उद्धवजी बाप कि आदित्य ताप…
-हेमंत जोशी
जेव्हा मी खूप आधी तुम्हा वाचकांना किंवा माझ्या कुटुंब सदस्यांना जे सांगतो त्यावेळी इतरांना ते पटत नाही, जे बाहेर घडते तेच माझ्या घरात घडते आणि तुम्हाला तर मी हे खूप आधीच सांगितले आहे कि माझ्या शरीरावर दोन ठिकाणी तीळ आहे, पहिला जिभेवर दुसरा नेमका कुठे असेल ते सांगायची येथे गरज आहे का ? त्यामुळे जे मी बोलतो तेच लिहितो आणि जे लिहून मोकळा होतो नेमके तेच तसेच घडते. फडणवीसांनी सभागृहात बॉम्ब फोडल्यानंतर ते कसे पट्टीचे नेते त्यावर रकानेच्या रकाने लिहायला अनेकांनी सुरुवात केली आहे आणि हेच मी बेंबीच्या देठापासून ओरडून तुम्हाला कित्येक वर्षे आधीपासून सांगतो आहे कि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याही पेक्षा राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस हेच अव्वल ठरले आहेत ठरणार आहेत. हि तर त्यांच्यातल्या नेमक्या नेतृत्वाची केवळ सुरुवात आहे, भविष्यात त्यांच्या बाबतीत वेगळे चित्र एक नेता म्हणून तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे. नेत्यांच्या हातून चुका घडत असतात पण जे झालेल्या चुका पुन्हा करण्याचे टाळतात ते खऱ्या अर्थाने परिपूर्ण नेते ठरतात त्यावर आदित्य उद्धव ठाकरे अलीकडले उत्तम उदाहरण. मला आदित्यच्या अतिशय जवळ असलेला एक मित्र सांगत होता कि तेजस आणि आदित्य दोघा सख्य्या भावांमध्ये महत्वाचा फरक असा कि तेजस इतरांशी कायम अंतर राखून असतो किंबहुना तो आपल्याच मनो जगतात रमलेला असतो त्यामुळे त्याच्या फारसे जवळचे कोणी नसते, बहुतेक त्याच्याकडे कडू खडूस व्यक्तिमत्व म्हणून बघत असल्याने त्याला जो तो टरकून दचकून असतो त्याउलट नेमके आदित्य ठाकरे याचे आहे तो क्षणार्धात समोरच्याला आपल्या हसतमुख व बोलक्या लाडिक चेहऱ्यातून आपलेसे करून घेतो मग ती दिशा पटणी असेल किंवा अगदी सामान्य शिवसैनिक, आदित्य आणि इतर शिवसेना नेते यात मोठा फरक असा कि आदित्य किंवा त्याच्या अतिशय नजदिक असलेला जो मित्र किंवा मोजक्या कार्यकर्त्यांचा, तरुण नेत्यांचा गोतावळा आहे ते सारे केवळ आदित्य याच्या सूचनेवरून शिवसेनेत कार्पोरेट पद्धतीने वातावरण तयार करण्यात यासाठी गुंतलेले आहेत कि आदित्य यास म्हणे असे वाटते कि महाराष्ट्र राज्य विशेषतः शिवसेनेतल्या बहुतेक साऱ्याच नेत्यांकडे खंडणी वसूल करणारे नेते किंवा पक्ष या पद्धतीने जे बघतात त्यावर जगाचा अभ्यास असलेल्या आधुनिक आदित्य मनातून त्यावर कायम अस्वस्थ असतात होतात म्हणून आदित्य यास शिवसेनेची किंवा शिवसेना नेत्यांची हि काहीशी वादग्रस्त इमेज पूर्णतः बदलवून टाकायची आहे आणि आदित्य जर त्यात यशस्वी ठरले तर पुढली शिवसेना हि भाजपा पद्धतीने कॉर्पोरेट शिवसेना म्हणून लोकांसमोर येईल ज्याचे नक्की महाराष्ट्रात मनापासून स्वागत करण्यात येईल. जसे शिवसेना कशी असावी त्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य यांचे अनेक अनेकदा वाद होतात तसे ते अलीकडे अनेक मुद्द्यांवर देखील वाद होतात पण होणाऱ्या वादांचे परिणाम त्या दोघात कोणतेही चुकीचे टोक गाठत नाहीत म्हणजे त्या दोघांचा बाळासाहेब विरुद्ध जयदेव होत नाही, वाद तेथल्या तेथे मिटतात पुन्हा बाप बेटे एकमेकांशी हसून हातात हात घेऊन मोकळे होतात पण आदित्य यांचा हा प्रयत्न वाईट नाही, शिवसेनेला कॉर्पोरेट लूक देऊन मॉडरेट बनविणे त्यांचा हेतू चांगला आहे पण ज्यांना जुन्या वाईट सवयी जडल्या आहेत त्यांचे एड्स झालेल्या पुरुषासारखे असते म्हणजे एड्स झाला तरी अशांचे वेश्यागमन जसे सुटत नाही ते तसे जर सेनेतल्या जुन्या खोडांचे झाले तर त्यांना आदित्य विचार पटायला हवेत, सुरुवात तर उत्तम झालेली आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी