नाना संपले नानाचे वाटोळे झाले…
-पत्रकार हेमंत जोशी
नाना पटोले यांच्यासंगे एकांतात बसणे भेटणे नको असे तरुण कार्यकर्त्या त्यांच्यावर उगाचच आरोप करतात तर रात्र झाली कि नाना कोणाचे नसतात काही काळानंतर ते वाट्टेल ते बरळायला लागतात असेही अनेक सांगणारे भेटायचे ज्यावर माझा अद्याप विश्वास नाही नव्हता पण नाना वाट्टेल ते साकोली भंडाऱ्याला जे माननीय पंतप्रधानांविषयी बोलले तेव्हा नेमकी रात्र होती त्यामुळे नाना रात्री वाट्टेल ते बरळतात, लोकांच्या या चर्चेला त्यातून पुष्टी मिळाली. नाना तेही थेट पंतप्रधानाच्या अंगावर चिखलफेक करायला गेले आणि बरळण्याच्या अवस्थेत असल्याने तोच चिखल त्यांच्याच अंगावर पडला, नानांनी स्वतः चिखलफेक केली पण त्यात ते स्वतःच अडकले, नानांच्या बाबतीत रात्री असे घडू शकते अनेक सांगणारे सांगतात. पण एक बरे झाले कि नानांना कळले आपण आपल्या पक्षात कुठे आहोत, साधे कुत्रे देखील त्यांच्या मदतीला अद्याप धावून आलेले नाही, नाना नालायक एकटे पडले आणि उरले सुरले गमावून बसले. पंतप्रधानांना मी शिव्या देऊ शकतो, मी मारूही शकतो असे रात्रीच्या वेळी जाहीर चौकात उभे राहून सांगणार्या नानांची वास्तविक सकाळ झाल्यानंतर चांगलीच फाटली मग त्यांनी सारवासारव पण केली कि मी रात्रीच्या वेळी पंतप्रधानांच्या बाबतीत हे बरळलो नाही तर आमच्या साकोलीत मोदी आडनावाचा एक गुंड आहे त्याच्याविषयी बोललो पण एक तद्दन खोटे लपविण्यासाठी दुसरे खोटे जे प्रदेशाध्यक्षाला अजिबात न शोभणारे, आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, तेच नानाच्या बाबतीत नेमके घडले, साकोली गावातले सारेच अगदी काल परवापर्यंत नानांचे असूनही ते नाना यांच्यावरच मनापासून चिडले संतापले रागावले, नाना आमच्या गावाला विनाकारण बदनाम करू नका आमच्या अख्ख्या पंचक्रोशीत मोदी नावाचा आडनावाचा कोणीही गुंड नाही असे नानांच्याच लोकांनी नानांना अगदी उघड सुनावले आणि रात्री बेधुंद होणारे नाना चांगलेच तोंडावर पडले….
एक बरे झाले कि नाना यांच्याविषयी जी खदखद त्यांच्याच पक्षात आहे तिला अगदी उघड फोडणी मिळाली म्हणजे पार पडलेल्या नागपुरातल्या विधान परिषद निवडणुकीत नानाचे कोणीच नव्हते अगदी त्यांच्या महाआघाडीतले नेते आणि काँग्रेसचे नेते देखील ते सारे आतून नाना पटोले यांच्या विरोधात होते आणि काही ठिकाणी तर अगदी उघड थेट चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाजूने होते जे नाना यांच्या लक्षात आल्याने नाना यांनी ऐनवेळी उमेदवार बदलण्याची नामुष्की स्वतःवर ओढून घेतली पण यश मिळविणे नाना यांना शक्य नव्हते कारण नाना या फेल्युअर प्रदेशाध्यक्षांच्या बाजूने कोणीही ठाम उभे नाही उभे नव्हते त्यामुळे मी शंभर टक्के निवडून येईल हे बावनकुळे मतदान होण्यापूर्वीच सांगून मोकळे झाले होते उलट या विधान परिषद निवडणुकीनंतर बावनकुळे कुठल्या कुठे निघून गेले राज्यातल्या ओबीसी समाजाचे आता ते फार मोठे नेते झाले आणि निवडणुकीतला पराभव वरून थेट मोदी यांच्याविषयी नाना यांनी काढलेले केलेले वक्तव्य, माझे वाक्य येथे या ठिकाणी लिहून ठेवा कि ज्या वेगाने नाना पुढे आले पुढल्या काही महिन्यात ते दुप्पट वेगाने खाली येतील, काँग्रेस मध्ये तर आतापासूनच अगदी उघड त्यांना विरोध केल्या जाऊ लागला आहे त्यामुळे अगदी शम्भर टक्के नाना त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होतील नाना घरी जातील. पुढला प्रदेशाध्यक्ष आम्हाला गजानन देसाई पण चालेल मात्र बरळणारे नाना नको असे आता सारेच अगदी उघड सांगायला लागले आहेत. राज्यातले सुसंस्कृत काँग्रेस नेते खाजगीत सांगतात नानांच्या या उघड बोलण्याने आमची पक्षाची मान खाली गेली विशेष म्हणजे नेते तर फार दूर पण नानांचे कार्यकार्ते देखील नानांच्या या रात्रीच्या बेताल बडबडीवर त्यांच्या बाजूने उभे राहिलेले नाही त्यावरून तुमच्या ते लक्षात आले असेल कि नाना हे प्रदेशाध्यक्ष असून देखील आमच्या पक्षात एकटे पडले आहेत. पंतप्रधान तो कोणत्याही विचारांचा असेल पण तो राष्ट्राची राष्ट्रात आणि राष्ट्राबाहेर शान असतो ज्याचा थेट शब्दात नाना पटोले यांनी अपमान केला असल्याने नानाचे राजकारण आणि नेतृत्व आता संपल्यातच जमा आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी