भाग दुसरा : भाजपात ब्राम्हण नेतृत्व अडगळीत…
मंगळवार 31 मे च्या लोकसत्तेतली, भाजपात ब्राम्हण अडगळीत हि उमाकांत देशपांडे यांची बातमी वाचल्यानंतर मी त्यावर पोटतिडकीने बोललो आणि लिहिले त्यावर अनेकांनी मात्र मला गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या, म्हणाले भाजपात ब्राम्हण अडगळीत असे लिहिण्याऐवजी उमाकांत देशपांडे यांचे जवळचे मित्र केशव उपाध्ये अडगळीत असे जर हेडिंग दिल्या गेले असते तर अधिक आकर्षक ठरले असते. असो, आमच्या या मीडियात कोणाचे कोणाशी कसे लागेबंध असतील सांगता येत नाही मी मात्र अतिशय निरागस मनाने लिहून मोकळा होत असतो. केशव बोले उमाकांत डोले पद्धतीची कोणाचीही पत्रकारिता नसावी. महाराष्ट्रात प्रगती ऐवजी सतत जातीवर लिहावे लागते यासारखे दुरदैव नाही. जातीच्या भितींचा नायनाट झाल्याशिवाय हे राज्य किंवा हे राष्ट्र प्रगतीपथावर झपाट्याने पोहोचणे अशक्य आहे. महत्वाचे म्हणजे ज्या बहुसंख्य ब्राम्हणांनी आपल्या घरावर आणि संसारावर तुळशी पत्र ठेवून संघ जनसंघ भाजपा जन्माला घातला वाढवला या मातीत रुजवला सत्तेत आणला जगभर नेऊन ठेवला नावारूपाला आणला संघ तसेच भाजपाचे महत्व आणि महत्वाचे कार्य जगाला देशाला राज्याला पटवून दिले त्यातून जगभर कार्यकर्ते उभे केले कार्यकर्त्यांची नेत्यांची मोठी फळी उभी करून स्वतः अलिप्त राहिले जेव्हा सत्ता आली त्यानंतर देखील त्यागाची आणि समर्पणाची भूमिका घेतली त्याच ब्राह्मणांना आता या राज्यात भाजपात जर खरोखरी अडगळीत टाकल्या जात असेल तर त्यासारखे नक्की दुसरे दुर्दैव नाही. उद्या हेच तृतीय वर्षे शिक्षित ब्राम्हण पवारांच्या राष्ट्रवादीत किंवा सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमध्ये भाजपाला कंटाळून निघून गेले तर मला आम्हाला कोणालाहि फारसे आश्चर्य वाटणार नाही, ज्या शेटजी आणि भटजींनी या देशात या राज्यात संघ आणि भाजपा उभी केली त्यातल्या शेटजींना जसे कायम फायदे मिळवून देण्यात भाजपा नेतृत्व आघाडीवर व उत्साही असते त्याच नेतृत्वाने ज्यांनी त्याग केला ज्यांनी आपले सर्वस्व संघ भाजपाला अर्पण केले त्यातल्या किमान होतकरू सेवेकरी देशसेवक त्यागी ब्राह्मणांना भाजपा नेतृत्वाने अडगळीत अजिबात टाकता कामा नये. येथे माझया यादीत याच राज्यातले तेही भाजपामधले अनेक लुटारू लुच्चे लबाड भ्रष्ट ब्राम्हण नक्की आहेत पण त्यांची संख्या मूठभर आहे जेमतेम आहे, अशांना भाजपा नेतृत्व अडगळीत टाकत असेल तर त्यावर थेट ब्राम्हणांची देखील अजिबात नाराजी असणार नाही पण या अशा भामट्या भ्रष्ट ब्राम्हण नेतृत्वाची संख्या त्या भाजपामध्ये नगण्य आहे आणि सरळमार्गी देशसेवी भाजपा कट्टर प्रेमी ब्राम्हण या राज्यातल्या भाजपामध्ये संघामध्ये गल्लोगल्ली आहेत त्यांनाही जर डावलले जात असेल तर हे भाजपाचे मोठे दुर्दैव ठरेल, असे अजिबात घडता कामा नये…
जे दातृत्व जो मोठेपणा संघ भाजपा उभा करणाऱ्या देशातील विशेषतः महाराष्ट्रातील समस्त ब्राम्हणांनी दाखवला तो मोठेपणा आता त्यांच्याच अंगलट येणार असेल म्हणजे ज्याच्या संगतीला बायको पाठवली त्यानेच मित्राची बायको पळवली असे भाजपात ब्राम्हणांबाबत अजिबात घडता कामा नये. केवळ शेटजी आणि भटजी यांच्या भरवशावर या राज्यातली देशातली भाजपा सत्तेत येणार नाही सत्ता काबीज करूच शकणार नाही, मनासारखा महाराष्ट्र घडवू शकणारं नाही हे जेव्हा संघ आणि भाजपा परिवारातील नेत्यांच्या विचारवंतांच्या लक्षात आले त्यांनी तातडीने पावले उचलली, ब्राम्हण आपणहून बाजूला झाले आणि त्यांनी लगेच आपल्या राज्यातल्या ओबीसींना आणि काही प्रमाणात मराठ्यांना वाट मोकळी करून दिली त्यांचे नेतृत्व पुढे केले ज्यातून मुंडे फुंडकर बावनकुळे शिवणकर तावडे शेलार दानवे खडसे सारखे अनेक अब्राम्हणी नेते अगदी झपाट्याने भाजपामध्ये पुढे आले महत्वाचे म्हणजे आपोआप त्यांच्यासंगे त्यांच्या जाती धर्मातले कार्यकर्ते देखील फार मोठ्या प्रमाणावर संघ विशेषतः भाजपाशी जोडल्या गेले त्यातून पहिल्यांदा 1995 साली सत्ता बदल राज्यात घडून आला पवार भानावर आले आणि काँग्रेस झपाट्याने मागे पडत गेली, ब्राम्हण म्हणजे त्यागाचे प्रतीक, त्यांनी हा मोठा बदल स्वतः सत्तेबाहेर राहून आपल्या या राज्यात घडवून आणला आणि आज इतर ताकदवान राजकीय पक्षांना मोठी टक्कर देणारा भाजपा त्यातून वेगाने पुढे आला. पण ज्या आई वडिलांनी जन्माला घातले त्यांना विसरायचे किंवा ज्या पत्नीने कठीण काळात उत्तम साथ दिली तिलाच बाजूला सारून भलतीच घरात आणायची असा चालूपणा भाजपातल्या कोणत्याही टॉपच्या नेतृत्वाने करू नये त्याचवेळी महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या ब्राम्हण नेत्यांना वाटत राहते कि आपण जन्माला घातलेल्या भाजपा मध्ये अडगळीत टाकल्या जातोय किंवा अडगळीत पडलोय त्यांनी देखील त्यांच्या नेत्यांकडे एक बोट दाखवतांना स्वतःकडे तीन बोटं आहेत तो विचार देखील करायला पाहिजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे येथे बोलायचे झाल्यास गडकरी सारख्या ताकदीच्या ब्राम्हण नेत्याकडे भाजपात का दुर्लक्ष केल्या जाते त्यात गडकरी यांनी ज्या मोठ्या चुका करून ठेवलेल्या आहेत त्याचा त्यांनी स्वतः आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी देखील विचार करायलाच हवा. गडकरींना त्यांच्या अगदी सुरुवातीच्या पासून होणाऱ्या चुका मी त्यांना स्वतःला लक्षात आणून दिल्या त्यातून गडकरींनी विचार मंथन न करता वरून कायम माझ्याविषयी मनात राग आणि आकस ठेवला. थोडक्यात संघ भाजपामध्ये विशेषतः भाजपात जन्म देणार्या ब्राम्हणांकडे दुर्लक्ष होता अजिबात कामा नये हे जसे महत्वाचे तसे ब्राम्हणांनी देखील स्वतःचा महाजन गडकरी करून घेता कामा नये. सत्ता आल्या आल्या केवळ कमाईच्या मागे लागता कामा नये, मिळवायचे असते पण जरा दमाने, ब्राम्हणांनो अति लोभ कामाचा नसतो हेही लक्षात ठेवा….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी