विस्कटलेली घडी :पत्रकार हेमंत जोशी
मुख्यमंत्री सहाय्यता निधी जनतेच्या अडीअडचणीच्या काळातला अत्यंत उपयोगी असा निधी अर्थातच हा निधी देण्याचा वाटण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना असतो आणि या निधीचा खऱ्या अर्थाने विशेषतः औषधोपचारावर विविध व्याधी उपचारांवर फार फार मोठ्या प्रमाणात उपयोग करवून घेतला तो देवेंद्र फडणवीसांनी त्यात त्यांना अतिशय मनापासून सहकार्य केले दिले ते त्यावेळेचे मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचा सहाय्यक रामेश्वर तसेच या निधीचे प्रमुख ओमप्रकाश शेट्ये यांनी आणि नेमके हेच सेवा कार्य इतरही मुख्यमंत्र्यांच्या हातून घडले तर त्यासारखे दुसरे पुण्य नाही अर्थात यातही गैरप्रकार घडतात घडलेले आहेत म्हणजे काही अत्यंत नालायक नेते ज्यांना अजिबात आर्थिक मदतीची गरज नसते त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून आपला उल्लू सिधा करवून घेतात या अशा नेत्यांपेक्षा रांडा बर्या, म्हणावे लागेल. हा विषय येथे यासाठी कि या कोरोनाच्या महामारीत याच मुख्यमंत्री सहाय्यता निधी ची जनतेला वारंवार गरज भासते आहे म्हणून अनेक दानशूर या निधीमध्ये स्वतःकडले दान टाकायला तयार आहेत पण माझ्या काही व्यावसायिक मित्रांचा वाईट अनुभव असा, त्यांनी लाखो रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये दान केले असतांनाही त्यांना प्रत्यक्ष बोलावून किंवा किमान फोनवरून आभाराचे दोन शब्द तर दूरच पण साधे दोन ओळींचे पत्र देखील अद्याप त्यांना माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाले नाही. आपण केलेल्या सत्पात्री दानाची साधी दखल देखील जर घेतल्या जात नसेल तर असे दानशूर इतरांनाही सांगून मोकळे होतील कि दान इतरत्र करा पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीला काहीही देण्याचे टाळा…
www.vikrantjoshi.com
घरोघरी मातीच्या चुली विशेषतः या लॉकडाऊन च्या दिवसात अनेकांच्या घरातले प्रेम बिंग फुटले त्यातून बहुतेक घरातून आपापसात मोठी भांडणे लागलेली आहेत. विद्याताई चव्हाण किंवा रावसाहेब दानवे याच्या घरातल्या भानगडी रस्त्यावर आल्या जगजाहीर झाल्या इतरांचे बिंग बाहेर फुटले नाही एवढाच काय फरक.दुर्दैव कसे बघा ज्या भानगडी विरोधात राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण रस्त्यावर उतरून भानगडी करणाऱ्यांन किंवा महिलांना त्रास देणाऱ्यांना जाब विचारायच्या आज त्याच विद्या चव्हाण यांच्या थेट घरातच त्यांनास्वतःला जाब विचारायची वेळ आलेली आहे कि नेमकी चूक कोणाची म्हणजे त्यांच्या सुनेची मुलाची कि त्यांची स्वतःची…
व्हाट्सअप हे अलीकडले भानगडींचे मोठे माहेरघर या काळात अनेकांची प्रेमप्रकरणे त्यामुळेच उजेडात आली. चव्हाण यांचे वाद न्यायालयात असल्याने त्यावर फारसे भाष्य करता येणार नाही पण विद्याताईंच्या मुलाचे त्याच्या पत्नीशी मुळात भांडण उजेडात आले तेही या व्हाट्सअप मुळेच, लॉक डाऊन मुळे दोघेही सतत घरात एकमेकांच्या कायम संपर्कात समोरासमोर त्यामुळेच म्हणे आपल्या पत्नीच्या नको त्या भानगडी मुलाच्या लक्षात आल्या व तेथून त्यांच्यातले वाद वाढले मग सुनेने देखील चव्हाण कुटुंबावर जे आरोप केले ते ऐकून याच का त्या विद्या चव्हाण घडी विस्कटलेल्या महिलांच्या मसीहा असा प्रश्न माझ्यासारख्यांना पडला… सुनेकडे घरातल्यांनी दुर्लक्ष केले अन्याय केला म्हणून तिचे वाकडे पाऊल पडले कि त्या सुनेलाच या अशा चंचल सवयींची आवड विकृती होती त्यावर नेमका विचार होणे गरजेचे आहे. म्हणून माझे नेहमी हेच सांगणे असते, प्रदीर्घ वाईट अनुभवातून हेच म्हणणे असते कि सारे काही अविचाराने केले तर मला नाही वाटत आयुष्यात फारसे काही बिघडते पण ज्याने त्याने प्रत्येकाने लग्न मात्र अतिशय विचारांती करावे आपली पुढे भविष्यात फसवणूक अडवणूक लुबाडणूक होणार नाही याचा अभ्यास करूनच सर्वांनी लग्नाच्या बेडीतअडकणे गरजेचे आहे अन्यथा विवाह संबंध एकदा का आपापसात घरात कुटुंबात बिघडले कि त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आणि परिणाम पुढल्या पिढीवर निश्चित होतो. चव्हाण किंवा दानवे हा विषय येथेच संपत नाही…
क्रमश: हेमंत जोशी