विकल्या जाणारी नालायक मीडिया …
-हेमंत जोशी
मला ठाऊक आहे कि भुकेला माणूस केवळ लिखाणावर जगू खाऊ शकत नाही आपल्या कुटुंबाचा चरितार्थ या महागड्या जगात चालवू शकत नाही मात्र एखादा मीडिया मध्ये काम करणारा राब राब राबून देखील कुटुंबाचे पालनपोषण करू न शकणारा जर पोटासाठी कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रसंगी एखादे चुकीचे पाऊल उचलून दोन पैसे घरी आणत असेल तर मी अशा कोणत्याही मीडियात काम करणाऱ्याकडे नक्की पाठ करून मोकळा होईल पण ज्यांचे पत्रकारितेतून किंवा अन्य मीडिया प्रांतातून दलालीच्या भरवशावर आधीच पॉट भरलेले आहे तरीही काही मीडिया पर्सन जर अधिक श्रीमंत होण्यासाठी किंवा केवळ मौजमजा करण्यासाठी जर आपले क्षेत्र आपले इमान तेही एखाद्या अत्यंत घातक नेत्याला किंवा अन्य कोणालाही विकून मोकळा होत असेल तर या राष्ट्राला शेजारच्या राष्ट्रातील शत्रूंची अजिबात गरज नाही आमची मीडिया ते काम करून मोकळी होईल, आमच्यातले अनेक मोकळे होतात आणि मान खाली जाते….
हे लिखाण आपण काळजीपूर्वक वाचा कारण त्यात आमच्यातल्या नालायकांच्या देशद्रोही वृत्ती मी नेमकी येथे विशद करणार आहे. तीन प्रकारची मीडिया असते विशेषतः अनेक पत्रकार,बातम्या देणार्या वाहिन्या मी आपल्या या राज्यात बघितलेल्या आहेत अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास युती काळात जे भाजपाला अतिशय जवळचे होते महाआघडी सत्तेत येताच त्यांनी केवळ महाआघाडीच्या शिवसेनेच्या शरद पवार यांच्या भीतीपोटी म्हणजे प्रेमापोटी अजिबात नव्हे भाजपाकडे क्षणार्धात पाठ केली आणि हे असे मीडियातले लगेचच भाजपावर प्रचंड टीका करायला लागले आणि महाघाडीची नको तेवढी लाल करयला लागले, स्वतःला विकून नव्हे तर केवळ भीतीपोटी त्यांनी हे केले, हरकत नाही. काही अगदीच बोटावर मोजण्याइतके जे कधीही घाबरून पत्रकारिता करत नाहीत किंवा दबावाला बळी पडून आपल्या बातम्या देत नाहीत असे हे दुसर्या प्रकारातले असे मला प्रसंगी ते कोणत्याही विचारांचे असले तरी अगदी मनापासून भावतात अशा मीडियाचा मला अत्यंत अभिमान वाटतो. पण असे फार कमी असतात किंबहुना एकदा मला भाजपामधले एक राज्याचे मोठे नेते अगदी नावे आणि पुरावे देत म्हणाले कि जे शासकीय प्रशासकीय अधिकारी आणि मीडिया मला सत्तेत असताना अगदी जवळचे वाटायचे सतत आमच्या भोवताली घुटमळून व्यक्तिगत आर्थिक फायदे करून घ्यायचे, महाघाडी सत्तेत येताच ते आमच्यापासून ढुंगणाला पाय देऊन एवढे दूर पळाले कि मी आम्ही बघतच राहिलो. स्वार्थी आणि नीच विचारांच्या या मंडळींचा त्यातून वक्त चांगला येतो पण अंत नक्की वाईट असतो…
आमच्यातला तिसरा प्रकार अतिशय घातक आणि व्यक्तिगत फायद्यासाठी राष्ट्राला राज्याला प्रसंगी खड्ड्यात नेऊन सोडणारी हि मीडिया जी अत्यंत अत्यंत नालायक आणि नीच म्हणजे ज्यांना माहित आहे कि अमुक नेता अमुक मंत्री किंवा अमुक अधिकारी राज्याला बुडविणारा हिंदूंचे विशेषतः खच्चीकरण करणारा राष्ट्राला बुडविणारा आहे तरीही आमच्यातले काही जेव्हा वास्तवात धाडसी असतांना देखील जेव्हा या नालायकांना केवळ मोहापोटी विकले जातात, हा प्रकार अत्यंत क्लेशदायक आणि यातना देणारा. सरळ पुरावा मांडतो आणि हे लिखाण आटोपते घेतो. राज्यातला एक वादग्रस्त जात्यंध ड्रग्स किंवा स्मगलिंग सारख्या व्यवसायात असलेला एक अतिशय भ्रष्ट आणि राज्याला काळिमा फासणारा नवाबी म्हणजे काळ्या पैशातून नवाबासारखे जीवन जगणारा पाकिस्स्थानी विचारांचा नेता जो प्रसंगी किंवा सतत अगदी उघड उघड जयंत पाटलांसारख्या मर्द मराठ्याला फाट्यावर मारणारा अजिबात न जुमानणारा नेता किंवा जयंत पाटलांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याचाही चार चौघात अगदी उघड उघड दुरुत्तरे देऊन त्यांना किंवा अशा हिंदू मराठी नेत्यांना कायम अपमानित करणारा वादग्रस्त नेता, जो यापुढे कोणत्याही क्षणी तुरुंगात जाऊ शकतो या नेत्याला म्हणे आपल्या मनासारखे वागणारे बोलणारे लिहिणारे काही मीडियातले खुश करायचे होते म्हणून आमच्यातल्या जवळपास सहा मंडळींना त्यातल्या काहींना अगदी सहकुटुंब स्पॉन्सर केले आणि दुबई एक्स्पो फिरवून आणले विमान आणि हॉटेलचा खर्च वरून शॉपिंग साठी एक लाख रुपयांचे दिनार असा हा प्रवास एका देश्द्रोह्याला या पद्धतीने मीडियातले मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली पद्धतीची पत्रकारिता करणारे विकल्या गेले, त्यांच्यावर थुंकावेसे वाटले पण माझी अवस्था अनेकदा अर्जुनासारखी होते म्हणजे मी प्रसंगी रणांगणावर शस्त्र खाली ठेवतो म्हणजे मला ती सारी नावे माहित आहेत यांच्या संपूर्ण टूर्सचे डिटेल्स माझ्याकडे आहेत पण नावे उघड करायला मन धजत नाही कारण ते सारे माझ्या क्षेत्रातले आहेत त्यातले काही तर मी व माझे कुटुंब कसे उध्वस्त करता येईल, सतत याच प्रयत्नांत असतात तरी देखील माझा येथे अर्जुन झाला आहे. असे समाजविघातक मंडळींना विकल्या जाणारी मीडिया बघितली कि वेड लागायला होते….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी