आजचे शिंदे उद्याचे दिघे …
ज्यांचा प्रेमभंग होतो त्यात एकतर प्रियकराला प्रेयसी नकोशी होते किंवा प्रेयसीच्या मनातून प्रियकर उतरलेला असतो किंवा दोघेही एकमेकांना कंटाळलेले असतात एकमेकांपासून आधी दुरावतात नंतर वेगळे होतात, लग्नानंतर देखील फारसे वेगळे नसते, बहुतेक जोडपी विशेषतः पुरुष कामवासना भागली कि पुढल्या क्षणी एकमेकांकडे पाठ करून घोरायलाही लागतात कारण बहुतेक जोडप्यांमधले प्रेम केव्हाच आटलेले संपलेले असते उरलेली असते ती केवळ कामवासना. येथे राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम या दोन्ही अत्यंत महत्वाच्या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या दोघात एकमेकांचे आधी एकमेकांवर खूप जीवापाड अपार अतूट अफाट प्रेम होते पण गेल्या दोन वर्षांपासून उद्धव हे एकनाथ यांना कंटाळले त्यांच्यावर नाराज झालेत कि एकनाथ त्या उद्धव यांना विटले कंटाळले कि दोघेही एकमेकांच्या मनात मनापासून उतरले याचे उत्तर निदान आज अनेकांना शोधून देखील सापडणार नाही पण त्या दोघात नेमके काय घडले किंवा कोण कोणावर नक्की नेमके रुसले फुगले आहे हे मी तुम्हाला येथे सांगणार आहे आणि नेमके तेच सत्य असणार आहे…
कोणत्याही राजकीय पक्षात, राजकारणात, मेरी साडी तुम्हारे साडीसे ज्यादा सफेद कैसी, हा सवाल हा प्रश्न जेव्हा एखाद्या टॉपच्या नेत्याला त्याच्या हाताखाली, त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्या काम करणाऱ्या एखाद्या अन्य नेत्यांविषयी निर्माण होतो त्यानंतर कोणत्याही पक्षातला दादा नेता या अशा त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्याला किंवा कडेवर बसून कानात मुतू पाहणाऱ्या नेत्याच्या कमरेखालच्या पार्शवभागावर फटाके लावायला सुरुवात करतो. उद्धव यांचा राजकीय इतिहास चाळला बघितला अभ्यासला तर तुमच्या अगदी सुरुवातीपासून हेच लक्षात येईल कि शिवसेनेत आजपर्यंत म्हणजे छगन भुजबळ गणेश नाईक राज ठाकरे नारायण राणे ते आनंद दिघे असे अनेक असंख्य बहुसंख्य नेते जे उद्धव यांना डोईजोड ठरणारे होते त्यांच्यापेक्षा वरचढ किंवा प्रभावी होते त्यातल्या प्रत्येकाला उद्धव यांनी अगदी बाळासाहेब हयात असतांना आणि आज बाळासाहेब ठाकरे हयात नसतांना देखील तेही शक्तीने नव्हे तर युक्तीने आधी खड्यासारखे बाजूला केले नंतर पक्षातून या अशा नेत्यांना बाहेर पडण्या मजबूर केले आणि ज्यांना आपल्या राजकीय पक्षात कायम वरचष्मा ठेवायचा असतो, स्वतःचे अस्तित्व आणि वर्चस्व कायम टिकवायचे ठेवायचे असते ते सारेच उद्धव पद्धतीनेच वागत आलेले आहेत मग त्या इंदिरा गांधी असतील किंवा शरद पवार असतील, पवार उद्या भलेही राष्ट्रवादीचे मोठे नुकसान करवून घेतील पण रोहित किंवा अजित पवारांनी त्यांच्या पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला तर पवार देखील अजित किंवा रोहित यांचा उद्धव पद्धतीने राज ठाकरे करून मोकळे होतील…
उद्धव ठाकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांना नक्की खूप जवळ केले होते जवळ घेतले होते पण तेच घडले म्हणजे ठाण्यात एकेकाळी जसे मातोश्रीचे महत्व कमी पण दिवंगत आनंद दिघे यांचे महत्व वाढायला जशी सुरुवात झाल्यानंतर विशेषतः मातोश्रीवरून आनंद दिघे यांचे पंख कापायला सुरुवात करून अन्य अनंत तरे गणेश नाईक शाबीर शेख इत्यादी शिवसेना नेत्यांचे महत्व वाढवायला सुरुवात केल्या गेली होती नेमके हुबेहूब ते तसेच अलीकडे उद्धव यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे कायमस्वरूपी पंख कापायला त्यांचे महत्व कमी करायला झपाट्याने सुरुवात केल्या गेलेली आहे मात्र एकनाथ यांच्या तोडीचा नेता अख्य्या ठाणे जिल्ह्यात उद्धव यांना अद्याप न गवसल्याने एकनाथ यांना अद्याप बाजूला केल्या गेलेले नाही पण तयारी जय्यत सुरु आहे या एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यातील वर्चस्व आणि राज्याच्या शिवसेनेतील महत्व कमी करण्यासाठी. उद्धव हे एकनाथ यांना कंटाळले म्हटल्यापेक्षा एकनाथ यांच्या वाढलेल्या नेतृत्वाला धास्तावले असल्याने ते त्यांना सतत अलीकडे हिडीस फिडीस करतांना अनेकांच्या ते लक्षात येते आहे, उद्धव हे अशी वागणूक देत असल्याने एकनाथ देखील हल्ली हल्ली आपली नाराजी अगदी जाहीर बोलून दाखवू लागलेले आहेत, त्यातून स्फोट घडावा, दोघात घटस्फोट व्हावा हि उद्धव यांचीच तीव्र इच्छा असल्याने आता त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून निगेटिव्ह रिस्पॉन्स नक्की हवा आहे, प्रसंगी काही काळ ठाणे जिल्ह्यातली शिवसेना मागे पडली सेनेची पीछेहाट जरी झाली तरी याआधी जसे उद्धव प्रभावी नेत्यांना सेनेतून कायम बाहेर काढतांना बेफिकीर असायचे नेमके हे असेच नजीकच्या काळात शिंदे यांच्या बाबत उद्धव यांनी भूमिका घेतली तर निदान मला किंवा जे उद्धव यांना अगदी जवळून ओळखतात त्यांना अशांना अजिबात आश्चर्य वाटणार नाही…
अपूर्ण : हेमंत जोशी