राजकीय टोळी युद्ध आणि राज ठाकरे…
बघा, मला माझ्या अत्यंत आवडत्या नेत्याचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा अलीकडे मनापासून यासाठी राग आलेला आहे कि एकतर त्यांच्या केवळ एका चुकीमुळे दूर फेकल्या गेलेले मुसलमान नको तेवढे माजले कारण ते आणि त्यांचे शरद पवारांसारखे नेते सत्तेत आले आणि दुसरे काहीही कारण नसतांना अजिबात गरज नसतांना ठाकरे कुटुंबीय नको तेवढे काळ्या पैशांच्या कमाई मागे लागले. असले मोठे काळे धन मिळविण्याचा वेग वाढविण्याचा कोणताही अजेंडा अजिबात राबविण्याची त्यांना गरज नव्हती ज्यामुळे यादिवसात ठाकरे कुटुंबीय आणि जाधव यांच्यासारखे त्यांचे काळ्या पैशातले भागीदार मोठ्या वेगाने अडचणीत येऊ लागले आहे, तरीही आजही मला सतत हेच वाटत राहते कि उद्धव ठाकरे कायम अशा अडचणीतून संकटातून अगदी सुरुवातीपासून कायम सहीसलामत बाहेर पडत आलेले आहेत आणि यावेळी देखील ते असेच सहीसलामत बाहेर पडून पुन्हा तोंड वर करून या राज्याचे स्वाभिमानी मराठी नेतृत्व म्हणून नक्की कामाला लागतील. अगदी अलीकडे मी माझ्या जुहू गार्डन जवळच्या घरातून कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये जाण्यासाठी निघालो, भुजबळांच्या उत्तुंग इमारतीवरून पुढे खार सबवेला लागलो आणि नेहमीप्रमाणे बेशिस्त मुसलमान मंडळींच्या गोळीबार परिसरातल्या अतिक्रमित परिसरात अर्धा तास अडकलो जेथे केवळ मला बाहेर पडायला पाच मिनिटे लागणार होती, तेथून बाहेर पडत नाही तोच कालिना विद्यापीठापासून पुन्हा याच मुसलमानांचे प्रचंड अतिक्रमण आहे ते थेट फिनिक्स मॉल पर्यन्त, बदनाम नवाब मलिक कुटुंबीयांची दहशत गुंडगिरी दादागिरी असलेला हा परिसर, कालिना ते फिनिक्स साधारणतः वीस मिनिटे जेथे लागावीत तेथे मला केवळ मुसलमानांनी केलेल्या मोठ्या अतिक्रमणामुळे एक तास लागला, येतांना देखील तीच परिस्थिती, पुढे मला बांद्र्याला एका कॉफी शॉप मध्ये जायचे होते मात्र पोलिसांच्या कृपाछत्रामुळे मोक्याच्या बांद्रा लिंकिंग रोडवर हजारो मुसलमान ठाण मांडून धंदा उघडून बसलेले तेथेही असाच खूप वेळ गेला, दररोज प्रत्येकाचा हा वेळ जातो, वास्तविक आशिष शेलार यांचा हा मतदार संघ पण शेलार देखील जर त्यावर मिळमिळीत भूमिका कायम घेणार असतील तर या बदमाश मुसलमानांना आवर घालणार तरी कोण? जीव मुठीत धरून जो तो या रस्त्यावरून प्रवास करतो, अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे अख्या मुंबईत सर्वत्र हेच दृश्य बघायला मिळते म्हणजे जिकडे तिकडे चोहीकडे महत्वाच्या रस्त्यावर दादागिरी करणारे मुसलमान धंदा टाकून बसलेले आणि समस्त हिंदू जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे…
राज ठाकरे साहेब आम्हाला निदान यापुढे तरी तुमचे केवळ आरंभशूर वागणे नको म्हणजे जेथे मशिदीवर भोंगे तेथे त्यासमोर हनुमान चालीसा वाचणे हेही आंदोलन जसे तुमच्याकडून अर्ध्यावर सोडणे नको तसे अख्ख्या मुंबईत अतिक्रमण करून धंदा करणाऱ्या तमाम मुसलमानांचा बंदोबस्त आपण करावा हि सर्वसामान्य हिंदू किंवा मराठी माणसाची मतदाराची तुमच्याकडून माफक अपेक्षा आहे. जरी आशिष शेलार यांना मनातून भाजपा मनसे युती व्हावी असे वाटत नसले तरी माझा राजकीय अनुभव हे सांगतो कि जर पुढल्या विधान सभा निवडणुकीत आशिष शेलार यांना सध्याचा विधान सभा मतदार संघ बदलवून दादर मधून विधानसभा लढविण्याची जी मनोमन इच्छा आहे त्यात हमखास यश मिळविण्या त्यांना मनसे भाजपा युती फायद्याची नक्की ठरेल. अर्थात आशिष यांचे क्षणिक असे काहीही नसते म्हणजे त्यांना एखाद्या मुलीवर उद्या प्रेम जरी करायचे असले तरी ते आधी वर्षभर नियोजन करतील, घरच्यांना आणि मतदारांना विश्वासात घेऊन, मला सेक्सी प्रेयसीची कशी आवश्यकता आहे हे आधी पटवून देतील नंतर अगदी सेफ आवडलेल्या तरुणीला लव्ह यु म्हणून मोकळे होतील. आशिष शेलार जेव्हा गंभीर किंवा तेंडुलकर यांच्या सारखे उत्साही नेते दादर विभागात मतदार संघात जातीने लक्ष घालून अशा अनेकांना नेतृत्वात उभे करायला लागले आणि न चुकता शिवाजी पार्क च्या आवडत्या डी बेला कॉफी शॉप ऐवजी बरिस्ता मध्ये बसून वेगवेगळ्या विविध कार्यकर्त्यांसोबत गप्पांचा फड जमवायला लागले तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली आणि माझी माहिती खरी ठरली कि आशिष शेलार पुढली विधानसभा बांद्र्याऐवजी दादर विधानसभा मधून लढण्याच्या तयारीत आहेत, दादर किंवा बांद्रा, आशिष शेलार हमखास मुंबईतल्या कोणत्याही विधान सभा क्षेत्रातून निवडून येतील त्यांना ते निवडून येण्याचे गणित उत्तम साधलेले आहे. शेवटी एकच सांगतो, राज्यातले राजकीय युद्ध सुडाने पेटलेले आहे, त्यात जसे अनेक नेते होरपळून निघतील त्यानंतर अनेक शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील त्याची मोठी झळ पोहोचणार आहे कारण यादी तर तयार आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी