नको आत्मचरित्र तुमच्या अंगाचा थरकाप उडेल…
-पत्रकार हेमंत जोशी
माझ्या आजपर्यंतच्या लिखाणात मोठ्या खुबीने मी माझ्या आयुष्यातले अनेक खाजगी प्रसंग लिहितो आलो असल्याने वेगळे आत्मचचरित्र लिहावे असे कधी वाटले नाही किंवा वाटणार देखील नाही आणि ढोंगी व लबाड पत्रकारिता अजिबात करायची नाही, हे भाऊ तोरसेकर यांनी आधीच सांगून ठेवले असल्याने आणि मनातही तेच असल्याने नेमके सत्य लिहून मोकळे व्हायचे न घाबरता हे आम्ही आधीच ठरविलेले आहे. वास्तविक वयाच्या केवळ 18 व्या वर्षी माझी जिल्हा परिषद बुलढाण्याला स्टेनो म्हणून नियुक्ती जवळपास झालेली होती पण मी सरकारी नोकरीत तेही ब्राम्हण असूनही जाणार नाही हे वडिलांना स्पष्ट सांगितले आणि त्यानंतरच्या तेथल्या अंतिम मुलाखतीला जेव्हा मी गेलो नाही, वडिलांनी कपाळावर हात मारून घेतला कारण मला आयुष्यात आर्थिकदृष्ट्या समाधानी व्हायचे होते बऱ्यापैकी मोठे व्हायचे असल्याने मला सरकारी नोकरी अजिबात करणे जमले नाही. आणखी काही वेगळ्या क्षेत्रात देखील मला जायचे होते म्हणजे एकतर अमेरिकेत जाऊन तेथे एखाद्या व्यवसायात स्थिर व्हायचे होते पण मुले तेथे स्थिरावण्यास नाही म्हणाली. खूप पैसे मिळविण्याच्या दृष्टीने मला अनेकदा अनिरुद्ध, भय्यू, नरेंद्रसारखा बाबा किंवा बुवा देखील व्हायचे मनात होते पण तोपर्यंत मी पत्रकारितेत बऱ्यापैकी विसावलो होतो अन्यथा या अशा बदमाश बुवांसारखा मी पण खूप पैसा मिळविला असता. इतर आवडत्या क्षेत्रात जाणे जमले नाही म्हणून फार वाईट वाटले नाही पण मुंबईत येऊन जी व्यावसायिक धमाल केली म्हणजे यश अपयश संकटे इत्यादींची चिंता न करता ज्यापद्धतीने पत्रकारिता एन्जॉय केली किंवा करणार आहे त्याचपद्धतीने मला अमेरिकेन लाईफ जगायचे होते पण तेथे स्थिरावणे जमले नाही येथे राजकीय पत्रकारिता आजही मस्त एन्जॉय करतोय, आजही येथे त्याच पद्धतीचे दैनंदिन आयुष्य येथेच भारतात मुंबईत राहून जगण्याचा कायम प्रयत्न अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून करतो आहे. जसे अमेरिकन माणूस घरातून त्याच्या ऑफिस मध्ये जायला निघतो बहुतेक प्रत्येकाला ऑफिसमध्ये पोहोचायला किमान दीड तास लागतो, अशावेळी अमेरिकन माणूस रस्त्यात आवडती कॉफी विकत घेतो आणि पीत पीत गाडी चालवतो, खूप छान वाटते. मी पण नियमित तेच करतो म्हणजे आमच्या घरीच प्रोफेशनल कॉफी मशीन असल्याने कॉफी ग्लास सांताक्रुजच्या घरून हाती घेऊनच निघतो आणि नरिमन पॉईंटच्या माझ्या ऑफिस मध्ये पोहोचतो, आलेल्या प्रत्येकाला अत्युत्तम महागडी कॉफी अगदी मनापासून पाजणे हा तर आम्हा प्रत्येक कुटुंब सदस्यांचा आवडता पाहुणचार किंवा छंद आहे. अमेरिकेत जाता आले नाही स्थिर होता आले नाही याचे थोडे वाईट वाटते पण खंत नाही तसे अमेरिकन स्रोत मी येथेच उभे केले अगदी राहत्या घरापासून तर जेथे वावर आहे तेथे प्रत्येक ठिकाणी. आणखी महत्वाचे म्हणजे जर तुम्हाला आयुष्यातला प्रत्येक क्षण माझ्यासारखा अति आनंदाने जगायचा असेल तर जीवनाकडे कायम सकारात्मक बघा प्रत्येकाकडे अतिशय पॉझिटिव्हली बघा, अमुक एखादा ओळखीचा जवळचा शेजारी किंवा कोणीही पुढे गेला म्हणून विनाकारण त्याला बदनाम करून किंवा मनाचा जळफळाट करून मानसिक त्रास अजिबात अस्वस्थ होऊ नका कारण अनेक भारतीय अशा वृत्तीतून स्वतःचेच मनस्वास्थ्य: बिघडवून घेतात त्यातून समोरच्याला नक्की त्रास होतो पण त्याच्या दुप्पट आपल्या स्वतःला त्या केलेल्या पापाचा बदनामीचा त्रास होतो हे सतत ध्यानात असू द्या. नशिबाने कष्टाने डोक्याने तुमच्या आमच्या जवळचे कितीतरी पुढे निघून जातात त्यावर अस्वस्थ न होता मला किंवा माझ्या कुटुंब सदस्यांना देखील अशी प्रगती कशी करता येईल त्यावर सकारात्मक विचार करा, बघा यश कसे चालून येते ते. माझ्या आयुष्यात आजतागायत अनेक वादग्रस्त जबरदस्त खतरनाक प्रसंग आलेले आहेत जे तुम्हाला सांगितले तर वादळ माजेल अनेकांना अनेक हादरे बसतील म्हणून शक्यतो आत्मचरित्र लिहिणे नको…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी