तिघांत झगडा चवथ्याचा फायदा..
आलेले नैराश्य सतत येणारे अपयश त्यातून होणारी चिडचिड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 में च्या भाषणातून व्यक्त केली कि त्यांच्या सर्वांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी मनातली फडास काढून टाकली, शिवसैनिकांनी खूप दिवसानंतर थेट सेनाप्रमुखांचे दर्शन झाले म्हणून टाळ्या वाजवल्या खर्या पण त्यात पूर्वीसारखी ताकद नव्हती याउलट त्यांच्या मनात असलेली खदखद किंवा असलेली अस्वस्थता या सभेतून जाणवत होती, असे कायम उघड म्हटल्या जाते कि वाजपेयी आणि राज यांच्या भाषणाला गर्दी जमते किंवा जमायची पण मते मात्र दुसरीकडे वळायची, माझे वाक्य अधोरेखित करा उद्धव यांच्या कालच्या भाषणाचा हा असाच कालपर्यंतचा राज किंवा अटलबिहारी झाला आहे होणार आहे म्हणजे सभेला त्यांच्या गर्दी नक्की जमली पण तेथे जमलेले देखील त्यांना पुढल्या कोणत्याही निवडणुकीत नक्की मतदान कारणार नाहीत आणि हे दस्तुरखुद्द उद्धव यांच्याही ते लक्षात आलेले असल्याने त्यांची हि सभा उसने अवसान आणून विशेषतः राज संघ देवेंद्र आणि भाजपावर अतिशय खालच्या पातळीवर येऊन टीका कारणारी ठरली, उद्धव यांच्या या 14 में च्या भाषणाचा राज्यात देशात जनतेत आणि शिवसेनेतही चुकीचा मेसेज संदेश गेला, साऱ्या समस्त शिवसैनिकांना आपल्या राजाचे हे पोरकट भाषण अजिबात आवडलेले नाही आणि हे मी हवेत तिर मारणारे लिखाण करीत नसून अनेकांशी बोलून विशेषत: अगदी राज्यातल्या काही मान्यवर शिवसेना नेत्यांशी बोलून तुम्हाला या ठिकाणी नेमकी वस्तुस्थिती विशद करतो आहे…
राज ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका आणि देवेंद्र यांचे वजन काढणे, तेथे जमलेल्या समस्त सैनिकांना देखील आता हे आवडत नाही कारण दिवस राज व देवेंद्र यांचे असल्याने या दोघांना या दिवसात अन्य कोणीही चिडविणे डिवचणे खिजविणे घालून पाडून बोलणे बोलणारा शंभर टक्के आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार आहे जे नेमके उद्धव यांनी 14 में च्या सभेतून स्वतःचे मोठे नुकसान करवून घेतले आहे. उद्धवजी, मान्य आहे कि देवेंद्र वजनदार आहेत आणि सुरवातीपासून होते पण तुम्ही तर गेल्या दोन अडीच वर्षांपासून सर्वार्थाने अगदी फुंकर मारली तरी उडून जाता आणि नेमके हेच तुमच्या लक्षात आल्याने भाषणातून तुम्ही अतिशय खालची पातळी विनाकारण गाठून आपले व महाआघाडिचे मोठे नुकसान करवून घेतलेले आहे पूर्वीचे सुसंस्कृत व चाणक्य चतुर उद्धव आम्हाला या सभेला अजिबात दिसलेले नाही, खूप दिवसांचा मनात साठलेला राग त्यातून तुम्हाला स्वतःला दिसणारे काळे ढग, भाषणातून तुम्ही अगदी पोरकट भाषेत व्यक्त केले आपली आणि उरली सुरली घालवून बसले. सध्याची राज्यातली काँग्रेस म्हणजे म्हणजे संधीचा गैरफायदा घेऊन डाका घालणार्या डाकूसारखी आहे म्हणजे गावात एखाद्या जोडप्याचा हनिमून ऐन रंगात आलेला असताना म्हणजे जोडप्याला पलंगावरून उठून बसणे देखील जेव्हा शक्य नसते तेव्हा पाळतीवर असलेले डाकू जसे नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांच्या घरात घुसून अगदी त्यांच्या देखत डाका घालून मोकळे होतात ते तसे राज्यातल्या काँग्रेसने मोठ्या खुबीने आणि डोके वापरून केलेले आहे थोडक्यात तिकडे सेना आणि राष्ट्रवादी त्यांच्या हनिमून मध्ये व्यस्त असतांना आणि भाजपा व राज ठाकरे यांना थेट अंगावर घेंग असताना हे काँग्रेसवाले तोंडून चकार शब्द न काढता मस्त हात धुवून घेताहेत पण हात धुवून घेत असतांना तिकडे राष्ट्रवादी त्यांच्या देखील गाफील वृत्तीचा जनमानसात फायदा करवून घेते आहे हे अलीकडे अगदी उशिरा केवळ त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या म्हणजे नाना पटोले यांच्या लक्षात ते आल्याने त्यांनी उशिरा का होईना अगदी उघड थेट जाहीर शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. राज्याचे राजकारण नेमके कोणत्या दिशेने पुढल्या भागात मी नक्की ते तुम्हाला विशद करणार आहे सांगणार आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी