राज्य बुडाले, का घडले…
-हेमंत जोशी
परशुरामाने आपल्या आईचा वध केला होता. पाच पांडवांची एकच पत्नी होती. श्रीकृष्णाने कायम परस्त्रीशी शृंगार केला. रामाने वनवास पत्करून थेट वडिलांचा अतिशय दुख्खद अंत घडवून आणला. देवांच्या चुकीची अशी कितीतरी उदाहरणे पण मानवाने मात्र देवांच्या वाईट कृतींचे समर्थन अनुकरण करू नये त्यातून मानवाला देवपण नव्हे तर अशांचा सत्यानाश व्हायला सुरुवात होते. उद्धव मात्र थेट स्वतःला परमेश्वर समजून चुकांवर चुका करताहेत म्हणजे गेल्या अडीच वर्षात थेट बोटांवर मोजता येईल इतक्या वेळा तीही त्यांची मंत्रालयात हजेरी तरीही त्यांना मुख्यमंत्रीपद सोडवत नाही आणि ते अजिबात परमेश्वरी अवतार नसल्याने ठाकरे कुटुंबांचे काय किंवा केवढे नुकसान व्हायचे ते होऊ द्या पण प्रजेला राजाच नसल्याने प्रजेची अवस्था पोटी दोन लहान मुले असलेल्या सुंदर स्त्रीच्या कपाळी ऐन उफाड्या ज्वानीत विधवा झाल्यासारखी झालेली आहे अशावेळी मुले रस्त्यावर येतात भरकटतात प्रसंगी वाममार्गाला लागतात आणि देवाघरी नवरा गेल्याने पाठी राहिलेल्या अशा उफाड्या तरुण विधवेवर वाईट विकृत नजरवाले तुटून पडतात शरीराची तारुण्याची वाट लावून मोकळे होतात हुबेहूब राज्याच्या प्रजेचे उद्धव यांनी केवळ लोभापायी हट्टापायी हे असे मातेरे करून ठेवले आहे कारण सामान्य माणसाचा राजा जागेवर नसल्याने कोणीही वाली नाही आणि राजाच्या पाठी अख्खे मंत्रिमंडळ मनाला येईल तसे निर्णय घेऊन पैसे खाऊन महाराष्ट्राला या मुस्लिमांचे तुष्टीकरण करणाऱ्या मंत्रिमंडळाने दहा वर्षे मागे नेऊन ठेवले आहे भरीस भर कोरोना महामारीने देखील राज्याच्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून ठेवलेले आहे. उद्धव सत्तेवर आले पाठोपाठ कोरोना आला, आता कोरोना आटोपला तरीही उद्धव सरकारने सर्वसामान्य जनतेला आजही मंत्रालयाचे दरवाजे अदयाप खुले केलेले नाही केवळ बदमाश दलाल वृत्तीची माणसे कसेही करून काहीही करून प्रसंगी पैसे देऊन मंत्रालयात प्रवेश मिळवितात आणि आपली कामे पूर्ण करून दिमाखात बाहेर पडतात. अत्यंत घृणास्पद जर काही या मंत्रालयात घडले असेल तर ज्यांच्या हाती निर्णय घेण्याचे अधिकार आहेत अशा सर्वच खात्यातील अधिकारी आणि सारेच मंत्री कार्यालयात पूर्वी किंवा उद्धव सरकार सत्तेत येण्याआधी पैशांची व्यवहारांची देवाण घेवाण त्या त्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचे विश्वासातले कार्यालयीन असिस्टंट्स किंवा मंत्र्यांकडे विशेषतः त्यांचा सरकारी स्टाफ हि कामे बिनबोभाट करून मोकळा व्हायचा, महाआघाडी सरकारात मात्र या मंडळींचे आर्थिक व्यवहार आता सरकारी कर्मचारी नव्हेत तर बाहेरचे दलाल येऊन सांभाळतात अगदी आरामात आणि दिमाखात ते मंत्री किंवा अधिकाऱ्यांच्या थेट कार्यालयात बसून त्यांची आर्थिक दलाली अगदी उघड उघड सांभाळतात, हा प्रकार तसा नवीन नाही फक्त महाआघाडी सरकारात तो फोफावला वाढला आहे हे नक्कीम्हणजे मी तर कोणत्या शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी व मंत्र्यांची राज्यमंत्र्यांची बाहेरचा कोण दलाली करतो हे अगदी त्या त्या नावांसहित पुराव्यांसहित सांगू शकतो…
विशेषतः या देशातले किंवा महाराष्ट्रातले सरकार कोणतेही कोणाचेही असो पण ते हिंदू धार्जिणे नसले विशेषतः यावेळच्या राज्यातल्या सरकारसारखे जर मुस्लिम धार्जिणे असले तर पुन्हा देशात मोगलशाही यायला नांदायला फारसा वेळ अजिबात लागणार नाही म्हणजे 1993 च्या ज्या भीषण बॉम्बस्फोटात जी शिवसेना हिंदूंसाठी थेट धावून गेली होती त्याच शिवसेनेचे प्रमुख जर नवाब मलिक या देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा करणाऱ्या मुसलमानाला पाठीशी घालत असेल तर राज्यातल्या शिवसैनिकांची आणि हिंदूंची मान खाली गेली असे वातावरण सेनाप्रमुखांनी स्वतः निर्माण केलेले आहे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्रीपद सांभाळणे जमत नाही मग स्वतःच बाजूला होऊन आणि मंत्री अनिल परब यांच्यासारख्या बदनामांना बाजूला सारून उद्धव यांनी एखाद्या खमक्या मेहनती आमदार नेत्याला पुढे करून त्याला या गादीवर बसवायला हवे, नारायण राणे यांचे झालेले हाल बघता मला वाटत नाही कि उद्धव यांनी त्यांच्या जागी नेमलेला मुख्यमंत्री यापुढे मातोश्रीला वरचढ ठरेल आणि हा बदल जर तडकाफडकी घडणार नसेल तर माझे वाक्य लिहून ठेवा केवळ पुढल्या काही दिवसात हि महाआघाडी निश्चितपणे गडगडेल त्यातले कित्येक गजाआड जातील आणि या राज्यात पुन्हा हिंदू धार्जिणे पण इतर धर्माचाही आदर करणारे विचार शंभर टक्के सत्तेवर येतील. निवडणूक निकालांमुळे या राज्यातल्या भाजपाला एक मोठा फायदा असा होणार आहे कि जी मोठी सत्तर कुटुंब इतर पक्षातून भाजपा मध्ये आलीत त्यांचा जो पुन्हा भाजपा सोडण्याचा निर्णय झाला होता तो त्यांनी निदान सध्या तरी रद्द केला आहे कारण त्यातल्या अनेक कुटुंबाची पक्षांतर करण्याची धावपळ मी उघड्या डोळ्यांनी बघत होतो, पण भाजपा आणि फडणवीस यांची ताकद वाढल्याने त्याचवेळी महाआघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने हि कुटुंब भाजपा सोडणार नाहीत हे आता नक्की झालेले आहे पण माझा भाजपाला सल्ला असा कि भाजपा नेत्यांनी आणि संघ परिवाराने या बाहेरून त्यांच्याकडे येणाऱ्या नेत्यांना, कुटुंबाला, जवळच्या कार्यकर्त्यांना वेगळी विचारसरणी असलेला हा भाजपा आचार विचारांनी नेमका वेगळा कसा हे अगदी वर्ग घेऊन वेळोवेळी समजावून सांगायला हवा अन्यथा या बाहेरून आलेल्या नेत्यांना येथले आगळे वातावरण काहीसे जड ठरते आणि ते एकतर भाजपामध्ये कंटाळतात किंवा कोणत्याही क्षणी बाहेर पडण्याची वाट पाहतात संधी शोधतात. या दिवसातले राजकीय बदल हा विषय एवढा पुरेसा नाही पुढल्या भागात अधिक व्यापक लिहीन…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी