भाग दुसरा : उष:काल होता होता काळरात्र झाली…
-हेमंत जोशी
एकदा मी केनियाच्या जंगल सफारीत फिरत असतांना दोन सिंह एका हरणा मागे शिकारीसाठी म्हणून धावतांना बघितले पण पळता पळता ते हरीण राहिले बाजूला हेच एकमेकांशी तुंबळ मारामारी करायला लागले त्यांची ती जीवघेणी मारामारी हरीण दुरून गम्मत बघत उभे होते, सामान्य माणसाची शिकार करून स्वतःच्या तुंबड्या भरणारे हे नेते, स्वतः अतिभ्रष्ट पण इतरांना देखील राज्यविक्या भ्रष्टाचारात सामील करून घेणारे मग त्यात विशेषतः विविध सरकारी अधिकारी विविध दलाल अनेक व्यापारी असेही काही बोटावर मोजण्याएवढे आलेत, आपल्या सुदैवाने या अत्यंत महाभ्रष्ट महानीच महाहलकट मंडळीमध्येच वाट्यावरून सत्तेच्या लालसेपोटी किंवा माझी काळी संपत्ती तुझ्या काळ्या संपत्तीपेक्षा कशी कमी, केवळ यास्तव त्या शिकारी सिंहासारखे या दिवसात आपापसात तुंबळ लढताहेत आणि गरीब व हतबल सामान्य माणूस त्या हरणासारखे या हलकट व बदमाशांचे युद्ध त्यात बघ्याची भूमिका घेतो आहे आणि त्याला मनापासून हेच वाटते आहे कि यांनी एकमेकांचे असेच कपडे फाडावेत म्हणजे एक दिवस ते नागडे झाले कि नेमके कसे दिसतात हे आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर कदाचित आपण उर्वरित आयुष्य निदान सुखासमाधानाने जगू आरामात घालवू. विशेषतः 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकात किंवा त्यानंतर देखील म्हणजे शिवसेना भाजपा युती सत्तेत आल्यानंतर त्यात भाजपा राज्यात वरचढ ठरल्यानंतर नेहमीप्रमाणे जिकडे सत्ता तिकडे आम्ही पद्धतीचे कुंपणावर कायम बसणारे विविध असंख्य नेते भाजपामध्ये आले त्यातल्या काहींना वाट्यात किंवा सत्तेत हिस्सा मिळाला काहींना मिळाला नाही त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपा सत्तेत न आल्याने हे जे 70 प्लस विविध राजकीय कुटुंब भाजपामध्ये कधी नव्हे ते त्यांची तत्वे बाजूला ठेवून आले होते ते पुनः आज एकवार कुंपणावर चढून बसले आहे आणि त्या सर्वांची अवस्था पण टपरीवर लावल्या जाणाऱ्या चायनीज बाईच्या फोटोसारखीच आहे म्हणजे हे कुंपणावरले डोळा तर नक्की मारताहेत पण ते नेमके कोणाला डोळा मारून खुणावताहेत हेच लक्षात येत नाही म्हणजे भाजपाला आजही विनाकारण हेच वाटत राहते कि ते यापुढे कायमस्वरूपी आपलेच आहेत पण ते तसे नाही हे कुंपणावरले नेते एकाचवेळी अनेक विविध पक्षातल्या टॉपमोस्ट नेत्यांना डोळा मारून मोकळे होताहेत त्यातल्या बहुतेकांचे आम्हाला पुनः तुमच्याकडे घ्या हे असे लाचार विनवणे नक्की सुरु आहे. अगदीच चार दोन त्यातले असे आहेत कि जे कायमस्वरूपी भाजपामय झालेले आहेत…
तत्व आणि सत्व सोडून केवळ सत्तेच्या मोहापायी भाजपात आलेल्यांची यादी फार मोठी आहे. प्रवीण दरेकर चित्रा वाघ गोपीचंद पडळकर राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील छत्रपती उदयन राजे भोसले नारायण राणे निलेश राणे नितेश राणे बबनराव पाचपुते प्रसाद लाड राम कदम प्रशांत परिचारक रणजितसिंह मोहिते पाटील कृपाशंकर सिंह मंत्री कपिल पाटील हर्षवर्धन पाटील विजय गावित हिना गावित दत्ता मेघे सागर मेघे समीर मेघे अजय पाटील प्रगती पाटील शिवाजीराव नाईक सत्यजित देशमुख सम्राट महाडिक काशीराम पावरा राजवर्धन कदमबांडे अमरीश पटेल भूपेश पटेल माणिकराव गावित भरत गावित शिवाजीराव दहिते हर्षवर्धन दहिते तुषार राधे सूर्यकांता पाटील आणि खासदार चिरंजीव प्रताप पाटील चिखलीकर पाशा पटेल पदमसिंह पाटील राणा जगजितसिंह पाटील सुरेश धस प्रशांत ठाकूर आणि पिताश्री मोनिका राजळे शिवाजीराव कर्डीले निरंजन डावखरे किसान कथोरे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले नमिता मुंदडा विलासराव जगताप धनंजय महाडिक रणजितसिंह नाईक निंबाळकर वैभव पिचड मधुकर पिचड कालिदास कोळंबकर गणेश नाईक संजीव नाईक संदीप नाईक सागर नाईक मंगेश सांगळे गणपतराव गायकवाड समाधान औताडे सुभाष साबणे अमल महाडिक जयकुमार गोरे हाजी अराफत शेख विनय कोरे सदाभाऊ खोत सुभाष भामरे विजयसिंह मोहिते पाटील लक्ष्मण जगताप महेश लांडगे समर्जीत घाडगे सरकार छत्रपती संभाजी राजे आणि आणखी कितीतरी. अर्थात यातले कोण व किती भाजपामध्ये टिकतील कोण का सोडून जातील हा अभ्यासाचा विषय आहेत आणि त्यावर माहिती मी नक्की तुम्हाला देणार आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी