मलिक, मुसलमान आणि महाराष्ट्र…
-हेमंत जोशी
कसेही करून शरद पवार यांना हे राज्य या राज्यातली सत्ता स्वतःकडे राखायची आहे त्यासाठी वाटेल ते करायला पवार तयार आहेत, महाराष्ट्रात मुसलमान अधिक माजले तरी त्यांना चालेल पण सत्ता त्यांना आपल्याकडे हवी आहे म्हणून ते अलीकडे ताकदीनिशी महाराष्ट्राचे मुलायमसिंग झाले आहेत, अखिलेशच्या भूमिकेत अजित पवार आणि आझम खान अर्थात नवाब मलिक पण उत्तर प्रदेशातल्या आझम खान याचे जे झाले ते तसे सुरुवात छान झालेली असली तरी नवाब मलिक यांचे आझम खान आजचा होण्यास काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे राज्यातल्या हिंदूंना काही काळ वाट पाहावी लागणार आहे कारण आमच्या या राज्यात ज्या दोघांकडे आम्ही योगी आदित्यनाथ म्हणून बघतो किंवा बघत आलेलो आहे त्यातला एक म्हणजे उद्धव ठाकरे हे केव्हाच पवारमय होऊन, हिंदुत्वाला फाट्यावर मारून नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात धन्यता मानू लागले आहेत आणि ज्या दुसऱ्या नेत्याकडे आपण सारेच्या सारे म्हणजे या राज्यातले आणि देशातले योगी आदित्यनाथ म्हणून बघतो आहे ते देवेंद्र फडणवीस या दिवसात दिन रात लढताहेत झगडताहेत मात्र यश त्यांच्या काहीसे दूर दूर पळत असल्याने नवाब मलिक यांचा आझम खान होण्यात करण्यात काही अडचणी नक्की आहेत त्यात राज्याची सत्ता हाती नसणे हे एक प्रमुख कारण आहे. केवळ सत्ता हाती ठेवण्यासाठी या राज्याचा मुलायमसिंग होणे पवारांना जरी आवडणारे आणि परवडणारे असले तरी त्यांच्या या गलिच्छभूमिकेतून अगदी नजीकच्या काळात राज्यातला हिंदू म्हणण्यापेक्षा सरळमार्गी आणि भावनिक मराठी माणूस मुसलमानांच्या वाढत्या प्रस्थामुळे कायमस्वरूपी संकटात अडचणीत सापडू शकेल यात तिळमात्र शंका नाही आणि यापुढे तसेही उद्धव ठाकरे यांनी मी कडवा हिंदू आणि मराठी माणसाचा रक्षणकर्ता असे कितीही ओरडून सांगितले तरी आम्ही मराठी त्यावर फारसे विसंबून राहणार नाही कारण आमचा त्यावर फारसा विश्वास आता उरलेला नाही, भलेही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत भाजपापासून फारकत घ्यायला हरकत नव्हती पण एकाचवेळी भाजपाशी काडीमोड आणि मुस्लिमधार्जिण्या राजकीय पक्षांशी महाआघाडी त्यांची हि भूमिका प्रत्येक मराठी माणसाला अस्वस्थ करून गेली आहे…
www.vikrantjoshi.com
शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या एका मोठ्या नेत्याने अलीकडे मला एक छान चुटका सांगितला.
पुण्याचे लेले काका जंगलातून चालले होते. अचानक त्यांच्यासमोर वाघ उभा राहिला. भीम रुपी महारुद्र वज्र हनुमान मारुती, घाबरून अगदी मोठ्यांदा लेलेकाका हे म्हणू लागले. वाघाचा जन्म पुण्यातलाच होता, तो देखील त्यावर हसून मोठ्यांदा म्हणायला लागला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे…इथपर्यंत सगळ्यांनाच माहित आहे पण खरी गम्मत पुढे आहे. लेलेकाकांनी खाड्कन हातातले घड्याळ वाघाला दाखविले, दोन वाजून गेले होते…वाघ शेपूट डाऊन करून मुकाट्याने झोपायला गेला…
तात्पर्य : जोशी काका आणि वाघोबा दोघेही पुण्यातला प्रोटोकॉल पाळतात असे नाही पण महत्वाचे असे कि वाघ हल्ली घड्याळाला खूप घाबरतो…
आणि हो, मी मुसलमानांचा आझम खान त्या नवाब मलिक यांना यासाठी म्हटले कि नवाब मुसलमानांचे नेते म्हणून जोशात व त्वेषात जसे पुढे आले तसे या राज्यातले इतर सार्या मुस्लिम नेत्यांचे महत्व झपाट्याने कमी झाले एवढे कि त्या मुसलमान नेत्यांचे अनुयायी देखील आता त्यांच्यापासून खूप दूर गेले आहेत मग तो नेता असलम शेख असेल किंवा हसन मुश्रीफ, नसीम खान असेल किंवा अब्दुल सत्तार, अबू आझमी असेल किंवा हुसेन दलवाई किंवा अन्य अनेक, या साऱ्यांचे महत्व झपाट्याने कमी झाले असल्याने जरी नवाब मलिक मुसलमानांचे आज या राज्यातले आझम खान झालेले असले तरी इतर हे सारे नेते मनातून कमालीचे अस्वस्थ झाल्याचे माझी माहिती आहे त्यामुळे उद्या जर नवाब मलिक यांचे महत्व एखादा फडणवीस कमी करणार असेल तर ते दृश्य या अन्य मुस्लिम नेत्यांना मोठे सुखावणारे असेल हे नक्की…
क्रमश: हेमंत जोशी