केली हाड हाड म्हणून झाला पहाड आव्हाड…
पेटून उठले कि पुरून उरले नेमके त्यांचे त्यांनाच ठाऊक पण आव्हाड घडतांना वाढतांना श्रीमंत होतांना राजकारणात ठाण्यात राष्ट्रवादीत मोठे होतांना मी अगदी जवळून बघितले त्यांना बारीक नजरेने न्याहाळे. जितेंद्र आव्हाड आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत पण ज्यादिवशी महाआघाडीने सरकार स्थापनेचा दावा केला त्याक्षणी मंत्रिमंडळात स्थान कोणाला, हा प्रश्न जेव्हा पवारांना त्यांच्या एका बुजुर्ग नेत्याने विचारला त्यांनी पहिले नाव म्हणे जितेंद्र आव्हाड यांचे घेतले नंतर त्यांच्या ओठावर इतरांची नावे सोयीनुसार इच्छा नसतांना टप्प्याटप्प्याने आली, हे तुम्हाला नक्की माहित नव्हते म्हणून येथे सांगितले. काही बारीक सारीक संदर्भ असे डोक्यात ठेवावे लागतात जसे मुतकरी यांच्या ब्राम्हण टीकेवर मंत्री जयंत पाटील कुत्सितपणे हसत होते मला त्यांचा राग आला नाही उलट किव आली दया वाटली कारण त्यांनी त्यांच्या मनात गेल्या काही वर्षांपासून करण्यात येणारे त्यांचे जे अपमान आहेत त्या अपमानांना जणू वाट मोकळी करून दिली, पाटील त्यादिवशी दिलखुलास हसले कारण हे मराठे पण नवाब मलिक या जात्यंध मुसलमानांच्या सततच्या अपमानाने किंवा मलिक यांच्या अगदी उघड त्यांना फाट्यावर मारण्याने जयंतराव कमालीचे अस्वस्थ होते, तू मेरा कुछ नही बिघाड सकता असे नवाब त्यांना जेव्हा अगदी चारचौघात पक्ष कार्यालयात ऐकवून मोकळा व्हायचा, त्या त्या क्षणी आत्महत्या करून घ्यावी असे म्हणे जयंत पाटलांना वाटायचे, नवाब जेव्हा तुरुंगात गेला पाटलांनी तेव्हा नक्की किलोभर पेढे वाटले असतील. जाऊंद्या दुसरे त्यांच्या एका मोठ्या अपमानाचे कारण फार व्यक्तिगत आहे किंबहुना देवाने असा अपमान तर पाकिस्थानातल्या नागरिकाचा देखील करू नये पण तो व्यक्तिगत अपमान असल्याने त्याचा उल्लेख मी फक्त माझ्या आत्मचरित्रात करेल. जयंतराव, ब्राम्हणांचे शाप घेणे चांगले नाही…
जितेंद्र आव्हाडांची पवारांबाबत लॉयल्टी हि या जयंत पाटलांसारखी सोयीनुसार नाही, अनेकांनी आव्हाडांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आमिषे दाखवलीत पण जितेंद्र आव्हाड यांची श्रद्धा केवळ शरद पवारांच्या चरणांशी म्हणाल तर पित्यासारखी किंवा कायमच्या नेत्यासारखी, एकेकाळी याच आव्हाडांना त्यांच्याच पक्षातले नेते दिवंगत वसंत डावखरे एवढा मानसिक त्रास द्यायचे कि काय नेमके करावे म्हणजे राजकारण सोडून दुसरे काही बघावे का असे आव्हाडांना वाटायचे तरीही त्यांनी आपल्या निष्ठा राष्ट्रवादी आणि पवारांशी कायम ठेवल्या. एकाचवेळी तीन तीन बलाढ्य विरोधक आव्हाडांच्या छातीवर चढून हल्ला करायचे त्यात ठाण्यातली एकनाथ शिंदे आणि त्यांची बलाढ्य शिवसेना आघाडीवर