वृत्तपत्रांची विकृती लुटण्यात प्रगती…
माझ्यासारख्या कित्येकांना हि हमखास सवय आहे ती म्हणजे प्रातर्विधी साठी कमोडवर बसल्यानंतर विविध वृत्तपत्रे वाचण्याची. कित्येकांना जर हाती वर्तमानपत्र नसेल तर शी होत नाही कितीही कुंथले तरी. कोरोना कालखंड सुरु होण्यापूर्वी माझ्या घरी दररोजजवळपास विविध 13-14 दैनिके वृत्तपत्रे टाकल्या जायची, वेळात वेळ काढून दररोज न चुकता ती माझ्याकडून वाचल्या जायची. समजा मी अधून मधून परदेशात गेलो तर परतल्यानंतर काही दिवस जमा झालेली वृत्तपत्रे दैनिके परतल्यानंतर मी ती संपूर्ण वाचून काढीत असे. दैनिकातील महत्वाच्या बातम्या आणि इतर महत्वाचे लिखाण, माझ्याकडून त्यावर असलेली कात्रणे विशेषतः बातम्या आणि माहितीपूर्ण लेख मी मुद्दाम काढून ठेवत असे, कधीतरी संदर्भ म्हणून अशी कात्रणे उपयोगात हमखास यायची. विविध वृत्तपत्रे वाचण्याची आवड मी अगदी तिसर्या इयत्तेपासून लावून घेतली होती. गावात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक वाचनालय होते तेथे मी एकमेव ब्राम्हण न चुकता वाचन करण्यास दूर असूनही तेवढ्या लहान वयात पायी जाऊन येत असे. थोडक्यात थेट अगदी लहान वयापासून मी वृत्तपत्रे वाचनाची सवय आवड लावून घेतली होती ती अगदी आत्ताआता पर्यंत म्हणजे कोरोना महामारी सुरु होण्यापूर्वी, पण जसा कोरोना सुरु झाला, वृत्तपत्रे बंद पडली आणि नियमित घरी येणारी वृत्तपत्रे वाचणे बंद झाले. माझ्यासारखे या राज्यात कितीतरी अगदी घरोघरी, जे प्रसंगी पोटाला चिमटा काढून दैनिके विकत घेऊन वाचायचे. पण माझ्यासारख्या प्रत्येक वाचकाचे कोरोना सुरु झाल्यानंतर वृत्तपत्रे दैनिके वाचणे बंद पडले. माझे तर पोट वृत्तपत्रे वाचण्याशी निगडित आहे, सतत वाचण्याची सवय एकाकी बंद पडूनही मला किंवा इतर वाचकांना काही फरक पडला का तर अजिबात नाही. जेथे मला फरक पडला नाही तेथे ज्यांचे पोट त्यावर अवलंबून नाही अशांना तर अजिबात फरक पडणार नाही पडलेला नाही…
आता अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. जी दैनिके वृत्तपत्रे लिखाणातून इतरांना दररोज ज्ञानाचे उपदेशाचे डोस पाजतात ती वृत्तपत्रे किंवा त्यांचे मालक स्वतः कसे नीच फसवे लबाड बदमाश आहेत त्यावर काही पुरावे मला मांडायचे आहेत. राज्यातल्या विविध दैनिकांचा वृत्तपत्रांचा जरी येथे आपण विचार केला तरी त्यावर मी हे हमखास छातीठोकपणे सांगू शकतो कि राज्यातले लोकमत लोकसत्ता किंवा इतर सारीच दैनिके सरकारी तिजोरीला भले मोठे भगदाड पाडून विशेषतः शासनातील काही लबाड अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन हाताशी धरून आणि शासनावर दबाव टाकून उद्धव ठाकरे यांना उल्लू बनवून सतत शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून अक्षरश: लुटून लुबाडून मोकळे होताहेत कारण शासन आणि शासनाचे माहिती व जनसंपर्क खाते त्यातील अधिकारी कर्मचारी या वृत्तपत्र मालकांना घाबरतात किंवा विकले जातात पण नुकसान त्यातून हमखास जनतेचे सरकारचे होते, शासकीय जाहिरातींपोटी आणि इतर काही सवलती मिळवून वृत्तपत्रांची महाराष्ट्रात कोरोना सुरु होण्यापूर्वीही आणि सुरु झाल्यानंतर देखील फार मोठी सतत आर्थिक लूट सुरु आहे. कोणत्याही वृत्तपत्राला किंवा त्यांच्या मालकांना घाबरून सरकारी तिजोरी उघडी करून त्यांना हवे तेवढे लुटपाट करू देणे हे अतिशय गांडू असण्याचे लक्षण आहे. स्वतः उद्धव ठाकरे देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामना दैनिकाशी संबंधित आहेत, केवळ आपल्या सामना या दैनिकाच्या आर्थिक फायद्यासाठी उद्धव ठाकरे राज्यातल्या इतर सार्याच बोगस वृत्तपत्रांना जर अशी आर्थिक लूट करू देण्यात कानाडोळा करीत असतील तर हे प्रकरण विरोधकांकडून जर त्यांच्यात दम असेल तरच हाताळल्या जाणे अत्यावश्यक आहे जर वेळीच बोगस शासकीय जाहिराती खपाच्या बाबतीत खोटी आकडेवारी देऊन सारी वृत्तपत्रे शासकीय तिजोरीवर दरोडा टाकण्यास थांबवल्या गेली नाहीत तर एखाद्या शुर निधड्या सामाजिक कार्यकर्त्याने तरी हि लुटपाट न्यायालयात आव्हान देऊन थांबवावी…
क्रमश: हेमंत जोशी