News Alert !!
Anil Parab & ED raids!!
ED raided premises of Anil Parab at Mumbai, Pune & Dapoli. Please solve my inquisitiveness. Is it for the first time in the history of Maharashtra that an official bungalow allotted to a Cabinet Minister is raided by any central agency? If yes, it is really shameful for the Kharmate’s and all those who have brazenly and without fear used the Minister’s bungalow for their deals. 1000 times through my blogs had told Anil Parab to stay away from Kharmate. He is trouble!. As far as the resort belonging to Parab at Dapoli goes, Parab was wrong if as per allegations of Kirit Somaiya, he did construction between April 2020 to March 2021 when the Prime Minister had announced a complete lockdown. With Anil Parab’s resort issue and money being exchanged for DCP transfers and Standing committee chairman Yashwant Jadhav being under scanner for his flats bought during lockdown and companies he owns in Dubai, Shivsena has a lot to answer when opposition is shouting on top of their voices, that there was corruption during covid. Parab should have done what Milind Narvekar did. Demolish his own resort and silence all!!
Covid fears in Mumbai.
All of a sudden when the Central agencies have become active, Guardian Minister Aslam Sheikh comes and announces that we might have to bring back certain regulations yet again if there is a surge in the Covid cases in Mumbai. Aslam bhai, is this MVA’s best diversion tactic? And if not, mind you, if you bring any kind of lockdown or curtail any businesses now, believe me, no need for President’s rule, common people will march to Mantralaya now and demand a change!
Santacruz Police Station’s PI changed !
Usually I don’t write about such small happenings. But for this particular case, I was more interested as all of a sudden a New Sr PI has been appointed (Balasaheb Ashok Tambe) at Santacruz West Police station. Interested because, a BJP leader who has given nightmares to this MVA government stays in this inspectors area. Secondly this inspector is heard to be a favourite with the boss. Has he been brought to fabricate cases against particular leader (s) of the BJP? Only time will tell if he is a real pro ‘Bhartiya’ or not.
Cabinet Without Electricity?
In Mantralaya today at noon, Cabinet Meeting was scheduled wherein CM Uddhav Thackeray was supposed to attend the same. But even luck said otherwise. All of a sudden Mantralaya faced power crises and there was no electricity since morning. Hmm…Hope Minister Nitin Raut himself has not gone in search of coal now. Imagine, BEST was never like this. They are extremely efficient. Why, How and when have they become as to what they were once upon a time, only the BMC chief and Best GM can answer.
Praful Patel again ?
NCP has declared the name of Praful Patel as its Rajya Sabha candidate. No worries, but already Prafulbhai has ‘achieved’ a lot and is a veteran. He in fact should have taken up the role of a guide or a mentor to young and NCP leaders and given them a few tips too. Patel is suave, has class and knows when to speak where. He also enjoys support and friendship with many of his rival parties too. So instead of him going to RS, it would have been better if a family member like Parth Pawar who is much more mature and brighter than most of his cousins, would have been nominated.
Vikrant Hemant Joshi.
अनिल परब आणि ईडीचे छापे!!
अनिल परब यांच्या मुंबई,पुणे आणि दापोली येथील मालमत्तांवर ईडीने छापे टाकले. अनिल परब यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावरही ईडीने छापा मारला. महाराष्ट्राच्या इतिहासात मला वाटतं की, पहिल्यांदाच एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला दिलेल्या अधिकृत सरकारी बंगल्यावर केंद्रीय तपास संस्थेने छापा टाकला असवा. हे जर खरे असेल तर खरमाटे आणि इतरांनी, ज्यांनी निर्लज्जपणे आणि न घाबरता मंत्र्यांच्या बंगल्याचा त्यांच्या सौद्यांसाठी वापर केला त्यांच्यासाठी हे लज्जास्पद आहे. यापूर्वी मी अनेकवेळा अनिल परब यांना खरमाटेपासून दूर राहण्यास सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नाही, असो… दापोली येथील परब यांच्या रिसॉर्टवरही छापा पडला. किरीट सोमय्या यांच्या आरोपानुसार, पंतप्रधानांनी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले तेव्हा एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत परब यांनी या रिसाॅर्टचे बांधकाम केले, अर्थात ते चुकीचेच आहे. अनिल परब यांच्या रिसॉर्टचा मुद्दा, डीसीपीच्या बदल्यांसाठी पैशांची देवाणघेवाण, मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लॉकडाऊन दरम्यान खरेदी केलेले फ्लॅट आणि दुबईतील त्यांच्या मालकीच्या कंपन्यांची सुरू असलेली चौकशी, यामुळे आता शिवसेना अडचणीत आली आहे. कोविड काळात भ्रष्टाचार झाला आहे. मिलिंद नार्वेकरांनी जे केले ते परब यांनी करायला हवे होते. स्वतःचे रिसॉर्ट, स्वतचे जमिनदोस्त करायला हवे होते. मग सर्व शांत झाले असते.
कोविड आणि मुंबई !
आज अचानक जेव्हा केंद्रीय तपास संस्था सक्रिय झाल्या, तेव्हा पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्यास आम्हाला काही निर्बंध पुन्हा लादावे लागतील, अशी घोषणा केली. अस्लम शेख यांची ही घोषणा संशयास्पद वाटली. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी तर ही घोषणा नाही ना, असा संशय आला. पण निर्बंधाची खरंच गरज आहे का, लोकांचा रोजगार आता कुठे सुरू झाला आहे. हे अति झाले तर लोक मंत्रालयावर मोर्चा काढण्यासही कमी करणार नाहीत
सांताक्रूझ पोलीस स्टेशन!
अजून एक महत्वपूर्ण घटना घडली. गुरुवारी सांताक्रूझ पश्चिम पोलीस ठाण्यात नवीन वरिष्ठ पोलीस निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेब तांबे असे त्यांचे नाव.ही घटना यासाठी महत्त्वाची की, सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भाजपाचा नेता राहतो. त्याने मविआ सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. दुसरं म्हणजे हा इन्स्पेक्टर साहेबांचा आवडता असल्याचं ऐकायला मिळतं. त्याला भाजपच्या त्या नेत्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात करण्यासाठी आणले आहे का? असो, तांबे खरा ‘भारतीय’ समर्थक आहे की नाही हे येणारा काळच सांगेल.
कॅबिनेट आणि बत्ती गुल!
तिसरी महत्त्वपूर्ण घटना, मंत्रालयात गुरुवारी दुपारी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. पण वेगळंच घडलं. अचानक मंत्रालयाची वीज गेली. ऊर्जामंत्री नितीन राऊत स्वतः कोळशाच्या शोधात गेले नाहीत एवढेच आपल्याला बघायला उरलं आहे. वीज का गेली हे मुंबई महानगरपालिका प्रमुख आणि बेस्टचे महासंचालकच उत्तर देऊ शकतात.
पुन्हा प्रफुल पटेल ?
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवार म्हणून प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर केले आहे. प्रफुल्लभाईंनी बरेच काही ‘साध्य’ केले आहे आणि ते अनुभवी आहेत. त्यांनी खरे तर तरुण आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मार्गदर्शक करायला हवे. त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका घ्यायला हवी होती. तरुणांना काही टिप्सही द्यायला हव्या होत्या. पटेल विनम्र आहेत, कुठे, काय बोलावे हे त्यांना ठाऊक आहे.त्यांची विरोधकांसोबतही मैत्री आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यापेक्षा पार्थ पवार यांच्या सारख्या तरुणाला उमेदवारी दिली असती तर बरे झाले असते.
विक्रांत हेमंत जोशी