तर होतीच पण प्रताप सरनाईक आणि वसंत डावखरे यांच्या सोबतीला याच ठाणे जिल्ह्यातले त्यावेळेचे सर्वाधिक ताकदवान नेते गणेश नाईक म्हणजे हे सारे कधी एकत्र येऊन तर कधी वेगवेगळे होऊन जितेंद्र आव्हाड यांना सतत सर्वत्र सातत्याने एकटे पडायचे अगदी एखाद्या मालिकेत जशी सासू आपल्या सुनेला छळते अगदी तसे छळायचे पण आव्हाड अजिबात घाबरले आणि डगमगले नाहीत याउलट जेव्हा केव्हा शरद पवार अडचणीत यायचे हेच आव्हाड प्रसंगी जीवाची प्राणाची बाजी लावून सर्वांदेखत इतरांवर विरोधकांवर धावून जायचे तुटून पडायचे. प्रत्येक हिंदू विरोधकाला जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी राग आहे चीड आहे द्वेष आहे घृणा आहे कारण अगदी उघड आहे हिंदू विरोधकांना आव्हाड यांचे सतत मुसलमानांची बाजू घेणे किंवा मुंब्र्याचे प्रतिनिधित्व करणे अजिबात आवडत नाही. माझा एक नातेवाईक आहे त्याला घरातून प्रचंड मानसिक त्रास होता पण त्याचवेळी त्याला गावातला त्याचा मुसलमान मित्र मशिदीत घेऊन बसायचा आणि समजूत काढायचा वरून हेच सांगायचा कि तुझे हे वाईट दिवस निघून जातील, आव्हाडांचे बाबतीत नेमके हेच घडले…
जेव्हा ठाणे जिल्ह्यातले एकसे एक ताकदवान नेते त्यांच्या हात धुवून मागे पडले होते तेव्हा त्यांनी माझ्या जवळच्या नातेवाइकासारखा मुस्लिम मार्ग निवडला म्हणजे मुंब्रा मतदार संघातल्या मुसलमान मतदारांना आधी पाठीशी घेतले आणि घातले नंतर त्यांचे प्रेम मिळविले आणि हिंदू आव्हाड एक दिवस पुन्हा कधीही पराभूत न होण्यासाठी याच बहुसंख्य मुसलमान असलेल्या विधान सभा मतदार संघातून आमदार झाले पुढे शरद पवारांनी त्यांना मंत्री केले, आर्थिक राजकीय सामाजिक दृष्ट्या आव्हाड मोठे किंवा श्रीमंत होत असतांना पवारांनी त्यांना जवळ घेतले. तुम्हाला काय वाटते जितेंद्र आव्हाडांनी तेथल्या मशिदीत जाऊन रामरक्षा म्हणावी कि हनुमान चालीसा किंवा त्यांनी एखाद्या मुसलमानांच्या घरात पूजा घालावी कि रामाचा भर चौकात नावाने गजर करावा, शक्य नाही कारण त्यांना अजूनही इतर राजकीय स्पर्धकांना किंवा अजित पवार यांच्यासारख्या पक्षातल्या बलाढ्य विरोधकांना पुरून उरायचे आहे त्यामुळे एक हिशोबी व चतुर नेता या नात्याने ते अगदी उघड मुसलमानांची बाजू घेतात त्यातून ते मुंब्र्या बाहेरील हिंदूंच्या मनातून उतरले तरी स्थानिक मुसलमान व हिंदूंच्या देखील गळ्यातले ताईत होऊन मोकळे होतात. जेव्हा केव्हा कुठेही जितेंद्र आव्हाड हा विषय निघतो, बहुतेकांना त्यांचा अगदी मनापासून मनातून राग असतो पण मी आव्हाडांचे अतोनात राजकीय हाल अगदी जवळून बघितले आहेत त्यामुळे मी कट्टर हिंदू असूनही सलाम आव्हाडांच्या मुस्लिम प्रेमाकडे दुर्लक्ष करतो…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी