राज ठाकरे : मजा आली रे !!
-हेमंत जोशी
राज जसे चारचौघात वागतात बोलतात वाटतात ते तसेच प्रत्यक्षातही आहेत. मैत्रीला जागणारा आणि एकदा मैत्री किंवा साधी ओळख जरी झाली तरी कायम पुढे ओळख देणारा धमाल नेता. राज यांचे अनेक प्लस पॉईंट्स आहेत पण त्यांच्यात जे मायनस पॉईंट्स आहेत त्यातून राज ठाकरेंचे आजतागायत मोठे राजकीय नुकसान झाले म्हणजे त्यांनी बेसावध राहून वाजवीपेक्षा अधिक विश्वास उद्धव यांच्यावर टाकला आणि नेमका राज यांच्या याच मैत्रीला नात्याला जगणार्या स्वभावाचा मोठा गैरफायदा घेऊन वेळोवेळी उद्धव यांनी राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुढे योग्यवेळी म्हणजे गरज संपताच याच राज यांचा काटा काढला त्यांना सेनेतून मातोश्री वरून आणि दिवंगत बाळासाहेबांच्या हृदयातून हद्दपार केले, हि हद्दपारी करण्याआधी उद्धव यांनी राज यांच्यातील गुणावगुणांचा नेमका अभ्यास केला त्यामुळे राज जेव्हा एकंदर सेनेतून जेव्हा हद्दपार झाले पुढे उद्धव यांना त्यांच्या जाण्याने कोणतेही निदान आजतागायत राजकीय नुकसान झाले नाही याउलट आजही इतक्या वर्षानंतर राज कधी सत्तेसाठी तर कधी राज्यातल्या राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडताहेत पण त्यांना मनासारखे यश अद्याप अजिबात मिळालेले नाही, नाही म्हणायला राज यांचे मध्यंतरी बार गर्ल पद्धतीने प्रेमात आकंठ बुडायला झाले होते म्हणजे बार गर्ल जशी कधीही कोणा एकाची होत नाही तेच शरद पवार यांचेही आहे आणि शरद पवारांचा हा अत्यंत धोकादायक स्वभाव उभ्या राज्याला आणि देशाला माहित असतांना देखील राज बार गर्ल पद्धतीने पवारांच्या प्रेमात यासाठी पडले कि त्यांना वाटले, पवार आपल्याला राजकीय ताकद देतील आणि शिवसेना भाजपा युतीतून जसा सेनेने सत्तेत खुपवर्षे मोठा फायदा करवून घेतला, मनसे आणि राष्ट्रवादी युतीने आपलेही सत्तेचे अपुरे स्वप्न पूर्ण होईल पण ते तसे अजिबात घडले नाही, राज यांना बेसावध ठेवून पवार केव्हा उद्धव यांना आय लव्ह यु म्हणून मोकळे झाले हे राज यांच्या लक्षात देखील आले नाही थोडक्यात राज यांचा त्यांच्या आजवरच्या आयुष्यात दोन वेळा फार मोठा प्रेमभंग झाला, दोन्ही वेळा जणू त्यांना बार गर्ल पद्धतीने फसविण्यात आले पहिल्यांदा उद्धव यांनी आणि नंतर शरद पवारांनी…
सतत दोन वेळा जेव्हा एखाद्याचा प्रेमभंग होतो ज्याचा प्रेमभंग होतो ती व्यक्ती अनुभवातून मग सावध व शहाणी होते पुन्हा प्रेमभंगाचे दुःख वाट्याला येणार नाही याची ती काळजी घेते. प्रेमभंगाचे प्रसंग पुरुषांपेक्षा स्त्रियांवर अधिक ओढवतात, आता मात्र राज कमालीचे सावध झाले आहेत, कुठल्याही राजकीय पक्षाचा मुका घेतांना त्या पक्षाला एड्स तर झालेला नाही हेही ते तपासून बघतात. यावेळी मात्र ज्या दोघांच्या वाट्याला दोन दोन वेळा नेमका प्रेमभंग आला आहे ते दोघेही एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे किंबहुना तसे पुरावे आमच्या हाती पडले आहेत. राज्यातल्या मनसे आणि भाजपा दोघांच्याही वाट्याला दोन दोन वेळा प्रेमभंग आला आहे या दोघांनाही त्या दोघांकडून नेमका प्रेमात धोका झाला आहे, दोघेही समदुःखी त्यातून त्यांचे यापुढे एकत्र येणे सोडून गेलेल्या धोकेबाज प्रेयसींना त्यातून मोठा धडा मिळण्याची आता मोठी शक्यता निर्माण झालेली आहे. राज ठाकरे यांना, तुमच्या जर ते लक्षात असेल तर सर्वप्रथम भाजपाचे आशिष शेलार भेटले नंतर हळूच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील त्यांना बिलगून आणि मस्त चुंबन देऊन आले आणि शेवटी याच राज यांना थेट देवेंद्र फडणवीस देखील भेटले, एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन ते बाहेर पडले होते. अत्यंत महत्वाचे म्हणजे राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला शिवाजी पार्कवर अति प्रचंड जण लाखभर समुदायासमोर केलेले गाजलेले भाषण ते जसे जहाल बाळासाहेबांची नेमकी आठवण करून देणारे होते, महत्वाचे म्हणजे राज यांचे हे भाषण जणू देवेंद्र फडणवीस ऐवजी राज ठाकरे करताहेत त्यातले प्रत्येक वाक्य हुबेहूब भाजपा नेत्यांची त्यांच्या मान्यवर वक्त्यांची आठवण करून देत होते. आणि मला तेच सांगायचे आहे कि नजीकच्या काळात शंभर टक्के मनसे व भाजपा युती होणार आहे. त्यांच्यातल्या होणाऱ्या अनेक बैठकांचे तसे पुरावेच मला माहीत आहेत म्हणून एवढ्या विश्वासाने तुम्हाला सांगतोय कि मनसे व भाजपा युती होणे हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे. भाजपा मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत जे पार पाडणार आहेत त्या एकमेव आशिष शेलार यांना मात्र मनसे भाजपा युती व्हावी असे अजिबात मनापासून वाटत नाही त्यांना वाटते कि मनसे भाजपा युतीमुळे फायदे कमी नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे, आशिष शेलार यांचे आराखडे फारसे चुकीचे ठरत नसल्याने दोन्हीकडून युती करतांना आशिष यांचे युती न करण्याचे मुद्दे नक्की विचारात घेतले जातील…
अपूर्ण : हेमंत जोशी