स्फोट घटस्फोट आणि आम्ही…
या लेखात आपण जरा इकडल्या तिकडल्या गप्पा मारूया. एकाने माझ्यावर अलीकडे कमेंट केली कि हेमंत एवढे मोठे पत्रकार असूनही इतरांचे लिखाण आपल्या वॉलवर टाकतात. एकतर इतरांचे लिखाण मी कधीही माझ्या नावाने खपवणारा पत्रकार नाही ते नावासहित घेतो कारण त्यामागे ज्याच्या लिखाणाची भट्टी उत्तम जमलेली असते तो काही भाऊ तोरसेकर नसतो, असतो एक सामान्य सर्वसामान्य लेखक किंवा लेखिका, या मंडळींना माझ्या वीस बावीस लाख वाचकांनी ओळखावे हा एकमेव त्यामागे उदात्त हेतू असतो. सहसा आमच्या कोणत्याही मीडियात मनाचा हा मोठेपणा अगदी अभावाने आढळतो. मला वाटते ज्याचे जे चांगले उत्तम ते समाजासमोर यावे. वास्तविक माझ्या आयुष्यात माझे ज्या काही जवळच्यांनी वाटोळे करण्याचा प्रयत्न केला किंवा आजही करताहेत त्यात सुप्रसिद्ध पत्रकार माझा सख्खा धाकटा भाऊ ज्याला मी सर्वप्रथम पत्रकारितेत आणले तो यदु जोशी, तरीही मी मात्र कधीही अनेकदा संधी चालून आलेल्या असतांना त्याचे वाटोळे व्हावे असे वंगाळ वागलो नाही वरून जेव्हा केव्हा त्याचा विषय निघतो त्याच्याविषयी चांगलेच उद्गार काढतो, मित्रांनो जे मी केले तेच तुम्हीही करा म्हणजे जगाकडे सकारात्मक नजरेने बघा, तुम्हाला माझ्यासारखी दररोज पुढल्या पाच मिनिटात झोप लागेल, आपण काय परमेश्वर आहोत का कि एखाद्याला शिव्या शाप देऊन त्याचे वाटोळे करू शकतो,अजिबात नाही. जो तो भारतीय तुम्हाला फसविण्याचा गंडविण्याच्या तयारीत असतो, वेळोवेळी सावध राहा, निदान जे आपले आहे ते सांभाळून ठेवा…
एक छान वाक्य वाचण्यात आले, आपल्याकडे लग्न नापसंत असलेल्या मुलाशी किंवा मुलीशी झाले तरी रागाच्या भरात दोन तीन मुले काढून आपण मोकळे होतो. या वाक्याशी मी सहमत नाही कारण आजही भारतीय स्त्री पुरुष मोठ्या प्रमाणावर हिंदू उत्तम संस्कार विससेलेले नाहीत, उठसुठ आपण तलाक तलाक तलाक म्हणून यासाठी मोकळे होत नाही कारण एखाद्याचे त्यातून आयुष्य उध्वस्त होऊ नये हा उदात्त हेतू त्यामागे असतो, ज्या मुलांना आपण जन्म दिलेला असतो ती आपण घटस्फोट घेतल्याने रस्त्यावर येऊ नयेत हा त्यामागे त्यागाचा मोठा हेतू असतो, अन्यथा दर पाच घरांमागे हिंदू कुटुंबियांत देखील घटस्फोट झाले असते. अर्थात घटस्फोट घेण्याचे प्रमाण आपल्यातही आता झपाट्याने वाढू लागलेले आहे. मी तर कायम सांगतो कि आयुष्यात सारे काही अविचाराने केले तरी फारसे बिघडत नाही पण लग्न मात्र अत्यंत विचारपूर्वक करा अन्यथा मोठा पश्चाताप करण्याची वेळ येते, तुमच्या स्वप्नांचा पार चुराडा होतो. माझ्या एक अतिशय जवळचा नेता असा आहे कि त्याची पत्नी म्हणजे हाताबाहेर गेलेली केस आहे पण जन्माला घातलेल्या एकुलत्या एक मुलीमुळे त्याने अत्यंत वात्रट पत्नीशी घटस्फोट घेतला नाही, हा नेता महाआघाडी सरकारात आता मंत्री आहे. अर्थात असे कितीतरी, घरोघरी !! एक मात्र खरे आहे कि जेव्हा केव्हा तुमच्या ते लक्षात येते कि यापुढे आपला संसार विस्कटला आहे तेथपासून तुमचे रोमँटिक आणि वैवाहिक आयुष्य संपलेले असते उरते किंवा उरलेले असते ते केवळ कर्तव्य आणि कुटुंब कसेबसे पुढे नेण्याची जबाबदारी. विशेष म्हणजे याच मंत्र्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा अत्यंत चीटर उजवा हात ज्याला एका मोठ्या नेत्याने आपली देखणी व कर्तबगार मुलगी दिलेली आहे तो भामटा मात्र आठवड्याला निदान एक तरी नवीन मैत्रीण संभोगुन मोकळा होतो, मंत्र्याला पण आता संगतगुण लागलेले आहेत. उत्तम जीवन जगण्याचे तंत्र वेगळे आहे सावध राहून जीवन जगावे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी