एक फडणवीस अनेक कासावीस…
भगवान कृष्ण नेमके तेथेही उध्दवालाच सांगतात कि डोळ्यांनी नीट पाहून खात्री करून घेऊन पुढले प्रत्येक पाऊल टाकावे, वाणी शुद्ध ठेवावी आणि सत्य तेवढेच सांगावे बोलावे. मनात कायम लोकोपयोगी हेतू ठेवून आचरण शुद्ध ठेवावे. मित्रांनो येथेही नेमके उद्धव हेच नाव आणि कृष्णाच्या भूमिकेत थेट देवेंद्र फडणवीस जणू आधुनिक सत्ता रुपी अर्जुनाचे स्वारथ्य करणारे बुद्धिमान चाणाक्ष हुशार सावध आणि विविध वाईट अनुभवातून आजचा अनुभवसंपन्न नेता व राजकारणी अर्थात देवेंद्र. पुन्हा तेच एकवार सांगतो कि आम्ही लढाऊ राष्ट्रप्रेमी महाराष्ट्रप्रेमी पत्रकार आहोत, त्यामुळे आम्हाला ना कोणती जात महत्वाची ना कुठला राजकीय पक्ष महत्वाचा त्यामुळे जे चुकतात त्यांना हाणायलाच पाहिजे आणि ज्यांची कामगिरी दमदार मग ते कोणत्याही विचारांचे जातीचे धर्माचे असलेत तरी त्यांचे आमच्याकडे मनापासून कौतुक केल्या जाते. येथे मला त्या अब्दुल सत्तार यांचे कौतुक यासाठी करायचे आहे कि 8 जूनला औरंगाबादला जी उद्धव ठाकरे यांची महासभा झाली अति प्रचंड गर्दी गाजली त्याचे श्रेय ना चंद्रकांत खैरे यांना ना पालकमंत्री सुभाष देसाई यांना ना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांना, गर्दी जमविण्याचे फार मोठे श्रेय जाते ते फक्त आणि फक्त अब्दुल सत्तार यांना, खोटे वाटत असल्यास सभेचे झालेले चित्रीकरण बघा, तुमच्या ते एका झटक्यात लक्षात येईल कि या सभेला जशी हिंदूंपेक्षा मराठी लोकांनी गर्दी केलेली होती त्यापेक्षा कितीततरी अधिक पटीने या सभेला मुसलमानांनी गर्दी केली होती, आणि या अशा गर्दीतून शिवसेनेचा विशेषतः उद्धव यांचा कोणताही राजकीय फायदा यासाठी अजिबात होणार नाही कारण उद्धव यांना हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रत्येक वाक्यातून भर द्यावा लागला जे त्या ठिकाणी गर्दी करणाऱ्या कोणत्याही मुस्लिम मतदाराला मुस्लिम व्यक्तीला अजिबात रुचणारे नव्हते आणि उद्धव यांच्या औरंगाबादच्या आणि त्याआधीच्या सभेत देखील नेमके हेच घडल्याने औरंगाबाद मधल्या सभेच्या गर्दीचा नेमका फायदा फारतर अब्दुल सत्तार यांना होईल पण मुंबई आणि औरंगाबाद मध्ये जी मुस्लिमांनी मोठी गर्दी त्या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी एकाचवेळी हिंदुत्वावर भर दिल्याने मुसलमानांना दुखावले डिवचले आणि उद्धव यांच्या सभेला मुसलमानांच्या शेजारी बसून सभा ऐकावी लागते त्यामुळे मराठी माणसे देखील त्यांच्या पासून नक्की कोसो दूर गेले, थोडक्यात आपण जे सतत एकमेकांना सांगतो तेच नेमके घडले किंवा घडणार आहे कि सभेला गर्दी जमली म्हणजे सभा जिंकली येणाऱ्या निवडणुका जिंकल्या असे होत नाही असे होत नसते…
मित्रांनो, दहा जूनला पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुका आणि निकालांबाबत अनेक ऑफ द रेकॉर्ड कारनामे मला माहित आहेत, यथावकाश एक एक पेटारा नक्की हळू हळू तुमच्यासमोर याचठिकाणी मी उघडत जाईन पण अत्यंत महत्वाचे असे कि संजय राऊत यांना कोणती पुण्याई आडवी आली, माहित नाही पण त्यांचे नशीब मोठे बलवत्तर कि त्यांच्या रांगेत कोल्हापूरचा संजय पवार हा आर्थिकदृष्ट्या काहीसा कमजोर आणि राजकीय दृष्ट्या खुपसा अपरिपकव उमेदवार उद्धवजींनी लादला नसता तर संजय राऊत यांचा देखील नक्की पराभव झाला असता पण राऊत या राज्यसभा निवडणुकीत बाल बाल वाचले आहेत नेमकी हीच वस्तुस्थिती आहे. संजय राऊत यांनी कायम बोलले पाहिजे कारण बडबड्या राऊतांना बोलण्याचा अधिकार खुद्द उद्धव ठाकरे यांनीच दिला आहे पण नेमके काय बोलायचे असते आणि मुद्दाम काय टाळायचे असते हे आमच्या या मित्राच्या लक्षात एखाद्या त्यांच्या चाणाक्ष नेत्याने आणून द्यायला हवे आणि असे जर लवकर घडले नाही तर स्वतः संजय खूप अडचणीत येतील पण वरून उद्धव आणि शिवसेनेतल्या अनेक नेत्यांना मंत्र्यांना ते विनाकारण अडचणीत टाकत जातील. राज्यसभा या निवडणुकीतल्या निसटत्या विजयानंतर जर संजय राऊत यांच्या हे लक्षात येत नसेल तर आपण गीता नेमकी कोणासमोर वाचली हा प्रश्न मला नक्की पडणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाला विशेषतः धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना कुठलाही घोडे बाजार करावा लागलेला नाही हे मी माझ्याकडे असलेल्या पुराव्यातून सांगतो कारण राज्यसभा निवडणुकीला कुठे कोणी किती खर्च केला, मला नेमके माहित आहे त्यावरून सांगतो या निवडणुकीत फडणवीस यांचे चतुर नियोजन, आणि मतदारांना अतिशय विश्वासात घेऊन त्याची सुरेख मांडणी. विशेषतः अपक्षांनी केलेली विना अपेक्षा मदत मतदान आणि सहकार्य, भाजपाने हि निवडणूक एकदम स्वस्तात जिंकली, जो काय खर्च आला तो केवळ आमदारांच्या खाण्या पिण्यावर राहण्यावर झाला हेच वास्तव आहे. दहा जूनला राज्यसभेची या राज्यातली निवडणूक पार पडली पण या निवडणुकीतल्या सुरस सत्य कथा केवळ याचठिकाणी मला संपवता येणार नाही, या कथा हनिमून सारख्या लांबणार्या आहेत म्हणजे आजकालच्या कित्येक तरुण तरुणींचा मधुचंद्र जरी लग्नाआधी ते वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरा करीत असले तरी, अखेर त्यांचे ज्यांच्याशी नेमके शेवटी लग्न होते त्या जोडप्याचा जसा हनिमून खूप दिवस साजरा होतो, तसे चुरशीच्या ठरलेल्या उत्कंठा वाढविणाऱ्या या राज्यसभेच्या अनेक सुरस आणि सत्य कथा मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने नक्की सांगणार आहे…
मैत्रीची आणि प्रेमाची जाहीर कबुली मर्द माणूस कायम देत असतो म्हणून सांगतो किंवा कायम अगदी सुरुवातीपासून मी हेच साऱ्यांना अगदी उघड सांगत आलो आहे कि मी देवेंद्र फडणवीस यांच्या आकंठ प्रेमात पडलो आहे कारण अनेक अडचणी समोर असतांना सभोवताली विविध प्रश्न उभे असतांना असंख्य कटकटी त्यात पुन्हा कोरोना, सततच्या दगदगीना संकटांना आपत्तींना समस्यांना पुरून उरणारा प्रत्येकाला उरून पुरणारा असा नेता मी बघितला नाही जो नेमका एकनाथ खडसे यांच्या जसा लक्षात आला नाही तोच देवेंद्र आज या क्षणाला पंकजा मुंडे यांच्या देखील अजिबात लक्षात आला नाही, अजूनही पंकजा तुमची वेळ निघून गेलेली नाही, भलते सलते निर्णय घेऊन, विनाकारण आदळ आपट करून स्वतःच्या कुटुंबाचे राजकीय आणि आर्थिक नुकसान करवून घेऊ नका, दिल्लीतल्या भाजपा नेत्यांच्या शहा आणि मोदी यांच्या डोक्यात जाऊ नका, स्वतःचा एकनाथ खडसे करवून घेऊ नका. आपल्याला वाटत असते कि नेत्यांचे आपल्याकडे दुर्लक्ष होते, तसे तुमच्याबाबत अजिबात नाही पण मंत्री झाल्यानंतर जर केवळ आर्थिक बाबींवर आपले लक्ष राहत असेल आणि मी कायम कोणाशीही दादागिरीने उद्धट वागेल अशी मनमानी पंकजा, त्या खडसे पद्धतीने करू नका, उद्या नक्की तुमचा आहे, तुम्ही तुमचा नवरा तुमची बहीण सारे एका दमात जमिनीवर या. साऱ्यांच्या आजही तुम्हीच लाडक्या आहात कारण तुम्ही आमच्या सर्वांच्या साऱ्यांच्या प्रत्येकाच्या आवडत्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहात. स्वतःचा खडसे नव्हे तर हर्षवर्धन पाटील पद्धतीने वागा आणि वाह्यातपणा न करण्याचा हर्षवर्धन पद्धतीने निर्णय घ्या. ज्या सहकार क्षेत्रात कोणतीही अडचण आली तर ज्या फडणवीस आणि शाह यांचा अगदी नियमित हर्षवर्धन पाटील यांना थेट फोन जातो त्यांना माहित आहे जरी मला विधान परिषदेला उमेदवारी मिळाली नाही तरीही माझे नुकसान शहा फडणवीस हि जोडगळी नक्की करणार नाही, पंकजा हे असे शांत व संयमी वागणे बोलणे केव्हाही चांगले, पक्षात गोंधळ घालून आजपर्यंत कोणीही राजकारणात यशस्वी ठरलेले नाही. मित्रांनो, राज्यातली एका रात्रीत बदललेली नेमकी राजकीय परिसस्थिती येथेच एका दमात संपवून चालणारी नाही, याच राज्यसभा निवडणुकीत तेही एका बदमाश बेअक्कल नवश्रीमंत महिला आमदाराने विशेषतः भाजपाला कसे वेठीस धरून क्षणिक फायदे करवून घेतले तेही अत्यंत खळबळजनक मी तुम्हाला नक्की सांगणार आहे पण विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी