संघ ब्राम्हण हिंदुत्व वगैरे…
मी जे काही दिवस आधी सांगितले नेमके तेच त्यानंतर काही दिवसात संघ प्रमुख संघ सरसंचालक मोहन भागवत नेमके तेच थेट जाहीर म्हणाले कि यानंतर आमचे कोणतेही आंदोलन मंदिरासाठी नसेल आणि आम्हाला राष्ट्रप्रेमी मुस्लिमांविषयी वावगे नाही, जे अनेकांना अपेक्षित होते जे कित्येकांना हवे होते तेच भागवत बोलले त्यातून हेच घडणार आहे कि राष्ट्रप्रेमी मुस्लिम भारतापासून इतर पाक विचारांच्या मुसलमानांसारखा दुरावणार नाही याउलट ज्या मुस्लिमांचे भारतावर प्रेम नाही वरून ज्यांना पाकिस्थान विषयी आदर प्रेम सहानुभूती आहे त्यांचे मन:परिवर्तन करण्याचे महत्वाचे काम त्यांच्यातलेच राष्ट्रप्रेमी मुस्लिम करून नक्की मोकळे होतील. समस्त हिंदूंनी पाक विचारांच्या मुस्लिमांचे कितीही हृदय परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तरी जे सहजासहजी शक्य नाही ते कठीण असे कार्य यापुढे त्यांच्यातलेच राष्ट्रप्रेमी मुसलमान करणार असतील तर मनातून हिंदूंवर उगाचच विनाकारण चिडलेले जे असंख्य मुस्लिम आहेत त्यांचे यापुढे झपाट्याने विचार परिवर्तन नक्की घडेल. आपण याठिकाणी केवळ आपल्या या राज्याचा म्हणजे महाराष्ट्राचा विचार करू, राज्यातले गढूळ वातावरण नेमके कोणत्या मुद्द्यावर हा विचार जर आपण केला तर अगदी सहज हेच लक्षात येते कि ब्राम्हणेतर मंडळी आणि संघात न जाणाऱ्यांना घरात संघ व ब्राम्हण दोन्ही अगदी मनापासून भावतात आवडतात किंवा अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी स्वतःच्या पोळीवर सत्तेचे तूप ओढून घेण्यासाठीच विशेषतः राज्यातले अगदी कानाकोपऱ्यातले नेते केवळ बाहेर
पडल्यानंतर ब्राम्हण आणि संघाचा द्वेष करतात. हे तर असे झाले कि ठेवलेल्या सुरेख सुंदर बाईला एकांतात अगदी पत्नीपलीकडे जीवापाड प्रेम करायचे आणि चार चौघात तिला साधी ओळख देखील दाखवायची नाही किंवा अगदी अश्लील भाषेत समजावून सांगायचे झाल्यास ज्या लंपट पुरुषांना वीर्यस्खलन होईपर्यंत जी वेश्या थेट अप्सरा वाटत असते, काम भावना संपल्यानंतर हेच पुरुष तिला क्षणार्धात जसे ओळख न दाखवता एका झटक्यात बाहेर पडतात ती भावना लोकांची निदान या राज्यात संघ व ब्राह्मणांविषयी नसावी…
हे मी तुम्हाला आधीच यापूर्वी सांगितले आहे कि होय, या राज्यातल्या या देशातल्या ब्राम्हणांनीच राष्ट्रीय स्वयंसेवकाला जन्म दिला जन्माला घातले जरी त्यांनी पुढे भाजपा सत्तेत येण्यासाठी म्हणजे या देशात हिंदुत्वाचे स्थान कायम सतत टिकवण्यासाठी हेच ब्राम्हण आपणहून मोठ्या प्रमाणात बाजूला झाले आणि त्यांनी इतर ज्ञातींना पुढे केले महत्व दिले तरीही येथे ब्राम्हण आणि संघ अशी परस्पर नाळ न जोडता या देशाला या राज्याला विशेषतः संघ परिवाराची का गरज आहे हे आधी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. भलेही संघ स्थानावर जाऊ नका ब्राम्हणांना सत्तेत अजिबात वाटल्यास बसू देऊ नका पण हिंदुत्व कायम टिकवण्यासाठी हिंदूंचे नेमके संस्कार न विसरण्यासाठी आपली हिंदू व प्राचीन भारतीय संस्कृती नेमकी लक्षात ठेवण्यासाठी आणि उत्तम संस्कार पुढल्या प्रत्येक पिढीवर होण्यासाठी संघ आणि ब्राम्हण दोघांचा द्वेष न करता पण त्याच वेळी हाच संघ स्वयंसेवक किंवा हाच ब्राम्हण डोक्यावर बसणार नाही याचीही नेमकी दक्षता घेत संघ व ब्राम्हणाचे या समाजासाठी नेमके योगदान लक्षात घ्या, पुढाऱ्यांच्या व्यक्तिगत स्वत:चे स्वार्थासाठी संघ ब्राम्हण दोन्हीपासून अजिबात दूर जाऊ नका त्यांना फार जवळ करा हा प्रचार आणि प्रसार देखील मला येथे करायचा नाही पण हिंदू हिंदुस्थान आणि उच्च विचारांचा महाराष्ट्र यापुढे देखील कायम टिकण्या संघ व ब्राम्हणांचा उठसुठ द्वेष व राग करू नका त्यातून भविष्यात हिंदूंचे मराठी माणसाचे मोठे नुकसान होईल कारण हिंदुतर मराठीतर कितीतरी धर्म प्रचारक आपल्याला अतिशय युक्तीने आणि आवश्यक तेथे शक्ती व पैसा वापरून मूळ हिंदू संस्कारांपासून दूर नेण्याचा फार मोठा प्रयत्न करते आहे आणि त्यांना त्यात झपाट्याने यश मिळते आहे. तुम्हाला कदाचित हे माहित नसेल कि भारताचे सर्वात मोठे शत्रू या देशातले मुसलमान नाहीत कारण त्यातले बहुसंख्य राष्ट्रप्रेमी आहेत आणि त्यांच्या मुस्लिम बांधवांना राष्ट्रप्रेमाच्या मुख्य प्रवाहात यापुढे झपाट्याने वेगानेआणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत ज्यात नक्की यश मिळणार आहे पण जे विशेषतः संघाचा फार फार द्वेष करतात किंवा देशाच्या पूर्वेकडील राज्यात स्थानिकांना हाताशी धरून तेथे काम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांना समस्त संघ प्रचारकांना संघ भाजपा पदाधिकाऱयांना सतत सळो कि पळो करून सोडतात ते आपले कट्टर शत्रू दुसरे तिसरे कोणीही नसून मुसलमान किंवा इतर धर्मीय नसून तो देश आहे महा हरामी शेजारचा चीन. याच चिनी मंडळींनी कायम धसका घेतलेला आहे संघाचा आणि आता मोदी यांच्या भाजपाचा. संघ ब्राम्हण हा विषय मला हळू हळू विस्तृत मांडायचा आहे पण ब्राम्हण नसलेल्या मराठा समाजाच्या अवधूत मोहिते यांनी जे ब्राम्हण वर्गावर लिहून ठेवले आहे ते मी येथे तुमच्यासमोर नक्की जसेच्या तसे मांडणार आहे…
क्रमश: हेमंत जोशी