उष:काल होता होता काळ रात्र झाली..
-हेमंत जोशी
नेमकी चूक कोणाची मला अजिबात सांगता येत नाही आणि सांगता देखील येणार नाही पण एखाद्या घरातल्या देखण्या व उफाड्या मुलीचे ती भन्नाट भानू असतांना देखील जुळत नसावे आणि एकदाचे जुळले तर ती पुढल्या सहा महिन्यातच ती विधवा व्हावी हुबेहूब तेच तसेच या राज्याचे वाटोळे झाले आहे म्हणजे सेना भाजपा युतीने तब्बल पंधरा वर्षांनंतर राज्याची गाडी रुळावर आणली होती त्यातून त्यांना मागल्या विधानसभेला घवघवीत यश देखील मिळालेले होते असे असतानाही मध्येच मोठी माशी शिंकली आणि भाजपा बाजूला पडली महाआघाडीची सत्ता आली भरीस भर त्यात कोरोना महामारी आली आणि सततचे आजारी पडणारे आजारी असलेले मुख्यमंत्री आपल्याला लाभले जणू काय सारे काही शरद पवार यांच्या मनासारखे घडले आणि बघता बघता हे राज्य रसातळाला जाऊ लागले आहे कित्येक वर्षे मागे गेले आहे. गँगवार हे एखाद्या युद्धापेक्षा कितीतरी पटीने वाईट, आपल्या या राज्यात राजकीय पक्षात युद्ध नव्हे तर गॅंगवार पेटलेले आहे आणि गॅंगवार हे प्रतिस्पर्धी टोळ्यात एकमेकांना संपवून जेव्हा मोकळे होते तेव्हा त्याची मोठी झळ सर्वसामान्यांना बसून त्यांचेही मोठे नुकसान झालेले असते. दोन फार मोठ्या हिंदू टोळ्या एकमेकांना या दिवसात संपवीत असतांना एका टोळीचा काहीसा विनाशकारी नेता पाक किंवा भ्रष्ट विचारांच्या सरदारांना हाताशी घेऊन पेटलेल्या हिंदूंच्या टोळी युद्धाकडे कोपऱ्यात बसून गालातल्या गालात हसत गम्मत बघतो आहे एव्हाना त्या नेत्याचे नाव तुमच्या लक्षात आलेले आहे…
www.vikrantjoshi.com
तुम्हाला हे माहित आहे का विशेषतः मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आणि राज्यात मागल्यावेळी युतीची सत्ता आल्यानंतर म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातले जवळपास विविध भागातले ७० प्रमुख, ताकदवान नेते भाजपावासी झाले त्यापैकी प्रामुख्याने ८०% नेते हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आले अगदी थोडके नेते हे काँग्रेस शिवसेना किंवा अन्य स्थानिक पक्षातून आलेले आहेत. कोणतीही स्त्री किंवा पुरुष आपले पहिले प्रेम प्रकरण कधीही विसरत नाही जरी त्यांचे दुसरीकडे लग्न लागलेले असले तरी त्यामुळे एकदा का प्रियकराने रस्त्यात भेटून किंवा गाठून पूर्वीच्या प्रेयसीला कुरवाळायचा अवकाश, प्रेयसी पुन्हा नवऱ्याची नजर चुकवून आपल्या आधीच्या प्रियकराला भेटून सारे काही द्यायला लागते, पूर्वी पेक्षा अधिक ताकदीने ती आधीच्या प्रियकराशी संभोग देखील करायला लागते. मला विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपाविषयी नेमकी हीच भीती कायम वाटत असते आणि ती रास्त आहे कारण जे राज्यातले प्रमुख सत्तर घराणे आणि या घराण्यातले नेते जे भाजपामध्ये आले आहेत त्यातले बहुसंख्य नेत्यांचे पूर्वीच्या प्रेयसीला भेटून बाहुपाशात घेण्याचे प्रकार सुरु आहेत त्यातले चार दोन अगदी उघड उघड पवारांशी दादांशी राष्ट्रवादीशी प्रेमविलाप करताहेत तर काही चोरूनलपून भेटताहेत ज्याचा मोठा फटका कोणत्याही क्षणी विशेषतः राज्यातल्या भाजपाला बसण्याची मोठी शक्यता अलीकडे निर्माण झालेली आहे. या कुंपणावर बसलेल्या नेत्यांची वृत्ती कायम वेश्यागमन करणाऱ्या ग्राहकांसारखी असते म्हणजे अमुक एखाद्या वेश्येला एड्स झाला आहे हे ठाऊक असतांना देखील नियमित वेश्यागमन करणारे ग्राहक मागे हटत नाही तसे या नेत्यांचे म्हणजे ज्यांना सत्तेशिवाय खुर्चीशिवाय त्या खडसे यांच्यासारखे अजिबात करमत नाही ते या दिवसात शंभर टक्के कुंपणावर उभे आहेत, जो कोणी त्यांना खुर्ची देईल त्याचे ते असतील म्हणजे आज जे भाजपामध्ये आहेत, खुर्ची मिळते आहे असे जर त्यांना दिसले तर पत्नी पेक्षाही अधिक घट्ट ते पुन्हा भाजपा वरिष्ठांना बिलगून मोकळे होतील तीच खुर्ची जर त्यांना पवार किंवा उद्धव किंवा काँग्रेस देणार असेल तर हे संधीसाधू तूच माझे खरे प्रेम असे ओरडून सांगतील आणि यातल्या एखाद्याला बिलगून चिपकून मिठीत पकडून मोकळे होतील. हे सत्तर नेते नेमके कोण आहेत आणि त्यातल्या कोणाची हालचाल अधिक संशयास्पद आहे हे पुढल्या भागात अवश्य वाचा….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी