावले तातडीने मागे या आणि स्वतःला व पिताश्री बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या शिवसेनेला वाचवा हे त्या उद्धव यांच्या कानात जाऊन सांगावे कोणी कारण उद्धव ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि तहान लागल्यावर विहीर खोदायला निघालेल्या उद्धव ठाकरे यांना जिद्दीने पेटून पायावर कुर्हाड मारून घेऊ नका हे नेमके सांगावे कोणी, राज्यातला शिवसैनिक नक्की मातोश्रीला मानणारा किंबहुना बाळासाहेबांच्या आठवणीत भावनिक होणारा आहे किंवा असतो पण मातोश्री हि जरी त्यांच्या राजाच्या भूमिकेत असली तरी हे सैनिक त्याआधी स्थानिक सेनापतींना देखिल तेवढेच मनापासून मनातून मानणारे असतात हे उद्धव यांनी आधी लक्षात घेण्याची मोठी गरज आहे आणि शिवसैनिकांचे तब्बल चाळीस सेनापती उद्धव यांना सोडून गेले असल्याने त्यांच्यासारखे सेनापती थकलेल्या दमलेल्या त्रासलेल्या आजारी असलेल्या उद्धव ठाकरे यांना पुन्हा तयार करायला किमान दहा वर्षे नक्की लागणार आहेत त्यापेक्षा जे सोडून गेले त्यांनाच पुन्हा परत बोलवा, मी शेवटपर्यंत त्या बाळासाहेबांसारखा राजाच्या भूमिकेत राहील पुन्हा मंत्रालयातील प्रधान होण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही हे सोडून गेलेल्यांना किंवा सोडून जात असलेल्यांना अगदी ओरडून सांगा, पुन्हा पूर्वीची शिवसेना क्षणार्धात एका क्षणात उभी राहिली नाही तर मी हेमंत जोशी नाव लावणार नाही वाटल्यास मी देशद्रोही नवाब मलिक यांचा पट्ट शिष्य आहे सांगत सुटेन. ज्या अवस्थेत आज कोल्हापूर जिल्ह्यातली शिवसेना आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले शिवसेनेचे पाचही माजी आमदार जसे एकनाथ शिंदे यांच्या गळाला जसे केव्हाच लागले आहेत तेच चित्र राज्यात इतरही प्रत्येक जिल्ह्यात आज नक्की निर्माण झाले आहे म्हणजे जसे आमदार, उद्धव यांच्यापासून दूर झाले त्यांच्या पाठोपाठ सेनेचे माजी आमदार किंवा विद्यमान खासदार किंवा माजी खासदार किंवा अनेक मान्यवर मोठे पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील होण्याच्या मोठ्या तयारीत आहेत, अजिबात उद्धव यांना येथे मी अंडरएस्टीमेट करीत नाही कि त्यांच्यासंगे सामान्य शिवसैनिक नाहीत पण त्यांच्यातून नवी कोरी लीड्सरशिप तयार करण्यात वेळ घालवून आणखी मोठ्या अडचणींना किंवा संकटांना सामना करत बसण्यापेक्षा उद्धव यांनीच चार पावले मागे येऊन शिंदे यांच्या खांद्यावर हळूच प्रेमाने हात ठेवणे केव्हाही अधिक चांगले. अनैसर्गिक सेक्स पद्धतीची उद्धवजी तुमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी होती, ज्याचे फार मोठे वाईट परिणाम याक्षणी तुम्ही भोगता आहात कारण भाजपा आणि सेना हीच युती राज्यातल्या प्रत्येक हिंदू मतदाराला मनापासून मान्य आहे, अजूनही नक्की वेळ गेली नाही, यशस्वी माघार घ्या….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी